' या १२ भारतीय चित्रपटांनी चीनमधल्या बॉक्स ऑफिसवर ही धिंगाणा घातला होता!! – InMarathi

या १२ भारतीय चित्रपटांनी चीनमधल्या बॉक्स ऑफिसवर ही धिंगाणा घातला होता!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतीयांचे बॉलीवूड प्रेम विचारायलाच नको. नवीन कोणता सिनेमा येतोय, त्याचे बजेट, त्यातील स्टार्स, त्यांचे कपडे, सिनेमाची स्टोरी इथपासून तर तो रिलीज झाल्यावरची गर्दी, त्याचे समीक्षण यावर सतत चर्चा सुरु असतात. कितीतरी सिनेमे येण्यापुर्वीच त्यांच्यावरून वादविवाद होतात.

 

Boxoffice-inmarathi01
rogersmovienation.com

 

त्यामुळे प्रसारमाध्यमेही या ना त्या कारणाने रोज काहीतरी नवीन घेऊन असतात. हे झाले भारतातील लोकांबद्दल. पण बॉलीवूडचे हेच वेड इतर देशांतही असू शकते याचा कधी विचार केलाय?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

होय. जगभरातही बॉलीवूडचे आणि त्यातील स्टार्सचे अनेक चाहते आहेत. ज्याप्रमाणे आपल्याकडे हॉलीवूडचा चाहता वर्ग आहे अगदी त्याचप्रमाणे. कोरोनामुळे सध्या थिएटर बंद असली तरी याआधी आपल्या सिनेमांनी अटकेपार झेंडे फडकवले होते.  बॉलीवूडचे असे चित्रपट जे चीनमध्ये अतिशय प्रसिद्ध आहेत आणि त्यांचा तिकडे प्रचंड व्यवसाय झालाय.

१. थ्री इडीयट

दिग्दर्शक राजकुमार हिरानींचा हा सिनेमा पालकांकडून शिक्षणासाठी कशाप्रकारे मुलांवर दबाव आणला जातो यावर भाष्य करणारी होता.

आपल्याकडे जसा पाल्याने डॉक्टर किंवा इंजिनियरच व्हावे म्हणून हट्ट असतो तो दाखवण्याचा यात प्रयत्न झालाय. आपल्या मुलाला जे करण्याची आवड आहे तेच करू द्या तरच तो यशस्वी होईल असे हा सिनेमा सांगून जातो. या सिनेम्याला चीनी प्रेक्षकांनीही चांगलीच पसंती दिली.

 

three-inmarathi

 

. हिंदी मिडीयम

या सिनेमात आपल्याकडे सध्या इंग्रजी बोलण्याला आणि याच माध्यमात शिकण्याला किती अवास्तव महत्त्व आलेय याचे चित्रण आहे. इम्रान खानने अत्यंत श्रीमंत पण इंग्रजी न बोलता येणाऱ्या वडीलांचे भूमिका केली आहे. साकेत चौधरी द्वारा दिग्दर्शित हा सिनेमा आहे.

 

HIndi-Medium-collage-inmarathi

 

यात श्रीमंत आणि गरीब विद्यार्थ्यांत कशाप्रकारे भेदभाव केला जातो याचेही वास्तव या सिनेमाने समाजासमोर आणले आहे.

३. दंगल

महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या गीता व बबिता या कुस्तीपटू मुलींवर आधारीत सत्य कहाणीवर हा सिनेमा आहे. यात आमीर खानने मुख्य भूमिका केली आहे. महावीर सिंग यांनी समाजाच्या विरोधात जाऊन आपल्या मुलींना कुस्तीचे धडे दिले. त्यामुळेच या मुली देशाचे नाव मोठे करू शकल्या. कुस्तीतील स्त्री-पुरुष भेदभाव या निमित्ताने कमी झाला.

 

dangal-inmarathi

 

४. पॅडमॅन

नेहमी दुर्लक्षित असणाऱ्या स्त्रियांच्या मासिक पाळी आणि आरोग्य या प्रश्नांवर हा चित्रपट आधारीत आहे. ही सुद्धा एक सत्य कथा आहे. मध्य प्रदेशच्या महेश्वर मध्ये राहणारे लक्ष्मीकांत चौहान यांची भूमिका अक्षय कुमारने केली आहे.

या व्यक्तीने आपल्या पत्नीला, आईला, बहिणीला मासिक पाळी दरम्यान पारंपारिक कपडे न वापरता बाजारातील उत्पादने वापरण्यास सुचवले. पण ही उत्पादने महागडी असल्याने शिवाय त्यांचे महत्त्व न पटल्याने सर्वांनी त्यांना नकार दिला. त्यामुळे या व्यक्तीने संशोधन करून कमी किमतीचे पण सुरक्षित पॅड तयार केले. त्या संबंधी जागृतीही केली.

 

padman-inmarathi
indianexpress.com

५. टॉयलेट एक प्रेमकथा

अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यात मुख्य भूमिकेत आहेत. ग्रामीण भागातील उघड्यावर शौचाला जाण्याच्या पद्धतीवर याद्वारे आवाज उठवण्यात आला. यात भूमीने महिला वर्गाचे प्रतिनिधित्त्व करत ही पद्धत किती लज्जास्पद आहे हे दाखवून दिलेय.

 

toilet-collage
bolywod.com

६. तारे जमीन पर

हा चित्रपट पालकांच्या पाल्याकडून असणाऱ्या अपेक्षा दाखवणारा आहे. शिवाय लहान मुलांच्या डिसलेक्सिया या मानसिक समस्येवरही हा सिनेमा भाष्य करतो. यात लहान मुलांचे भावविश्व अत्यंत उत्तमरीत्या उलगडवून दाखवण्यात आले आहे.

 

 

७. सिक्रेट सुपरस्टार

ही कथा चौदा वर्षीय इनसिया या अनेक स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मुलीची आहे. या स्वप्नांसाठी ती घर आणि समाजाशी कशी झगडते हे यात बघायला मिळते.

 

secret-superstar-inmarathi

 

८. हिचकी

यात राणी मुखर्जीने अशा युवतीचा रोल केलाय जी टॉरेट सिंड्रोमने ग्रासलेली असल्याने तिला सतत उचक्या येत असतात. पण तिचे शिक्षिका बनण्याचे स्वप्न असते. ते ती पूर्ण करतेही. पण शिक्षिका झाल्यावर येणाऱ्या अडचणी आणि त्यावर ती कशाप्रकारे मात करते हे या चित्रपटात बघायला मिळते.

 

hichki-770-inmarathi

 

९. बाहुबली

 

bahubali-marathipizza02
news18.com

ही आधुनिक ग्राफिक्सचा एवढ्या प्रचंड प्रमाणात वापर केलेली पहिली तेलुगु फिल्म आहे. यातील पहिल्या भागाने प्रेक्षकांना काहीसे संभ्रमित केले होते. पण दुसऱ्या भागात प्रेक्षकांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. या सिनेमाने परदेशातही बरीच कमाई केली.

१०. पद्मावत

हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याच्यावर वादविवाद झाले. त्याच्या प्रदर्शनास विरोध करण्यात आला. कारण ही कथा इतिहासातील वीर राणी पद्मावतीवर आधारीत आहे. परंतु सिनेमाप्रदर्शित झाल्यावर मात्र त्याला सर्वत्र चांगलाच प्रतिसाद मिळाला.

 

padmavat-inmarathi05
indiatimes.com

११. पी.के.

हा सिनेमा विनोदी पण तरीही अंधश्रद्धा व भ्रष्टाचारावर बोट ठेवणारा होता. तत्यामुळे तो मनोरंजक आणि डोळे उघडणारा चित्रपट ठरला. यात आमीर खान आणि अनुष्का शर्माने अभिनय केला आहे.

 

pk-inmarathi
youtube.com

१२. बजरंगी भाईजान

ही बोलू न शकणाऱ्या एका पाकिस्तानी लहानगीची कथा आहे. ही मुलगी आपल्या देशापासून लांब भारतात हरवते. ही मुलगी बजरंगी या संवेदनशील व्यक्तीला भेटते. हाच बजरंगी भाईजान त्या मुलीला पाकिस्तानात पोहोचवण्यासाठी खूप प्रयत्न करतो आणि शेवटी त्यात यशस्वीही होतो. सलमान खान आणि करीना कपूर यात मुख्य भूमिकेत आहेत.

 

nawajuddin-bajrangi-inmarathi
timesofindia.com

हे सर्व चित्रपट चीनमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. यातील बहुतांशी चित्रपट हे सामाजिक समस्यांवर भाष्य करणारे आहेत.

यावरून आपण असा निष्कर्ष काढण्यास हरकत नाही की सामाजिक समस्यांवर भाष्य करणारे समांतर चित्रपट सर्वच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. त्यामुळे असेच चित्रपट काढण्यावर भर दिला तर बॉलीवूडचे भविष्य अजून चांगले निश्चितच असेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?