' महाराष्ट्रातील ही दहा ठिकाणे तुमची हिवाळ्यातील सहल एकदम भारी करुन टाकतील! – InMarathi

महाराष्ट्रातील ही दहा ठिकाणे तुमची हिवाळ्यातील सहल एकदम भारी करुन टाकतील!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

खऱ्या निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर पावसाळ्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पावसामुळे संपूर्ण वातावरण थंड तर असते सोबतच हिरवळीने नटलेले आणि धुक्याची चादर पांघरून बसलेले असते.

निसर्गाच्या जवळ जाण्याची ही संधी सोडण्याची कोणाचीच इच्छा नसते. त्यामुळे पसल्यातला सहलींचे आयोजन केले जाते.

अर्थात यंदाचे आणि मागचे वर्ष त्याला काहीसा अपवाद ठरले आहे. ह्यावर्षी देखील मागील वर्षीप्रमाणे कोरोनाच कहर चालूच आहे., त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस नवे आव्हान ठरत आहे.

लॉकडाऊनच्या घोषणेनंतर तर घराच्याच चौकटीत कुटुंब बंद झाली, शहरातील भ्रमंतीवरही बंधन असल्याने सहल, भटकंती यांचा तर प्रश्नच नव्हता.

त्यामुळे यंदाच्या सुट्टीत अनेकांनी किमान जवळपासच्या सहलींचा बेत आखला आहे. या सहली करण्याला मनाई नसली तरी स्वतःसह कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी घेतली जाणे अनिवार्य आहे.

अर्थात सध्याच्या या खडतर परिस्थितीत फिरायला जाण्यासाठी कुठेही लांब जाण्याची गरज नाही. कमी खर्चात, कमी वेळात आपण महाराष्ट्रातच सुंदर निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याचा व सहलीचा आनंद लुटू शकतो.

 

winter-inmarathi

==

हे ही वाचा : पुण्याजवळची ही १० नितांत सुंदर पर्यटनस्थळे यंदाच्या पावसाळ्यात पाहायलाच हवीत!

==

आपल्या महाराष्ट्रात तर अश्या निसर्गरम्य ठिकाणांची रेलचेल आहे. आज आपण अश्याच ठिकाणांची माहिती घेणार आहोत जिथे तुम्ही छोट्या सुटीमध्ये जाऊन येऊ शकता.

१. महाबळेश्वर

जुने ते सोने असलेले महाबळेश्वर सुंदर निसर्गासाठी आणि स्पेशल पॉईंट्ससाठी प्रसिद्ध आहे. येथील आर्थर्स सीट ह्या पॉईंट वरून दरीचे खूप सुंदर दृश्य बघायला मिळते. महाबळेश्वर मधील सर्वात उंच पॉईंट म्हणजे एल्फिस्टन पॉईंट किंवा विल्सन पॉईंट होय.

ह्या पॉईंटवरून सुद्धा नयनरम्य निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेता येतो. तसेच ह्या ठिकाणी जुने महाबळेश्वर मंदिर, पंचगंगा मंदिर अशी पुरातन मंदिरे आहेत जी बघण्यासारखी आहेत.

 

mahabaleshwar-inmarathi

 

ह्या ठिकाणहून कृष्णा नदीचा उगम होतो तो आपण बघू शकता. योग्य सिझन मध्ये गेलात तर खास इथल्या ताज्या भाज्या व फळेही चाखायला मिळतात. असे हे महाबळेश्वर पर्यटकांची ऑल टाइम फेव्हरेट जागा आहे.

२. पाचगणी

पुण्याहून १०० किलोमीटर असणारे पाचगणी महाराष्ट्रातील सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे. सह्याद्री पर्वतरांगांमधील पाच डोंगरांच्या मधोमध हे गाव वसलेले आहे.

 

pachgani-inmarathi

 

येथील प्रसिद्ध टेबल लँड हे पठार आशियातील दुसरे मोठे ज्वालामुखीद्वारे तयार झालेले पठार आहे.

हे पठार म्हणजे दक्खनच्या पठाराचाच एक विस्तारित भाग आहे. पाचगणीत बघण्यासारखे पॉईंट्स म्हणजे सिडनी पॉईंट,पारसी पॉईंट हे होत. सिडनी पॉईंटवरून धोम धरण व तलाव दिसतो तर पारसी पॉईंटवरून कृष्णा नदीचे मोठे पात्र बघता येते.

३. चिखलदरा

अमरावती जिल्ह्यात असलेले सातपुडा पर्वतरांगांत वसलेले चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण नागपूरपासून २३० किमीवर आहे. ह्या ठिकाणी तलाव, धबधबे आणि आसपासचा निसर्गरम्य परिसर व वन्यप्राणी बघायला मिळतात. ह्या गावाच्या जवळच मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे.

 

chikhaldara-inmarathi

 

ह्या अभयारण्यात ४१ वाघ आहेत त्यामुळे व्याघ्रदर्शन घडू शकते. तसेच इतर अनेक वन्यजीव सुद्धा बघायला मिळतात. भीमकुंड, देवी पॉईंट, वैराट पॉईंट, इको पॉईंट, कालापानी तलाव आणि शक्कर तलाव ही येथील प्रेक्षणीय स्थळे आहेत.

४. गगनबावडा

कोल्हापूर जिल्ह्यातले हे थंड हवेचे ठिकाण आहे. कोल्हापूर शहरापासून ५५ किमी लांब आहे आणि ह्या गावाजवळ गगनगड किल्ला आहे. ह्या ठिकाणी पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो. त्यामुळे येथील हिरवेगार डोंगर आणि धुक्यात हरवलेल्या दऱ्या म्हणजे सुखद अनुभव असतो.

येथे बघण्यासारख्या गोष्टी म्हणजे गगनगड आणि श्री गगनगिरी महाराजांचा आश्रम!

 

gaganbawda-inmarathi

 

गगनगडावरील भवानी मंदिर सुद्धा भेट द्यावी असे आहे. ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी पर्वणी असलेले मोरजाई पठार सुद्धा इथून खूप जवळ आहे.

पावसाळ्यानंतर गेल्यास इथेही कास पठारासारखीच सुंदर रानफुले उमललेली असतात आणि ते दृश्य मनोहारी असते. गगनबावडाच्या जवळच रामलिंग म्हणजेच पांडव गुहा, करूल घाट भुईबावडा घाट तसेच लखमापूर धरण सुद्धा बघण्याजोगे आहेत.

ज्यांना निसर्गाच्या सानिध्यात जायला आवडते ते लोक येथील आसपासचा जंगल परिसर बघू शकतात. येथील जंगलांत जैवविविधता बघायला मिळते. अनेक प्रकारचे पक्षी, झाडे, फुलपाखरे, प्राणी तसेच औषधी वनस्पती ह्या जंगलात आहेत.

५. भंडारदरा

निसर्गसौंदर्याने भरपूर असे अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा हे ठिकाण आर्थर लेक साठी प्रसिद्ध आहे. कॅम्पिंग आणि ट्रेकिंग करणारी मंडळी ह्या ठिकाणाला आवर्जून भेट देतात. ह्या ठिकाणाहून कळसुबाई शिखर ट्रेक सुरु होतो त्यामुळे ट्रेकिंग करणारे अनेक लोक येथे थांबून इथल्या निसर्गाचा आस्वाद घेतात.

 

Bhandardara_inmarathi

 

इथून जवळच प्रवरा नदीच्या प्रवाहातून तयार होणार रंधा धबधबा आहे. येथे १७० फुटांवरून पाणी पडते. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे भंडारदऱ्यातच आहे.

निसर्गसौंदर्याने नटलेल्या ह्या गावात अनेक धबधबे, डोंगरकडे, हिरवीगार झाडे, शुद्ध थंड हवा, तलाव ह्यांची रेलचेल असल्याने हे पर्यटकांचे छोट्या सहलीसाठीचे आवडते ठिकाण आहे.

भंडारदरा धरण, रंधा फॉल्स, अम्ब्रेला फॉल्स, रतनवाडी, भंडारदरा धरण, घाटघर हि ठिकाणे पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावी अशी आहेत.

६. अलिबाग

मुंबईपासून फक्त १०० किमी असलेले अलिबाग हे सुंदर बीच, कनकेश्वर किल्ला ह्यासाठी ओळखले जाते.

 

alibaug-inmarathi

 

अलिबाग जवळील वरसोली, काशीद, नागावचे बीचेस शांत व सुंदर आहेत. तसेच सतराव्या शतकातील कुलाबा फोर्ट व अलिबाग पेण रस्त्यावरील सिद्धेश्वर मंदिर, अलिबाग किल्ला, चौल, बिर्ला मंदिर, मुरुड जंजिरा किल्ला हे सर्व सुद्धा अलिबाग पासून जवळच आहेत. अलिबागला गेले की पर्यटक ह्या सगळ्यांना भेट देतातच!

७. गणपतीपुळे

गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. गणपतीपुळ्याचे समुद्रकिनाऱ्यावर असलेले गणपतीचे देऊळ हे इथले प्रमुख आकर्षण आहे.

 

ganpatipule_temple_inmarathi

 

इथले रिसॉर्ट्स राहण्यासाठी आरामदायक आहेत तसेच इथले वातावरण थंडीच्या काळात आल्हाददायक असते. इथल्या समुद्रकिनारी वॉटर स्पोर्ट्स सुद्धा खेळता येतात. अर्थात सध्या कोरोनाच्या नियमावलीमुळे त्यावर बंधने येऊ शकतात.

इथून जवळच लाईटहाऊस, आरे वारे बीच, वेळणेश्वर, जयगड किल्ला, पावस आणि केशवसुतांचे जन्मगाव मालगुंड सुद्धा बघण्यासारखे आहेत.

==

हे ही वाचा : पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे काय हे अनुभवायचं असेल तर या भारतीय ठिकाणांना भेट द्या

==

८. इगतपुरी

महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात अनेक थंड हवेची ठिकाणे आहेत. त्यातील एक म्हणजे इगतपुरी होय. नाशिक जिल्ह्यात वसलेले हे लहानसे शहर आहे. विपश्यनेसाठी अनेक लोक ह्या ठिकाणी येतात.

 

igatpuri-inmarathi

 

ह्या ठिकाणी शांत वातावरण, हिरवेगार डोंगर व आल्हाददायक हवा असल्याने रोजच्या व्यापातून दोन दिवस निवांत क्षण अनुभवायचे असतील तर पर्यटक इथे येतात.

भातसा नदीचे पात्र, आर्थर लेक, कळसुबाई शिखर, अमृतेश्वर मंदिर, धम्मगिरी विपश्यना केंद्र, गिरीसागर फॉल्स, कॅमल व्हॅली, त्रिनगलवाडी फोर्ट, थाल घाट, म्यानमार गेट, भावली डॅम, अशोका फॉल्स, घाटनदेवी माता मंदिर ह्या सगळ्या गोष्टी इगतपुरीतील आकर्षणे आहेत.

९. तोरणमाळ

तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यातले थंड हवेचे ठिकाण आहे हे सातपुडा पर्वतरांगांच्या तिसऱ्या व चौथ्या रांगेत अक्राणी तालुक्यात आहे.

हे ठिकाण दुर्गम भागात असल्याने तसेच ह्या ठिकाणच्या आजूबाजूला मोठे शहर नसल्याने येथे फार लोक जात नाहीत. पण म्हणूनच येथे गर्दी नसल्याने हे ठिकाण अजूनही शांत व रम्य आहे.

 

toranmal-inmarathi

 

येथे बघण्यासारख्या गोष्टी म्हणजे यशवन्त तलाव, कमळ तलाव, मच्छिन्द्रनाथांची गुहा, महाशिवरात्री दरम्यान भरणारी गोरक्षनाथांची यात्रा, सीताखाई पॉईंट व धबधबा तसेच ट्रेकिंग साठी सीताखाई ट्रेल व खडकी ट्रेल ह्या आहेत.

१०. ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्प

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा ताडोबा अभयारण्याचे क्षेत्र व अंधारी अभयारण्याचे क्षेत्र मिळून संयुक्तपणे बनलेला आहे. हे अभयारण्य विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात आहे.

 

tadoba safari-inmarathi03

 

हे चंद्रपूर शहरापासून ४० किमी लांब आहे. येथील मुख्य आकर्षण व्याघ्र दर्शन व जंगल सफारी आहे. येथे वाघ, चित्ते, काळवीट, हरीण,नीलगाय, हायन.

जंगली मांजर, सांबार, चितळ, मगर असे अनेक प्राणी व पक्षी आहेत. तसेच अनेक दुर्मिळ साप व कासवे सुद्धा आहेत. ह्या ठिकाणी विविध प्रकारची दुर्मिळ झाडे व पक्षी सुद्धा बघायला मिळतात. ह्या ठिकाणी जैवविविधता बघायला मिळते.

ह्या ठिकाणाशिवाय सातपुडा, नाशिक, माथेरान, तारकर्ली ही ठिकाणे सुद्धा छोट्या सहलीसाठी उत्तम आहेत.

तर मग ह्या वीकेंडला वेळ काढा आणि मित्रमंडळी किंवा कुटुंबाबरोबर ह्यापैकी कुठल्याही ठिकाणी जाऊन दोन क्षण आरामात व निसर्गाच्या सानिध्यात घालवा.

अर्थात तुमचा हा आनंद सहलीनंतरही कायम टिकावा असे वाटत असेल तर मग सहलीदरम्यान सातत्याने मास्क वापरणे, वेळोवेळी हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी अंतर राखणेे, शक्य असल्यास गरम पाणी पिणे या सुचना विसरू नका.

==

हे ही वाचा :  ही आहेत मुंबईतील झकास ठिकाणं : ११ आणि १८ व्या ठिकाणांना तुम्ही भेट दिलीच नसेल

==

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?