टेन्शनमध्ये आहात? मन शांत, एकाग्र ठेवण्याच्या टिप्स तुम्हाला नक्कीच मदत करतील
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मनावर ताबा कसा मिळवावा? कठीण परिस्थितीमध्ये मन शांत कसे ठेवावे? या आणि मनाच्या एकाग्रतेशी निगडीत असंख्य प्रश्नांची अगदी रंगीत उत्तरे सांगणारी अनेक पुस्तके तुम्हाला मिळतील. परंतु ही झाली पुस्तकी भाषा!
अशी पुस्तके लिहिणाऱ्या बहुतांश लेखकांना तर मन एकाग्र करणे म्हणजे काय याची व्याख्या देखील करता येत नाही. असो या पुस्तकी ज्ञानामुळे केवळ पुस्तक खरेदी करण्यासाठी लागलेले पैसे आणि वाचण्यासाठी लागलेला वेळ तेवढा वाया जातो. बाकी काही नाही!
मन एकाग्र करण्यासाठी नेमके काय करावे या प्रश्नाचं उत्तर केवळ तोच देऊ शकतो ज्याने स्वत: कठीण प्रसंग अनुभवला आहे आणि त्या कठीण प्रसंगात शांत राहून मन एकाग्र करीत परिस्थितीवर मात केली आहे.
अश्याच एका सैनिकाने स्वत:च्या अनुभवावावरून मन एकाग्र राखण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. त्या आपल्या सर्वांसाठी नक्कीच उपयुक्त ठरतील.
–
- तुमच्या मानसिक तणावाचे मुख्य कारण आहे ही एक सवय! जाणून घ्या
- दिवसभर थकवा – कारण आहे झोपताना केलेल्या या ९ चुका
–
१) टू मिनिट रुलचा वापरा करा
जेव्हा कधीही एखादा कठीण प्रसंग तुमच्यासमोर उभा राहील तेव्हा दोन मिनिटे शांत चित्ताने विचार करा आणि ती गोष्ट केल्याने आणि न केल्याने काय परिणाम होतील याची कल्पना करा. म्हणजे तुमच्यासमोर दोन पर्याय निर्माण होतील.
आता काही सेकंद डोळे बंद करा आणि आपलं मन जे काही सांगतं आहे त्याचाच आधार घेऊन परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी पुढे या.
२) नकारात्मक विचार करू नका
आपण नकारात्मक विचार करण्यात खूप शक्ती वाया घालवतो. आपल्याला भीती असते की त्या कठीण प्रसंगाचे वाईट परिणाम काय होतील? या विचारामुळे मनात भीती निर्माण होते आणि चित्त थाऱ्यावर राहत नाही.
या क्षणी आपण हा विचार केला पाहिजे की या परिस्थिती समोर आपण जिंकलो तर त्याचे किती सुंदर परिणाम दिसून येतील. हा सकारात्मक विचार तुमच्या मनात आशा निर्माण करतो आणि तुमचे मन दृढ बनवतो.
३) जबाबदारी घ्या
जबाबदारी घेण्याची सवय लावा. जर एखादे काम करण्यासाठी तुमची निवड केली असेल तर कठीण प्रसंगी त्याचे अपयश इतरांवर फोडू नका. एक लक्षात ठेवा की इतरांच्या चुका पुढे केल्याने ते लोक पुढल्या वेळेस तुमच्या पाठीशी उभे राहणार नाहीत.
जर जबाबबदारी तुमची होती तर ती स्वीकारा म्हणजे त्या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी तुमचे सहकारी तुम्हाला मदत करतील. कठीण प्रसंगी मन एकाग्र राखण्यासाठी इतरांचा पाठींबा गरजेचा आहे. तो नसेल तर तुम्ही एकट्याने गोंधळून जालं आणि सारं काही विस्कटून बसेल.
–
- क्षुल्लक गोष्टीचा अतिविचार करताय? या सोप्या गोष्टी पाळा आणि मन शांत ठेवा!
- फक्त ६६ दिवसांत तुमचं जीवन पूर्णपणे बदलणाऱ्या ‘परफेक्ट लाईफ’च्या २१ सवयी!
–
४) एकाच वेळी अनेक गोष्टी करू नका
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
एकाचवेळी अनेक गोष्टी केल्याने कोणतेही काम नीट होत नाही हे लक्षात ठेवा. एक काम पूर्ण झालं की मग दुसर काम हाती घ्या. कठीण प्रसंगी हा नियम पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे.
एकाचवेळी अनेक गोष्टींमध्ये मन गुंतवल्यास कोणत्याही एका कामावर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकणार नाही. म्हणजे आधीच वाईट असलेली परिस्थिती अधिकच वाईट होईल.
५) केवळ ध्येय नजरेसमोर ठेवा
कठीण प्रसंगात आपण सामान्यत: आपले ध्येय विसरून जातो. आपण ही गोष्ट नेमकी का करत आहोत याबद्दल आपल्या मनात संभ्रम निर्माण होतो. एकदा का तुम्ही ध्येयापासून भटकलात की तुमचे मन एकाग्र होणार नाही.
तुम्हाला निर्णय घेण्यात अडचण होईल. सर्वप्रथम मनाला विचार की आपले ध्येय काय आहे? ते उत्तर मिळाले की त्यानुसार कठीण प्रसंगाशी कसे लढावे या संदर्भात निर्णय घ्या.
६) यशस्वी क्षणांची उजळणी
तुमचे संपूर्ण आयुष्य पाहिलं तर ती अनेक यशस्वी आणि काही अयशस्वी क्षणांची मालिका आहे. आपण जेव्हा कठीण परिस्थितीत असतो तेव्हा, तुमच्या बालपणापासून च्या यशस्वी क्षणांना तुमच्या डोळ्यासमोर आणा.
समोर कठीण परिस्थिती असतानाही तुम्ही, त्या अवघड परिस्थितीमध्ये कसे वागला, त्याची मनातल्या मनात उजळणी करा आणि मिळवलेले यश आठवा.
कठीण प्रसंगात या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमच्या मनावरचा ताबा नक्कीच सुटणार नाही.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.