' भारतीयांचं श्रद्धास्थान असलेल्या ह्या देवीचं मूळ मंदिर “पाकिस्तानात” यात्रा घडवून आणतंय! – InMarathi

भारतीयांचं श्रद्धास्थान असलेल्या ह्या देवीचं मूळ मंदिर “पाकिस्तानात” यात्रा घडवून आणतंय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आश्चर्य वाटलं ना ? पण हे खरय. पाकिस्तानात हिंदू धर्माच्या ह्या देवीची आजही मनोभावे पूजा केली जाते इतकच नव्हे तर हिंदु संप्रदायाइतकाच मुलीम संप्रदायही ह्या देवास्थानाचे महत्व जाणतो आणि त्यांची देवीवर श्रद्धाही आहे.

तर चला आज ह्या प्राचीन देवस्थानाबद्दल  सविस्तर जाणून घेऊया

पाकिस्तानातील बलूचिस्तान राज्यामध्ये स्थित असलेल्या मां हिंगलाज हे पाकिस्तानमधील हिंगलाज नामक देवळात हिंगलाज देवीचे प्रतिरूप असलेली हिंगलाज देवीची प्रतिमा  प्राचीन काळापासून स्थापित आहे.

 

hinglaj mata pakistan InMarathi

 

ही प्रतिमा अतिशय आकर्षक आणि मोहक आहे, हिंगलाज देवीची ख्याती फक्त पाकिस्तान आणि कराचीतच नाही तर संपूर्ण भारतात पसरलेली आहे. हे देऊळ कराची जिल्ह्यातील बारी कलान या सुंदर टेकडीच्या पायथ्यामध्ये स्थित आहे.

हे देऊळ इतकं प्रसिध्द आहे की वर्षाचे संपूर्ण ३६५ दिव इथे भाविकांची जत्रा भरलेली असते.

नवरात्रि दरम्यान येथे नऊ दिवस शक्तीची पूजा करण्याचे विशेष व्यवस्था केलेली आहे. सिंध-कराची चे भक्त सिंधी भक्त इथे लाखोंच्यासंख्येने  दर्शनाला येतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

बरेचदा काही चमत्कारिक ठिकाणे, त्यांचे संदर्भ आपल्याला आश्चर्यचकित करतात. त्यांचे उगम शोधायला गेलो तर एक तर काहीही एक संदर्भ हाती लागत नाही आणि जे सापडतात  ते थक्क करणारे असतात. ह्या देवास्थानाबाद्द्ल असेच काहीसे म्हणावे लागेल

हे हिंगलाज देवीचे देऊळ ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे. पुराणातील प्रसिद्ध कथेनुसार राजा दक्ष याने आपल्या यज्ञात आपलाच जावई असणाऱ्या शंकराला बोलावले नाही. शंकराच्या पत्नीला, सतीला हा अपमान सहन न झाल्यामुळे तिने त्या यज्ञातच उडी घेतली.

परंतु तिचे शरीर जळाले नाही. उद्विग्न झालेल्या शंकराने ते शरीर पाठीवर टाकले आणि तो मार्गक्रमण करू लागला.,.

 

tandav-inmarathi
awaznation.com

त्या शरीराचे विविध अवयव पृथ्वीवर अनेक ठिकाणी पडत गेले. ज्या ज्या ठिकाणी ते अवयव पडले त्या त्या ठिकाणी शक्तिपीठे तयार झाली. त्या कथेनुसार तिचे शीर जिथे पडले ते स्थान आता पाकिस्तानातील बलुचिस्तान या प्रांतात आहे.

कराचीच्या वायव्येला सुमारे २५० कि.मी. वर बलुचिस्तान प्रांतातल्या मकरान टेकडय़ांच्या प्रदेशात हिंगोल नदीच्या काठावर एका गुहेमध्ये हे देऊळ आहे.

ह्याला नानी बीबी ह्या नावानेही ओळखले जाते, इथली मुसलमान जनता नानी बीबी या नावाने या देवीची पूजा करतात.

गुजरातमधील सोनारकाम करणाऱ्या पराजिया सोनी जातीची ती कुलदेवता आहे. याच जातीमधील एक पुरुष हुकुमीचंद याला देवीने सुवर्ण कारागिरी शिकवल्याची कथा सांगितली जाते.

तर स्थानिक समजुतीनुसार हिंगाचा व्यापार करणाऱ्या बलुची व्यापारी मंडळींबरोबर त्यांची ही देवी गडिहिंग्लज या ठिकाणी आल्याचे सांगतात. ही व्यापारी मंडळी ज्या मोठय़ा व्यापारी पेठ असलेल्या ठिकाणी गेली तिथे त्यांनी त्यांची ही देवी प्रस्थापित केली.

 

hinglaj-mata InMarathi

हिंगलाज देवीचे आणखी एक देऊळ राजस्थानमध्ये हिंगलाजगढ या ठिकाणी आहे. तर कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यतदेखील ही देवी विराजमान असून तिथे तिला चंदला परमेश्वरी अशा नावाने संबोधले जाते.

माता हिंगलाजच्या मंदिरात जायचे कसे –

इथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक टेकडी आणि दुसरी वाळवंट.

कराचीपासून गजरापर्यंत यात्राकारूंचा गट एकत्र जातो, विमानसेवा उपलब्ध आहे. आणि नंतरचा प्रवास आणि नंतर स्थानिक वाहनांत केला जातो.

माता हिंगलाज देवीची यात्रा करणे कठीण आहे कारण रस्ता फार वाईट अवस्थेत आणि जिथवर नजर जाईल तिथवर यात्रेकरू व्यतिरिक्त इतर कोणाचा मागमूसही दिसत नाही

ह्या प्रवासात बऱ्याच नद्या आणि विहिरी देखील आढळतात. त्यापुढील वाळूची कोरडी पावसाळी नदी आहे. चंद्रकूप पर्वताजवळ या भागातील सर्वात मोठी हिंगोल नदी आहे. चंद्रकूप आणि हिंगोल नदी दरम्यान १५ मैलांचे अंतर आहे.

हिंगोलमध्ये भाविक आपले केशवपन करून जानवे धारण करतात आणि नंतर गीतापठाण केले जाते अशाप्रकारे देविप्रती आपली श्रद्धा आणि आदर व्यक्त केला जातो.

 

hinglaj-mata 1 InMarathi

इथून पुढच प्रवास पायीच करावा लागतो कारण इथून पुढे नीट रस्ता नाहीये. त्यामुळे ट्रक किंवा जीप अशा वाहनाने प्रवास करणे शक्य होत नाही.

हिंगोल नदीच्या किनाऱ्यावरून पुढे जाताना भाविक देवीचे गुणगान करत पुढे जात राहतात. इथून पुढे आशापुरा नावाचे स्थान आहे, येथे भाविक मंडळी थोडावेळ विश्रांती घेतात.

आपले प्रवासातले कपडे बदलून दुसरे कपडे घालतात आणि काढून ठेवलेले कपडे गरजू व्यक्तीला दान देतात. आनखी थोड पुढे कालीमातेचे देऊळ आहे.

 

hinglaj-mata 2 InMarathi

ह्या देवळाचा इतिहासात उल्लेख केलेला आढळतो की हे देऊळ येथे जवळ जवळ दोन हजार वर्षांपूर्वी पासून अस्तित्वात आहे.

ह्या देवळात पूजाविधी आटोपले की भाविक पुढच्या प्रवासाला म्हणजेच हिंगलाज देवीच्या स्थानासाठी पुढे निघतात. पुढे रस्त्यात एक डोंगर लागतो त्यावर चढाई करून जावे लागते.

ह्या डोंगारावर पिण्याच्या  गोड पाण्याच्या तीन विहिरी आहेत. हे पाणी प्यायलं की आपल मन शुध्द होऊन आपली सर्व पापांपासून मुक्ती होते अशी मान्यता आहे. आणि इथून जवळच असलेल्या डोंगरातल्या गुहेत हिंगलाज देवीचे हे सुप्रसिध्द देऊळ आहे.

 

hinglaj-mata 3 InMarathi

ह्या देवळाला प्रवेशद्वार नाहीये. परीक्रमा सुद्धा गुहेतच करावी लागते. इथे भाविक गुहेच्या एका टोकाने जाऊन दुसऱ्या टोकाने बाहेर निघून जातात. देवळाला लागुनच, गुरु गोरखनाथ का चश्मा’ नावाची जागा आहे.

अशी मान्यता आहे की हिंगलाज देवी येथे दररोज सकाळी आंघोळ करायला येते.

हिंगलाज देवळात जाण्यासाठी दगडी पायऱ्या चढून जावे लागते. सर्वप्रथम दर्शन होते आपल्या लाडक्या विघ्नहर्त्या गणेशाचे आणि त्या नंतर समोरच वैष्णो देवीच्या प्रतिमेशी साम्य असणाऱ्या हिंगलाज देवीच्या मोहक रूपाचे दर्शन होते.

भारत पाक साम्बंधाच्या पार्श्वभूमीवर हिंगलाज देवीसाठी असणारी पाकिस्तानस्थित मुस्लीम संप्रदायाची आस्था आणि भक्ती नक्कीच आपल्याला आश्चर्य चकीत करून जाणारी आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?