भारतात सैन्य दिनाच्या परेडमधील नारीशक्तीचा हा जागर आजही प्रेरणा देतो!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
आपण एकविसाव्या शतकात वावरतोय. झपाट्याने प्रगती करतोय. महासत्ता होण्याकडे वाटचाल करतोय. भारतातल्या पुरुष प्रधान संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर स्त्री पुरुष समानतेच्या हक्कासाठी अनेक पातळ्यांवर चळवळी सुरु आहेत.
अशाच एका सन्माननीय क्षेत्रात समानतेच्या दृष्टीने पहिले पाउल उचलले गेले आहे. हे चित्र नक्कीच आशावादी आहे.
आज महिला कशातही मागे नाहीत, प्रत्येकच क्षेत्रात त्यांनी सर्वोत्कृष्ठ कामगिरी करू स्वतःला सिध्द केलं आहे, अगदी प्रत्येकच क्षेत्रात महिलांनी बाजी मारली आहे.
गेल्या १५ जानेवारी २०१९ ला आर्मी परेड दिनी भारतीय महिलांच्या शिरपेचात एक आणखी मनाचा तुरा खोवला जाणार आहे.
आगामी ७१ व्या आर्मी डे परेडमध्ये भारतीय सेना लष्कराच्या सर्व्हिस कॉर्प्स (एएससी) दलाचे नेतृत्व लेफ्टनंट भावना कस्तुरी करणार यांनी केले होते. असे नेतृत्व करणाऱ्या त्या प्रथम महिला अधिकारी ठरल्या.
भारतीय लष्कराच्या इतिहासात हे प्रमच घडलं.
आर्मी डे दरवर्षी १५ जानेवारीला साजरा केला जातो. ह्या आधी २०१५ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडला कप्तान दिव्या अजित ह्यांनी महिलांच्या तुकडीचे नेतृत्व केले होते.
परंतु भारतीय लष्कराच्या इतिहासात हे प्रथमच घडले आहे, जेव्हा एक महिला अधिकारी आर्मी दिवसाच्या निमित्ताने भारतीय सैन्याच्या सर्व्हिस कॉर्प्स (एएससी) संघाचे नेतृत्व करते.
यात १४४ पुरुष कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. ह्यापूर्वी २०१५ साली, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण आपल्या देशाच्या सेना, वायुसेना आणि नौसेनांकडून निवडण्यात आलेल्या महिला अधिकार्यांना १४८ जवानांचा समावेश असलेल्या तुकड्यांचे नेतृत्व करताना पहिले होते.
लेफ्टनंट कस्तुरी म्हणाल्या,
ही पहिलीच वेळ आहे की एक महिला अधिकारी अशाप्रकारे पुढाकार घेण्याची संधी मिळते आहे. ह्या पूर्वी कधीही पुरुष जवानांच्या तुकडीच्या नेतृत्वासाठी कधीही महिला अधिकारी नेमली गेलेली नाही.”
ही संधी दिल्याबद्दल त्यांनी आर्मीचे आभार मानत कौतुकाचे उद्गार काढले, त्या म्हणाल्या ‘आर्मीचा हा निर्णय म्हणजे स्त्रीयांना सैन्यात संपूर्णपणे स्वीकारल्या गेल्याची खूण आहे, हा निर्णय म्हणजे आर्मीच्या रचनेत उत्क्रांती घडून येत असल्याचे प्रतिक आहे.
एएससी, जे लष्कराचे लॉजिस्टिक सपोर्ट फंक्शन हाताळते ते तब्बल २३ वर्षांच्या अंतराळानंतर ह्या परेड मध्ये भाग घेत आहेत.
गेल्या ह्या वर्षीच्या ७१ व्या आर्मी डे च्या परेड मध्ये लेफ्टनंट कस्तुरी व्यतिरिक्त कॅप्टन शिखा सुरभी, पहिल्यांदाच एक आर्मी डेअरडेव्हिल्स मोटरसायकल डिस्प्ले टीमचे नेतृत्व केले आहे.
यात मानवी पिरामिड बनलेल्या नऊ बाइक चालविणाऱ्या ३३ पुरुषांचा समावेश होता. डेअरडेव्हिल्स हा आर्मीच्या कॉर्प्स ऑफ सिग्नल्सचा एक भाग आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह २४ जागतिक रेकॉर्ड ह्यांच्या नावावर नोंदले गेलेले आहेत. कप्तान शिखा ह्या बाइक चालविताना पाहुण्यांना सलाम करतील आणि ह्या संपूर्ण डेअरडेव्हिल्स संघाचे नेतृत्व मेजर मनप्रीत सिंग ह्यांच्याकडे होते .
आर्मी डे परेड व्यतिरिक्त ही टीम २६ जानेवारी २०१९ रोजी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या परेडमध्ये आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले.
गेल्या वर्षी, आर्मी डे परेडदेखील प्रजासत्ताक दिनाच्या परेडसोबतच झाला आणि प्रथमच एम ७७७, ए २ अल्ट्रा लाइट होवित्झर आणि के ९ वज्र-टी तोफखाना प्रदर्शित केला गेला .
या बंदुकांचे महत्त्व म्हणजे १९८० च्या दशकातील बोफोर्स खरेदी केल्यापासून हीच पहिली मोठी तोफखाना खरेदी आहे. आता त्यांना चीन आणि पाकिस्तान करिता भारताच्या सीमेवर तैनात केले गेले .
नोव्हेंबर २०११ मध्ये एम ७७७ हावित्झर भारतीय लष्करात समाविष्ट करण्यात आले होते. ते साध्या आणि डोंगराळ प्रदेशात वापरले जाऊ शकते.
आर्मी डेचे महत्त्व
दरवर्षी १५ जानेवारीला आर्मी डे साजरा केला जातो. लेफ्टनंट जनरल के. एम. करिअप्पा यांनी जानेवारी १९४९ मध्ये भारताचे कमांडर-इन-चीफ म्हणून जनरल सर फ्रान्सिस बुचर यांची नेमणूक केली होती.
आपल्या देशाच्या सैनिकांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो, ज्यांनी देशाची निःस्वार्थ सेवा केली आणि देशप्रेम आणि बंधुत्वाचे महान उदाहरण ठेवले.
ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे की, अमेरिका, चीन आणि रशिया या सारख्या महासत्तांचा असणारया देशांच्या तुलनेत भारतीय लष्कर जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांपैकी एक आहे.
स्त्री पुरुष समानतेच्या पार्श्वभूमीवर आपल्या भारतीय सैन्यात महिला आधीकाऱ्याद्वारे पुरुष जवानांच्या तुकडीचे नेतृत्व करवले जाणे हा निर्णय अतिशय कौतुकास्पद आहे.
आपल्याकडे मुलींना करियर करताना फारच टिपिकल करियर ऑप्शन सुचवले जातात पण ह्या चाकोरीबाहेरही करियर करण्यासारखे बरेच सन्माननीय पर्याय महिलांसाठी उपलब्ध आहेत हे ह्यानिमित्ताने दिसून येतेय. डोळसपणे बघायला हवं.
सैन्यात पाठवण्यास फारसे पालक उत्सुक नसतात किंवा बरेचदा मुलीही सैन्याकडे करियर ह्या दृष्टीने पाहत नाहीत पण सैन्यात महिलांना वाव आहे, सन्मान आहे हे दर्शवणारी ही घटना अभिमानास्पद आणि समाधानकारक आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyrigh.t © InMarathi.com | All rights reserved