' तुम्ही पेट्रोल पंपावर मोबाईल का वापरु शकत नाहीत? वाचा…. – InMarathi

तुम्ही पेट्रोल पंपावर मोबाईल का वापरु शकत नाहीत? वाचा….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मोबाइल फोन येण्या आधी पेट्रोल पंपावर “धूम्रपान करू नये” अशी पाटी असायची. पण मोबाईल फोन्स आल्यानंतर पेट्रोल पंपावर मोबाईल फोन वापरू नये अशी पाटी सर्रास लावलेली दिसते.

बरेच लोक ह्या सूचनेचे प्रामाणिकपणे पालन देखील करतात पण काही लोक ही सूचना तितक्याशा गांभीर्याने घेत नाहीत.

मोबाईल फोनचा वापर पेट्रोल भरताना देखील करतात अशा वेळी पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी त्यांना त्यांचे फोन बंद करण्यास सांगतात.

पण पेट्रोल आणि मोबाईल फोन ह्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे? किंवा त्या ठिकाणी मोबाईल वापरल्यामुळे ज्वालाग्राही पदार्थांचा स्फोट किंवा अन्य काही अपघात होऊ शकतात का?

 

Petrol-Bunk-Scam-India-inmarathi
cartoq.com

 

ह्यासंदर्भात नेमके काय नियम आहेत? आज ह्याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

साधारणपणे आपला असा समज असतो की पेट्रोल पंपावर मोबाईल फोन वापरण्यास बंदी आहे कारण मोबाईल फोन मुळे आग लागत असेल.

पण अनेक शास्त्रज्ञ म्हणतात की मोबाईल फोनमुळे आग लागण्याचा धोका नाही.

ह्याच सिद्धांताचा २०१७ साली युके पेट्रोलियम इंडस्ट्री असोसिएशन लिमिटेडने अभ्यास केला आणि पेट्रोल पंपावर मोबाईल फोन वापरणे खरंच धोकादायक आहे का आणि ह्याचे काय कारण आहे ह्यात स्पष्टता यावी म्हणून एक विधान जाहीर केले.

“पूर्वी जगात असे सगळीकडे पसरले होते की मोबाईल फोन मुळे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असताना पेट्रोलच्या व्हेपर्सना म्हणजे पेट्रोलच्या वाफांना आग लागू शकते आणि मोठा अपघात होऊ शकतो. फक्त पेट्रोलच नव्हे तर इतर ज्वालाग्राही पदार्थांना मोबाइल फोन मुळे आग लागू शकते.

हे असे समज सगळीकडे पसरलेले असल्याने युकेमधील आयटी, टेलिकॉम आणि इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीच्या ट्रेड असोसिएशनचे काम करणारी इंटेलेक्ट ही कंपनी व एनर्जी इन्स्टिट्यूटने मिळून मोबाईल फोनमुळे ज्वलनशील बाष्पांचे होणारे प्रज्वलन ह्यावर अभ्यास आणि संशोधन केले.

 

mobile phone shape06-marathipizza
iywlovelove.blogspot.in

 

ह्या संशोधनाचे रिझल्ट्स एका टेक्निकल सेमिनारमध्ये सादर करण्यात आले. ह्यातील मुख्य निष्कर्ष असे आहेत की जगात कुठेही नक्की मोबाईल फोनमुळेच प्रज्वलन झाल्याची घटना घडलेली नाही.

मोबाईल फोन हे शंभर टक्के संरक्षित / सुरक्षित उपकरण म्हणून डिझाईन केलेले नाही. तरीही मोबाईल फोनमुळे प्रज्वलन होण्याची शक्यता अगदीच नगण्य आहे.

तसेच कुठल्याही इंधन असंलेल्या ठिकाणी मोबाईल फोन पेक्षा इतरच अनेक गोष्टी प्रज्वलन घडवू शकतील अश्या असतात.” मग असे असताना पेट्रोल पंपावर मोबाईल फोन का वापरायचा नाही?

UKPIA च्या मते पुढील दोन कारणांमुळे पेट्रोल पंपावर मोबाईल फोन वापरण्यास बंदी आहे.

 

cellphone-inmarathi
dailyexpress.com

 

एक म्हणजे पेट्रोल पंपावर मोबाईल फोन वापरायला परवानगी दिली तर त्यामुळे तेथे पेट्रोल भरून देण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीचे गाडीत पेट्रोल भरताना दुर्लक्ष होऊ शकते.

त्यामुळे पेट्रोल चुकून खाली सांडले तर मात्र अपघाताला निमंत्रण मिळेल.

तसेच त्या ठिकाणी पेट्रोल भरून घेणारी मंडळी मोबाईल फोनमध्येच बिझी झाली तर रस्त्यांवर जसे ड्रायव्हरच्या चुकीमुळे अपघात होतात तसेच अपघात पेट्रोल पंपावर देखील होऊ लागतील. कारण तिथेही वाहते ट्रॅफिक असते.

ह्याचे दुसरे कारण म्हणजे इन्सेंडिव्ह स्पार्किंग होऊ नये म्हणून ज्वालाग्राही पदार्थांजवळ मोबाईल फोन वापरण्यास बंदी आहे. मोबाईल फोन्स स्फोटक वातावरणात वापरण्याजोगे डिझाईन केलेले नाहीत. आणि तसा वापर करण्यास प्रमाणित देखील केलेले नाहीत.

पेट्रोल पंपावर स्फोटक ज्वालाग्राही पदार्थ इतक्या मोठ्या प्रमाणात असल्याने स्फोटक वातावरण असते. म्हणूनच पेट्रोलियम परवान्याच्या अटी आणि संबंधित मार्गदर्शनांच्या अटींअंतर्गत मोबाईल फोन्सचा वापर कायद्याद्वारे स्पष्टपणे प्रतिबंधित आहे.

 

mobile-off-board-inmarathi

 

मोबाईल फोन मधून अतिशय कमी प्रमाणात एनर्जी उत्सर्जित होते. जरी मोबाईल फोन्समुळे इन्सेंडिव्ह स्पार्किंग होण्याची शक्यता कमी असली तरीही ते आंतरिकदृष्ट्या सुरक्षित नाहीत आणि पेट्रोलपंपासारख्या घातक ठिकाणी वापरले जाऊ नयेत.

मोबाईल फोनची बॅटरी खराब झाली असेल तर मग आग लागण्याचा धोका उद्भवू शकतो. (खरे तर असे होणेही जवळजवळ अशक्य आहे)

पेट्रोल पंपापासून थोड्या अंतरावर असलेल्या पार्किंग लॉटमध्ये किंवा दुकान, एटीएम अश्या नॉर्मल ठिकाणी मोबाईल फोन वापरण्यास काहीच हरकत नाही.

तसेच पेट्रोल पंपावर कारमध्ये बसले असताना आणि कारचे इंजिन बंद असताना देखील मोबाईल फोनचा वापर करणे सुरक्षित आहे असेही ह्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

पण गाडी चालवणाऱ्यांनी पेट्रोल भरताना मात्र मोबाईल फोन वापरू नये आणि स्वतःचा व इतरांचाही जीव धोक्यात घालू नये.

 

Flames-inmarathi
mirror.com

 

खरे तर जनरल ट्रॅफिक रेग्युलेशनच्या ११५व्या आर्टिकल मध्ये असे म्हटले आहे की “पेट्रोल पंपावर गाडीचे इंजिन, लाइट्स आणि रेडियो सारख्या इलेक्ट्रिकल सिस्टिम्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी उत्सर्जित करणारी सगळी उपकरणे सक्तीने बंद केली पाहिजेत.” परंतु आपण ह्यातले काहीच पाळत नाही.

लक्ष विचलित झाले की अपघात घडण्याची शक्यता खूप असते. त्यामुळे किमान ह्या ठिकाणी तरी स्वतःचा व इतरांचाही जीव सुरक्षित राहावा म्हणून थोड्या वेळासाठी मोबाईल फोन बंद ठेवायला काय हरकत आहे?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?