' “जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुरबानी” – पुलवामाचा भ्याड हल्ला! – InMarathi

“जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुरबानी” – पुलवामाचा भ्याड हल्ला!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज १४ फेब्रुवारी,आज सगळे जग “व्हॅलेन्टाईन्स डे” साजराकरणार, आपापल्या लाडक्या व्यक्ती सोबत दिवस एंजॉय करण्यात प्रत्येक जण मश्गुल असणार!

पण याच दिवशी  जम्मू आणि काश्मीरमधल्या पुलवामामध्ये मात्र एका माथेफिरू आत्मघाती दहशतवाद्याने ४० कुटुंबे उध्वस्त केली. प्रेमदिनाच्या दिवशीच त्याने ४० कुटुंबापासून त्यांची प्रेमाची माणसे हिरावून घेतली.

ह्या हल्ल्याचा करावा तितका निषेध कमीच आहे. ह्या हल्ल्यामुळे प्रत्येक सामान्य भारतीय मनावर एक आघात झाला. आणि जे वीरपुत्र ह्यात हुतात्मा झाले, त्यांच्या कुटुंबावर तर दु:खाचा डोंगर कोसळला!.

२००४ नंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेला हा सर्वात भयानक दहशतवादी हल्ला होता.

 

PulwamaAttack-inmarathi
tfi.com

 

ह्या हल्ल्यात आपण आपले ४० वीरपुत्र गमावले आणि आपले वीस सैनिक बंधू जखमी झाले होते. आपल्या देशासाठी , भारतातल्या सगळ्या नागरिकांसाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली!

आपले हे सैनिक बंधू म्हणजे कुणाचे तरी पती होते, पुत्र होते, भाऊ होते, वडील होते….खरे तर ते आपल्या सर्वांचेच भाऊ होते. आपल्या भावांना ह्या भ्याड हल्ल्यात आपल्यापासून हिरावून घेतले ते जैश ए महम्मद ह्या दहशतवादी संघटनेने!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

तब्बल ३५० किलो स्फोटके भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए महंमदच्या दहशतवाद्याने हा आत्मघातकी हल्ला केला होता. ह्या हल्ल्यामुळे देशात सर्वत्र संतापाची लाट उसळली!

 

pulwama inmarathi
odisha story

 

सुटी संपल्यानंतर सेवेत रुजू होण्यासाठी हे CRPF चे जवान ७० वाहनांतून जात होते. नेहेमीपेक्षा ही संख्या ह्यावेळेला दुप्पट होती. पहाटे साडेतीन वाजता जम्मूहून हा गाड्यांचा ताफा निघाला. सूर्यास्ताच्या आधी हा ताफा श्रीनगरला पोहोचायला हवा होता.

श्रीनगर पासून ३० किमी लांब श्रीनगर -जम्मू महामार्गावर पुलवामा जिल्ह्यात अवंतीपुरा येथील लट्टूमोड येथे ह्या गाड्या पोहोचल्या तेव्हा हा भीषण हल्ला झाला.

जवानांच्या ताफ्यावर गोळीबार झाला. आणि क्षणार्धात स्फोटकांनी भरलेला ट्र्क ह्या ताफ्याला धडकला. ह्या हल्ल्याची भीषणता इतकी होती की ७६ व्या बटालियनच्या वाहनाची शकले उडाली. आणि इतर वाहनांची मोठी हानी झाली.

 

pulwama-inmarathi
Scroll.in

 

ह्या हल्ल्याची आपल्याला कल्पना सुद्धा करवत नाही. इतकी जास्त स्फोटके भरलेला ट्रक ह्या महामार्गावरून कसा गेला? ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त असताना हा ट्र्क महामार्गावर आलाच कसा? ह्या मार्गावरून जवानांचा ताफा जाणार आहे ही माहिती दहशतवाद्यांना कशी मिळते?

स्थानिक मदतीशिवाय इतका मोठा हल्ला होऊ शकत नाही. ह्या स्थानिक फुटीरतावाद्यांना ,शत्रूला मदत करणाऱ्या ह्या फितुरांना आधी साफ केले पाहिजे.

आपले बाहेरचे शत्रू चहूबाजूंनी हल्ला करीत आहेत पण त्यांना सहकार्य करणारे हे अंतर्गत शत्रू, हे अस्तनीतले विषारी साप जास्त धोकादायक आहेत. ह्या हल्ल्यात जे जवान जखमी झाले तसेच ज्या सैनिकांनी आपलं प्राण गमावला त्यांच्या घरच्यांची काय अवस्था झाली असेल आपण कल्पना पण करू शकत नाही!

 

puwama 2 inmarathi
scroll.in

 

या काळ्या दिवशी आपण ज्या सैनिक बांधवांना गमावले त्या वीर हुतात्म्यांची नावे..

१ . Ct/GD राठोड नितीन शिवाजी

२. Ct/GD भागीरथी सिंग

३. Ct/GD वीरेंद्र सिंग,

४. HC/RO अवधेश कुमार यादव

५. Ct/GD रतन कुमार ठाकूर

६. Ct/Dvr पंकज कुमार त्रिपाठी

७. Ct/GD जीत राम

८. Ct/Wm अमित कुमार

९. Ct/Bug विजय केआर मौर्य

१०. Ct/GD कुलविंदर सिंग

११.HC/GD मानेश्वर बासुमतारी

१२.ASI/GD मोहन लाल

 

pulwana inmarathi
lowy institute

 

१३. HC /GD नासीर अहमद

१४.HC/DVR जयमल सिंग

१५.Ct/GD सुखजिंदर सिंग

१६.Ct/Bug तिलक राज

१७.Ct/GD रोहिताश लांबा

१८.HC /GD विजय सोरेंग

१९.Ct/GD वसंथ कुमार व्ही.व्ही.

२०.Ct/GD सुब्रमणियन जी.

२१.Ct/GD मनोज कुमार बेहरा

२२. HC /Crypto नारायण लाल गुर्जर

२३. Ct/GD प्रदीप कुमार

२४.HC /GD हेमराज मीना

२६.HC /GD पी के साहू

२७.Ct/GD रमेश यादव

२८. HC/GD संजय राजपूत

२९. Ct /Cook कौशल कुमार रावत

३०. Ct/GD प्रदीप सिंग

३१. Ct/GD गुरु एच

 

pulwama martyrs inmarathi
business standard

 

३२. HC /GD संजय कुमार सिन्हा

३३. HC /GD राम वकील

३४. Ct/GD श्याम बाबू

३५. Ct/GD अजित कुमार आझाद

३६. Ct/Wc मणिंदर सिंग अत्री

३७. HC /GD बबलू सांत्रा

३८.Ct/GDअश्वनी कुमार काओची

 

condemnation-inmarathi
TheDispatch.In

 

“आपल्या ह्या हुतात्मा सैनिक बांधवांना आपण विसरून चालणार नाही, त्यांचे बलिदान विसरलो तर हा त्यांचा मोठा अपमान होईल!”  याच हिरीरीने पेटून उठून अखेरीस भारतीय सेनेने सर्जिकल स्ट्राईक करून पुलवामाच नाही तर अशा कित्येक भ्याड हल्ल्यांच चोख उत्तर दिलं!

आणि कित्येक अतिरेक्यांना यमसदनी पाठवले!

या एका भारतीय सेनेच्या प्रतिहल्ल्यामुळे कित्येक आतंकवादी संघटनांची कंबर मोडली, त्यांना सुद्धा समजलं की आता भारतीय आर्मी गप्प बसणार नाही त्यामुळे हे असे भ्याड हल्ले करायच्या वेळेस हेच अतिरेकी आता १० नाही किमान १०० वेळा तरी नक्कीच विचार करतील!

आमच्या सैनिक बांधवांचे जीव अनमोल आहेत, त्यांचे रक्त ह्या अशा हल्ल्यात सांडावे इतके स्वस्त नाही.

 

terrorism-inmarathi
img.theweek.in

 

प्रत्येक सामान्य भारतीयाच्या मनात ह्या नीच कृत्याचा संताप अजूनही आहे आणि आपले सैनिक बंधू आपल्यापासून हिरावून गेल्याचे दुःख अजूनही आहे. आदिल दार असे त्या नीच दहशतवाद्याचे नाव होते ज्याने हा आत्मघातकी हल्ला केला.

तो दक्षिण काश्मीरमधील काकेपुरा ह्या ठिकाणचा, म्हणजेच तो कोणीही दुसऱ्या देशातला नसून आपल्याच देशातला अस्तनीतला साप ठरला.

असेच भारताच्या अस्तनीत अनेक विषारी साप आहेत जे ह्या भीषण घटनेचे सुद्धा राजकारण करून आपली पोळी भाजून घेत आहेत.

अनेक लोकांनी टीव्हीवर डीबेट शो मध्ये सहभागी होऊन प्रचंड बेजवाबदार आणि बेताल वक्तव्ये केली, जी आपण पहिली असतीलच! या मृत सनिकांच्या टाळूवरच लोणी खाऊन ही पापं कुठे फेडणार ही लोकं देवच जाणे!

पुलवामा येथे हुतात्मा झालेल्या सर्व सैनिक बांधवांस विनम्र श्रद्धांजली! बंधूंनो ,तुमचे बलिदान हा देश कधीही विसरणार नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?