' जळणारा पश्चिम बंगाल आणि आंधळी (?) माध्यमे – InMarathi

जळणारा पश्चिम बंगाल आणि आंधळी (?) माध्यमे

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

निश्चलिकरण करून ५००/१००० च्या नोटा चालनातून मागे घेण्याच्या प्रक्रीयेत काही ठळक चेहरे समोर आले….समर्थकांचे आणी विरोधकांचेही! विरोध करणाऱ्या मुख्य व्यक्तीं पैकी एक पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री.

ह्याच बंगालमधून मागच्या आठवड्यापासून अप्रिय घटना ऐकू येत आहेत.

जवळपास सर्वच्या-सर्व वस्तुंची चोरी करून आगीच्या भक्षस्थानी पडलेली, मोडतोड केलेली शेकड्यांन घरं आणि असमाजीक तत्व गोंधळ घालत असताना बघ्याची भुमिका घेणारे सुरक्षाकर्मी सोशल मिडीयांत फिरणाऱ्या बऱ्याच चित्रफितीत  दिसत आहेत.

मुख्य प्रवाहातील प्रसार माध्यमांत (MAIN STREAM MEDIA-MSM) या घटनेसंदर्भात फारशी माहीती दिली जात नसली तरी सोशल मीडीयात या घटनांबाबत बऱ्याच उलट-सुलट चर्चा सुरु आहेत.

west-bengal-violence-02-marathipizza

घटना झाल्यात की नाही? त्यांची तीव्रता किती आहे? घटनांना जबाबदार कोण? आरोपी आणि बाधीत/पीडित लोक कोण आहेत ?

पैकी कोणत्याही प्रश्नांची माहीती मुख्य वृत्तपत्रांत/ वृत्तवाहीन्यांवर मिळत नाही.

राज्याच्या राजधानी पासून अवघ्या २५-३० किलोमीटर अंतरावर असलेल्या भागात सलग ३-४ दिवस अराजकता असावी… आणि मेन स्ट्रीम मिडीयाने त्याची दखल घेऊ नये…हे सहज पटत नाही.

स्थानीक बातम्यांनुसार याच दिवसांत बीजेपी च्या OBC मोर्चा प्रमुखाची हत्या झालीये…!

सत्तेत असलेल्या TMC ने या भागांना भेट देऊ इच्छीणाऱ्या BJP नेत्यांना कायदा व सुवस्थेचा हवाला देऊन वाटेतच रोखलं.

west-bengal-violence-01-marathipizza

निश्चलीकरण, राज्यातील सैन्याच्या रुटीन हलचालींच्या मुद्द्यावर रान उठवीत ईतर राज्यांत फिरत राजकीय कुरघोडीच्या संधी साधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना या विषयी जागरूक असायला हवं. देशातील जवळपास ८०% खोट्या नोटांचा शोध ज्या राज्यात जाऊन थांबतो तिथली वस्तुस्थिती नाकारणे परवडण्यासारखे खचितच नाही.

कुरपतखोर देशाशी काही हजार किलोमीटरची आंतरराष्ट्रीय सीमा असणाऱ्या राज्यांत अशा अप्रिय घटना बरच काही सांगून जातात….प्रश्न आहे गर्भीत अर्थ समजण्याची !

हिंसेच्या कोणत्याही घटनेला कोणत्याही चष्म्यातून नं पाहता त्याचे रिपोर्टींग करावे या पत्रकारितेच्या प्राथमीक कर्तव्यापासून माध्यमं दुर का पळत आहेत?

शक्तिमान घोडा, त्याला झालेली ईजा-मृत्यु-आणी पुतळारूपी करू घातलेलं त्याच अमरत्व….आणि कित्येक दिवसांचं व्हीडीओ प्रक्षेपण व छापील बातम्यांनी रंगलेले मथळे आजही आठवत असतील.

loksatta-shaktiman-marathipizza

तर मग माणुस नावाच्या प्राण्याबद्दल त्याच माध्यमांचं अक्षम्य दुर्लक्ष संशयास संधी देणारं आहे.

आणखी महत्वाचा मुद्दा हा आहे की –

मेन स्ट्रीम मिडीयाला जर वाटतं की, काही न्युज वाहीन्या पक्षपातीपणा करताहेत तर त्यांनी घटना स्थळी जाऊन लोकांसमोर त्यांचा खोटारडेपणा उघड करावा….नाही तर तोपर्यंत त्यांच्या विषयी आरोप लागतच राहतील…!

कोणतेही जटील प्रश्न रातोरात उभे रहात नाहीत…आणि कोणतेही प्रश्न रातोरात न सुटण्या इतपत जटीलही होत नाहीत.

त्यासाठी बराच काळ जाऊ द्यावा लागतो…

समानता-मानवता-सहिष्णूता-क्रांती सारख्या कित्येक घोषणांचे आपणच एकमेव पाठीराखे असा समज असणाऱ्या राजकीय पक्षाचा ३४ वर्षांच्या निरंकुश सत्तेचा ताळेबंद कुणीतरी मांडेल!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?