' ब्रिटिशांनी अवलंबलेली ‘ही’ अत्याचाराची पद्धत आजही प्रचंड संतापजनक आहे! – InMarathi

ब्रिटिशांनी अवलंबलेली ‘ही’ अत्याचाराची पद्धत आजही प्रचंड संतापजनक आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतात ब्रिटिशांची दीर्घ काळ सत्ता होती. आपल्या सत्ताकाळात ब्रिटिशांनी भारतीय जनतेवर प्रचंफ अन्याय केले. ह्या अन्यायातूनच पुढे भारतीय असंतोषाचा व त्यातून स्वातंत्र्य लढ्याचा जन्म झाला. हा इतिहास आपण सर्व जाणतो.

ब्रिटिश राजसत्तेने भारतात अनेक सुधारणा घडवल्या. रेल्वे, पोस्ट, तार, औद्योगिकिकरण, यांत्रिकीकरण ह्या सारख्या गोष्टींची मुहूर्तमेढ भारतात रोवली.

आपल्याला प्रश्न पडला असेल की जर ब्रिटिशांनी इतक्या सुधारणा राबविल्या होत्या तरी इथला समाज त्यांचा सत्तेविरुद्ध का पेटून उठला होता. इथल्या समाजाच्या मनात ब्रिटिश विरोधी भावना निर्मिती का झाली?

 

british inmarathi

 

मुळात ह्या प्रश्नाचं उत्तर अनेक प्रकारे देता येऊ शकतं. त्याच्या मागची अनेक कारणं आहेत, असंख्य बाबी आहेत, असंख्य घटना आहेत.

पण ह्या सर्वात एक महत्वपूर्ण कारण जे ह्या असंतोषाची ठिणगी पडण्यास कारणीभूत आहे, ज्या कारणामुळे ब्रिटिश राजसत्तेच्या क्रूरतेची प्रचिती आपल्याला आल्यावाचून राहणार नाही.

 

british raj inmarathi

 

हे कारण खूप महत्त्वाचं असून देखील आज त्याविषयी फार कमी भारतीयांना माहिती आहे. तर ते कारण कोणतं आहे त्याबद्दल आपण आज जाणून घेऊ….

भारतात ब्रिटिश राजसत्ता येण्याआधी ग्रामीण अर्थव्यवस्था अस्तित्वात होती. ही ग्रामीण अर्थव्यवस्था परस्पर पूरक स्वरूपाची होती. ह्या ग्रामीण व्यवस्थेमुळे लोक एकमेकांवर अवलंबून राहत असत.

शेती हा मध्यस्थानी असलेला व्यवसाय होता, ह्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून सर्व इतर व्यवहार ही परस्परावलंबी होते.

मुघल राजसत्तेच्या काळात देखील हीच पद्धत अस्तित्वात होती. लोक प्रामुख्याने धान्याचा पिकांचे उत्पादन करायचे. ह्या पिकांच्या लागवडीतूनच पुढे होणाऱ्या देवाणघेवाणीवर कर व्यवस्था ही आधारलेली होती.

तेव्हा दुष्काळसदृश्य परिस्थिती जरी निर्माण झाली तरी लोकांना त्या दुष्काळाची झळ बसत नव्हती. मोठ्या प्रमाणावर धान्य साठा हा साठवून ठेवलेला असायचा.

पण जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीच्या रुपात भारतात ब्रिटिश अंमल आला तेव्हा मात्र चित्र बदललं.

 

farming inmarathi
business today

 

ब्रिटिशांनी प्लासीच्या लढाईत विजय मिळवत भारतावर ताबा मिळवला. ब्रिटिशांनी असं करत करत संपूर्ण भारताची सत्ता ताब्यात घेतली. भारताची सत्ता ताब्यात आल्यावर ब्रिटिशांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेवर घाला घालायला सुरुवात केली.

त्यांनी सर्वप्रथम शेतीव्यवस्थेला टार्गेट करायला सुरुवात केली. सर्वप्रथम शेतीवर बेसुमार कर आकारणी करण्यात येऊ लागली, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते.

यावरच न थांबता त्यांनी खाद्य पिक पदार्थांऐवजी नगदी पिक जसे कापूस आणि अफीमची लागवड करायला जबरदस्ती शेतकऱ्यावर केली. ह्यामुळे पुढे जाऊन अन्न धान्याचा तुटवडा निर्माण होऊ लागला.

सोबतच ह्या नगदी पिकांची निर्यात ही अमर्याद रित्या सुरू ठेवण्यात आली त्यामुळे शेतकऱ्यांना ही पिके घेणं भाग पडू लागलं.

जर समजा एखाद्या वर्षी नैसर्गिक दुष्काळ पडला तरी त्यावर्षी ही पिके धान्याचा पिकांचा ऐवजी उत्पादित करायला लावली होती. त्यामुळे अन्न धान्याचा पिकांच्या तुटवड्या मुळे भूकबळीची संख्या वाढायला सुरुवात झाली.

 

drought-inmarathi
british.com

 

दुष्काळग्रस्त भागात उत्पादन कमी असलं तरी निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणावर कच्चा माल एकत्रीत केला जाऊ लागला. धान्य कडधान्याचा पिकांची लागवड न करता आल्यामुळे अन्न धान्याचा प्रचंड तुटवडा निर्माण होई.

नैसर्गिक दुष्काळ सदृश्य परिस्थिती असो वा नसो अन्न धान्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. याला “कृत्रिम दुष्काळ” म्हटले जाऊ लागले.

प्रामुख्याने बिहार आणि बंगाल मधील शेतकरी ह्या कृत्रिम दुष्काळाचे बळी ठरले होते. गंगेचा पट्टा हा खाद्यान्न पिकांसाठी योग्य मानला जात होता पण तरीही इंग्रजांच्या जबरदस्तीने तिथे अफू सारख्या पिकांची लागवड केली जाऊ लागली.

ह्याचा विपरीत परिणाम तिथल्या अर्थव्यवस्थेवर तर झालाच पण तिथल्या सामान्य शेतकऱ्यांच्या आयुष्यावर झाला.

आधीच अन्न धान्याचा तुटवडा त्यात अफूमुळे होणारी विषबाधा ह्यामुळे किती तरी लोक दगावले होते. एका आकडेवारीनुसार ब्रिटिशांची सत्ता असताना कृत्रिम व नैसर्गिक दुष्काळात मरण पावणाऱ्या लोकांची संख्या तब्बल १ कोटी इतकी होती.

 

british-drought-inmarathi
bharatwiki.com

 

रिचर्ड टेम्पन नावाच्या ब्रिटिश गव्हर्नरचया कार्यकाळात तर परिस्थिती अजूनच खालावली होती. त्याचा कार्यकाळात असंख्य लोकांनी दुष्काळात प्राण गमावल्याचा नोंदी आहेत. इतकंच नाहीतर त्याने लावलेल्या अमानवीय कर रचनेमुळे भारतीय शेतकरी हवालदिल झाला होता.

ह्या जाचक कर रचनेला त्रस्त होऊन अनेक लोकांनी शेती करणं सोडलं आणि उत्पन्नाचे साधन म्हणून इंग्रजांची चाकरी स्वीकारली, इंग्रजांनी त्यांचा वापर आपल्या उद्योगांच्या उभारणीत, रेल्वेचे जाळे विस्तारण्यासाठी केला.

 

indian people inmarathi
harper broadcast

 

इंग्रज सामान्य लोकांना एक वेळच्या जेवणाच्या मोबदल्यात राबवून घेत. अत्यंत अमानुष आणि रानटी व्यवहार इंग्रज ह्या लोकांसोबत करत.

त्यांचावर जुलूम करत, बायकांसोबत भोगविलास करत, लोक हा जुलूम मुकाट्याने सहन करत कारण इंग्रज त्यांच्या पोटाची सोय करत असत, त्यांना खायला अन्न देत असत पण यात क्रूरतेचि कडी म्हणजे त्या अन्नाचा दर्जा प्रचंड खराब असे. त्या अन्नाची पोषणमात्रा ही फार कमी असे.

बरेच लोक विषबाधा होऊन दगावत, अनेक बालकं कुपोषणाने दगावली.

 

fiamine-inmarathi
Tutorialspoint.com

 

एका ब्रिटिश वैद्यकीय अधिकाऱ्याने लिहून ठेवलेल्या डायरीत उल्लेख करताना म्हटलं आहे की त्यावेळी भारतीयांना जे अन्न इंग्रज द्यायचे त्याचा दर्जा दुसऱ्या महायुद्धावेळी नाझी ज्यू लोकांना द्यायचे त्या अन्नापेक्षा खराब होता.

यावरून तुम्हाला इंग्रजांनी केलेल्या जुलमाची कल्पना येऊ शकते. ह्या जुलमामुळे जनतेत असंतोष धुसमसत होता.

पुढे जाऊन १८५७ चा उठाव आणि त्यानंतरच्या स्वातंत्र्य चळवळीच्या उभारणीत ह्या असंतोषाने मोलची भूमिका बजावली.

अश्या प्रकारे ब्रिटिशांनी भारतात कृत्रिम दुष्काळ निर्मिती करून इथल्या शेतीवर आधारित ग्रामीण अर्थव्यवस्थेची घडी विस्कळीत केली आणि आपलं साम्राज्यवादी धोरण राबवून आपलं राज्य प्रत्येक आघाडीवर बळकट केलं. भारतीयांची स्वायत्तता नष्ट करून त्यांना गुलाम बनवले होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?