जगभरातील विविध देश आणि त्यांचे बलात्कारविषयक असे कायदे ज्याची आपण कधी कल्पनाही केली नसेल
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
बलात्कारासारखा दुसरा गंभीर गुन्हा या जगात नाही. भारतात तर या गुन्ह्याचे फार गंभीर परिणाम पाहायला मिळतात. बलात्कार झाल्यामुळे सहन करावा लागलेला त्रास कमी की काय म्हणून समाजाच्या नजरा, उलटसुलट चर्चा, बोलणं या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं.
अर्थात, हा गुन्हा घडण्याच्या समस्या फक्त भारतातच उद्भवतात असे नाही. स्त्रीवर जबरदस्ती करण्याची घृणास्पद मानसिकता जगभरात अनेक ठिकाणी पाहायला मिळते.
बलात्काराची कीड ही संपूर्ण जगभरातील देशांना लागली आहे. बरं ही कीड ठेचून टाकण्यासाठी प्रत्येक देशाने कडक कायद्यांची तरतूद केली आहे.
आरोपीला कठोरातील कठोर शासन व्हावे हीच या कायद्यांमागची सरकारी भावना असते. चला तर जाणून घेऊया जगभरातील विविध देशांनी बलात्कारी नराधमांना त्यांच्या कृत्याची फळे भोगण्यास पाठवण्यासाठी कोणते नियमांचे शस्त्र निर्माण केले आहे.
स्वीडन
या देशात बळजबरीने जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याचे कपडे जरी उतरवले तरी त्या व्यक्तीला २ वर्षांची शिक्षा होऊ शकते. व्यक्ती झोपेत किंवा गुंगीत असताना जरी एखाद्या व्यक्तीने कोणासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले तरी देखील तो बलात्कार मानला जातो.
अमेरिका
अमेरिकेमध्ये प्रत्येक राज्याचे बलात्कारविषयक गुन्ह्याचे कायदे वेगळे आहेत. या कायद्यानुसार गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार आरोपीला १० वर्षे ते आजीवन तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. अमेरिकेमध्ये आपल्या जोडीदारासोबत संबंध राखण्यापूर्वी जोडीदाराची संमती घेण्याचा सल्ला दिला जातो.
इटली
बलात्काराच्या वाढत्या गुन्ह्यांकडे लक्ष देता इटली सरकारने १९९६ नंतर बलात्कार विषयक कायदे अधिकच कडक केले. आपल्या पत्नीसोबत सुद्धा एखाद्या व्यक्तीने जबरदस्तीने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले तरी त्या पतीवर बलात्काराचा गुन्हा नोंदवता येतो.
यासाठी किमान १० वर्षांची शिक्षा फर्मावण्यात येते.
सौदी अरेबिया
हा देश येथील विविध शिक्षांसाठी जगप्रसिद्ध आहे. येथे बलात्काराची एकच शिक्षा आहे ती म्हणजे मृत्युदंड ! परंतु आरोपीवरील बलात्काराचा गुन्हा सिद्ध करणे हे या देशाच्या कायद्यानुसार अतिशय जटील काम आहे.
जर आरोपीवरील गुन्हा सिद्ध झाला नाही तर ज्या महिलेने बलात्कार झाल्याची तक्रार केली आहे तिला देखील शिक्षा देण्याची तरतूद आहे.
जर्मनी
हा देश बलात्कारविषयक कायद्यांच्या संदर्भात अधिकच गंभीर आहे. जर्मनीमध्ये व्यक्तीच्या सहमतीशिवाय तिला स्पर्श करणे, तिच्या अंगाशी छेडछाड करणे या कृती सुद्धा लैंगिक अत्याचाराच्या श्रेणीमध्ये मोडल्या जातात.
स्वित्झर्लंड
हा देश देखील बलात्कारविषयक कायद्यांच्या संदर्भात अतिशय जागरूक आहे. लैंगिक अत्याचारांसाठी या देशामध्ये जवळपास १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.
फ्रान्स
फ्रान्समध्ये तर एखाद्या व्यक्तीला शिवीगाळ करणे देखील लैंगिक अत्याचार मनाला जातो आणि त्यासाठी आरोपीला २ वर्षांची शिक्षा होऊ शकते. बलात्कारी आरोपीला जवळपास २० वर्षांची शिक्षा देण्याची तरतूद आहे.
भारत
भारतामध्ये बलात्काराच्या गुन्ह्याखाली आरोपीला किमान ७ वर्षांचा तुरुंगवास ते आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्याची तरतूद आहे. विशेष प्रकरणांमध्ये ७ वर्षांचा तुरुंगवास ते आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते.
बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास आरोपीवर मनुष्यवधाचा खटला चालवून त्यास मृत्यदंडाची शिक्षा देखील दिली जाऊ शकते.
कायद्यातील तरतुदींचा विचार करता, ‘बलात्कार’ या गंभीर गुन्ह्यासाठी भोगावी लागणारी शिक्षा ही नक्कीच योग्य आहे. इतके कठोर शासन होत असूनही, मानसिकता न बदलणं आणि बलात्कारासारख्या अयोग्य घटना घडत राहणं ही अत्यंत लाजिरवाणी बाब म्हणता येईल.
असे कडक कायदे असूनही बलात्काराची समस्या आजही तितकीच गंभीर आहे, हि सगळ्यात मोठी चिंतेची बाब म्हणावी लागेल !
—
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.