' अजित धोवालांचं कुटुंब टॅक्स चुकवणाऱ्या कंपन्या चालवतं? धक्कादायक खुलासा करणारा मीडिया रिपोर्ट! – InMarathi

अजित धोवालांचं कुटुंब टॅक्स चुकवणाऱ्या कंपन्या चालवतं? धक्कादायक खुलासा करणारा मीडिया रिपोर्ट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मात्र यावेळेस त्याचे कारण काहीसे वेगळे आहे. त्यांच्या कुटुंबियांकडून चालविण्यात येणाऱ्या हेज फंड कंपनीमुळे एक नवा वाद उभा राहिला आहे.

इंग्रजीतील “कारवान” या नियतकालिकात शोधपत्रकार कौशल श्रॉफ यांनी अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर आणि केमन आयलँड्स इथून कागदपत्रे शोधून काढली आणि हेज फंड कंपनी अजित डोभाल यांच्या मुलांची असल्याचे उघड केले आहे.

अजित डोभाल यांना दोन मुले असून मोठा मुलगा शौर्य डोभाल तर लहान मुलगा विवेक डोभाल आहे.

हेज फंड म्हणजे काय तर “मोठी जोखीम, मोठी गुंतवणूक, संधी आणि अधिक उत्पन्न” या तत्वावर विश्वास असणारे मोठमोठे गुंतवणूकदार यांत गुंतवणूक करतात.

थोडक्यात हा काही सामान्य गुंतवणूकदारांचा खेळ नाही.

 

investment-inmarathi
angel-investor.review

आता या प्रकरणात वादग्रस्त काय आहे,

१) विवेक डोभाल संचालक असलेले GNY ASIA FUND ही कंपनी जिथून चालवली जाते ते केमन आयलँड्स हे “करांसाठी स्वर्ग” म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणांचे वैशिष्ट्य म्हणजे इथे कर द्यावा लागत नाही अथवा अत्यंत कमी असतो.

शिवाय विदेशी शासनाला माहितीची देवाण – घेवाण किमान स्वरूपात होते. इथे होण्याऱ्या व्यवहारांमध्ये किमान पारदर्शकता असली तरी चालते.

२) २१ नोव्हेंबर २०१६ रोजी विवेक डोभाल कंपनीने केमन आयलँड्मध्ये आपल्या कंपनीची नोंदणी केली. म्हणजे नोटबंदीच्या १३ दिवसांनी ही नोंदणी झाली आहे.

नोटबंदीचा विशेष उल्लेख करण्याचे कारण असे की २०१७ मध्ये परकीय थेट गुंतवणूकीतून भारतीय बाजारपेठेत केमॅन बेटांमधून येत असलेली रक्कम मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

त्या आर्थिक वर्षासाठी भारतीय रिजर्व बँकेच्या वार्षिक अहवालातील आकडेवारीवरून दिसून येते की केमॅन आयलंडमधील एफडीआय हा  २२२६ टक्क्यांनी वाढला आहे, जो गेल्या आर्थिक वर्षात ४९ दशलक्ष अमेरिकी डॉलर्सवरून ११४० दशलक्ष डॉलरवर गेला आहे.

 

Bank customer rights.marathipizza
pbs.twimg.com

केवळ दोन तिमाहीत डिसेंबर २०१७  आणि मार्च २०१८ मध्ये केमन बेटांमधून संचयी थेट परकीय गुंतवणूक १.०८ अब्ज डॉलर्स वर गेली आहे.

म्हणजे किती पैसा या स्वरूपात आला तर तुलना करायची झाल्यास केमन आयलँडमधून भारतात आलेला हा पैशाचा ओघ म्हणजे या शतकाच्या पहिल्या १६ वर्षांत जितका पैसा आला तितकाच पैसा या २०१७-१८ या एका आर्थिक वर्षात आला आहे.

३) या कागदपत्रांमध्ये असेही दिसून आले आहे की, विवेक डोभाल यांचे परदेशस्थ उद्योग आशियातील आपल्या मोठ्या भावाच्या म्हणजे शौर्य डोभाल यांच्या व्यवसायाशी संबंधित आहेत.

जे लोक विवेक डोभाल यांच्या व्यवसायाशी संबंधित आहेत तेच शौर्य डोभाल यांच्या व्यवसायाशी संबंधित आहेत. थोडक्यात दोन्ही भावांचे स्वतंत्र उद्योग दिसत असले तरी ते एकाच साखळीचे भाग आहेत.

४) फेब्रुवारी २०१७ मध्ये भारतात एक गुंतवणूक परिषद झाली जी Edelweiss Group ने आयोजित केली होती. यात विवेक डोभाल यांच्या GNY ASIA FUND ने भाग घेतला होता.

 

vivek-doval-inmarathi
oneindia.com

अतिशय छोट्या प्रमाणात भांडवल असलेली ही कंपनी जगातील बलाढ्य बँकांसोबत वाटाघाटी करत होती. त्यावेळेस या कंपनीकडे Legal Entity Identifier Code सुद्धा नव्हता जो त्यांना पुढे सप्टेंबर २०१७ मध्ये मिळाला. हा २० आकडी कोड सदर कंपनी सुरक्षित गुंतवणूक करण्यास सक्षम आहे का यासाठीचे एक परिमाण आहे.

याचवेळेस सेबी या भारतीय संस्थेच्या “फॉरेन पोर्टफोलिओ रेजिस्टार” साठी सुद्धा नोंदणी झाली नव्हती. तेव्हा अशा मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीसाठी या बँका कशी बोलणी करू शकत होत्या?

५) GNY Capital ही GNY ASIA ची सल्लागार कंपनी असून दोन्ही ठिकाणी विवेक डोभाल संचालक आहेत. तर या GNY Capital ने आपला व्यावसायिक पत्ता बदलला तर जो नवीन पत्ता आहे त्या पत्त्यावर आधीच १२० कंपन्यांनी नोंदणी केलेली आहे.

कागदपत्रांमध्ये वरील तथ्य आढळल्यानंतर याबाबत अजित डोभाल, त्यांचे पुत्र शौर्य डोभाल, विवेक डोभाल आणि Edelweiss Group यांना यासंबंधी प्रश्नावली पाठविण्यात आली जेणेकरून त्यांच्याकडून काही खुलासा होईल, पण एकानेही त्याला उत्तर दिलेले नाही. 

गेल्या काही वर्षांपासून अजित डोभालांचा मोठा मुलगा शौर्य डोभाल सार्वजनिक जीवनात आहेत.

परदेशातील गुंतवणूक व्यवस्थापक म्हणून कारकिर्दीनंतर २००९ साली शौर्य भारतात परतले. त्यानंतर काही काळानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते राम माधव यांच्यासोबत काम करीत असून इंडिया फाऊंडेशनचे संचालक आहेत.

 

no-ball-inmatathi
youtube.com

काही वर्षांपासून या संस्थेने दिल्लीतील “थिंक टॅंक” अशी ओळख मिळवली आहे. या संस्थेने अनेक परराष्ट्र राजदूत व मान्यवरांसह विविध बैठकी आयोजित केल्या आणि न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये झालेल्या पंतप्रधानांचा कार्यक्रम आयोजित करण्यात मदत केली.

भाजपचे अनेक मंत्री इंडिया फाऊंडेशनचे संचालक म्हणून काम करतात आणि केंद्र सरकारचे जवळचे सल्लागार म्हणून त्यांची भूमिका सर्वांनाच ज्ञात आहे.

माध्यमांच्या माहितीनुसार असे दिसते की, शौर्य आता राजकीय कारकीर्दीचा देखील श्रीगणेशा करत आहेत.

डिसेंबर २०१७ मध्ये त्यांनी उत्तराखंडमधील भाजपच्या कार्यकारी कार्यकारिणीच्या बैठकीत भाग घेतला आणि अलिकडच्या काही महिन्यांत ते अधिकृतपणे राज्यात रहात आहेत.

डोभाल कुटुंब पौड़ी गढ़वाल जिल्ह्यातील आहे, जो भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक जिल्हा आहे. ही जाग शौर्य डोभाल २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत लढण्याची शक्यता आहे.

 

no-ball-inmatathi
haribhoomi.com

गेल्या वर्षापासूनच त्यांनी जनसंपर्कांचा एक भाग म्हणून जिल्ह्यात रोजगार, आरोग्य आणि शिक्षण सुधारण्याच्या उद्देशाने सामाजिक कार्यक्रम सुरू केले आहेत.

एकंदरीत वरील आरोप हे पाहता हा भ्रष्टाचार आहे का? याचा खुलासा होण्यासाठी मोठी प्रक्रिया पार पाडावी लागेल पण नैतिकदृष्ट्या हे किती योग्य आहे, कारण अजित डोभाल आणि एस गुरुमूर्ति (जे सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळावर आहेत. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जवळचे देखील आहेत.) यांनी २०११ मध्ये भारतीय जनता पक्षाला “इंडियन ब्लॅक मनी अब्रॉड: इन सीक्रेट बँक्स अँड टॅक्स हेव्हेन्स” या नावाने अहवाल सादर केला होता.

ज्यात काळ्या पैशाला अशा कंपन्या आणि “करांसाठी स्वर्ग” असलेली ठिकाणे कशी जबाबदार आहेत आणि त्यांच्याविरुद्ध कशी कडक पावले उचलावीत यासंबंधी माहिती देण्यात आली होती.

“भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा” हे काही सत्ता मिळवण्याचे साधन नाही तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

तेव्हा अजित डोभाल यांनी या प्रकरणात आपली बाजू मांडावी. याशिवाय शोधपत्रकारिता आपल्या देशात तशी अपवादानेच होत असते. तेव्हा या प्रयत्नाचे स्वागत व्हायला हवे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?