हृदयाची काळजी करण्यापेक्षा या सोप्या टिप्स नक्की फॉलो करा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
माणसाच्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयावांपैकी एक अवयव म्हणजे म्हणजे आपलं हृदय !
हृदय सलामत तर माणूस सलामत असं म्हटलं तरी वावग ठरू नये. म्हणूनच या हृदयाची काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे.
सध्या धावपळीच्या जीवनामुळे हृदयाची खूपच हेळसांड होते. परिणामी आजारांना आमंत्रण दिलं जातं. सोबतच हार्ट अटॅकचा धोकाही बळावतो. म्हणजे जीवावरचं बेततं की सगळं !
सदानकदा घाईत असणाऱ्या मनुष्य प्राण्याला अश्या या हृदयाला निरोगी राखण्याचं सर्वात मोठे आव्हान आहे.
यासाठीचं आम्ही तुम्हाला आज काही फंडे सांगत आहोत, ज्याचं पालन केलं तर तुमच हृदय निरोगी राहील आणि सोबत तुम्ही देखील !
रोज योगा करा
पहाटे उठून योगा करणं शरीरासाठी आणि विशेषत: हृदयासाठी अतिशय लाभदायक ठरतं.
अतिशय कठीण आसने करावी असं काही नाही.
साधी सोप्पी आसने केली तरी उत्तम !
यासाठी इंटरनेटवरही अनेक सोपी आसनांचं मार्गदर्शन उपलब्ध आहेत.
स्विमिंग करा
थंडगार पाण्यात पोहणं कुणाला आवडत नाही!
स्विमिंग हा तर अनेकांचा आवडता छंद, मात्र हा छंद तुमचं ह्रदय सुदृढ ठेवत असेल तर?
स्विमिंग केल्याने हृदय निरोगी राहतं आणि हृदयाला मजबुती मिळते. एवढंच नाही तर आपल्या शरीरातील मांसपेशी देखील मजबूत होतात.
रोज पाय-यांचा वापर करा
प्रवासासाठी वाहनं, घऱ किंवा ऑफिसात लिफ्ट या सुविधांमुळे शरिराला नैसर्गिकरित्या मिळणारा व्यायाम हल्ली कमी झालाय.
त्यासाठी जीम, झुंबा यावर खर्च केला जातो.
मात्र ह्रदय निरोगी ठेवायचं असेल, तर मात्र चालण्याखेरीज पर्याय नाही.
यासाठी घर किंवा ऑफिसच्या पाय-या चढणं हा हृदय निरोगी राखायचा हा सर्वात सोपा उपाय आहे. रोज लिफ्टचा आधार घेण्यापेक्षा शिड्या चढण्याची सवय लावून घ्या.
पालेभाज्या खा
पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असते.
या घटकांचा हृदय निरोगी राखण्यामध्ये महत्त्वाचा सहभाग असतो. त्यामुळे जेवणात पालेभाज्यांचा समावेश जरूर असावा.
जास्त अन्न खाऊ नये
एकाचवेळी जास्त अन्न खाल्याने पचन क्रियेवर आणि हृदयावर विपरीत परिणाम होतो.
म्हणून दिवसाला ठराविक वेळेला थोडे थोडे अन्न खा.
मिठाचा वापर कमी करा
मिठाचा जास्त वापर केल्याने शरीरात कॉलेस्ट्रोलचे प्रमाण वाढते आणि हे कॉलेस्ट्रोल हृदयासाठी अतिशय घातक ठरू शकते.
त्याचा थेट परिणाम ह्रदयावर होत असल्याने मीठाचं प्रमाण कमी करणं गरजेचं आहे.
सिगारेट सोडून द्या
कोणतंही व्यसन शरिरासाठी घातकच!
एका निरीक्षणामध्ये असे स्पष्ट झाले आहे की सिगारेट हृदयाला सर्वात जास्त नुकसानदायी ठरू शकते.
म्हणून हृदय निरोगी राखायचे असेल तर लवकरात लवकर सिगारेट सोडा.
नेहमी हसत राहा
हसणे हा शरीरासाठी सगळ्यात उपयुक्त व्यायाम मनाला जातो.
चेहऱ्यावर नेहमी ताण राहिल्यास त्याचा प्रभाव हृदयावर पडतो. म्हणून नेहमी मनमोकळेपणाने हसत राहा म्हणजे तुमच हृदय अगदी निरोगी राहील.
चला तर मग आतापासून लगेच या सवयी लावून घ्या आणि तुमच हृदय अगदी फिट राखा !!
—
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.