इथे डॉक्टरांपेक्षा टॅक्सी ड्रायव्हर्स जास्त पैसे कमावतात!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
क्युबा देश हा फारसा प्रसिद्ध नाही. तरी बहुतेक जणांनी या देशाबद्दल ऐकलं असेल. ज्यांना जागतिक राजकारणाची आवड आहे किंवा इतिहास वाचायला आवडतो त्यांना क्युबा देशाबद्दल नक्कीच माहिती असेल.
कारण तिथे जन्माला आला होता क्रांतिकारी फिडेल कॅस्ट्रो ! २०१६ साली नोव्हेंबर महिन्याच्या २५ तारखेला त्यांचा मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा क्युबा देश चर्चेत आला.
या क्युबा देशाबद्दल जाणून घेताना अनेक रोचक गोष्टी समोर येतात. त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे- क्युबा देशात डॉक्टरांपेक्षा ड्रायव्हर्स जास्त पैसे कमवतात ! पण असे का?
कष्टाचे काम करणाऱ्यांना प्राधान्य देऊन, त्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी उपयुक्त असलेले नियम काही देशांमध्ये पाहायला मिळतात.
म्हणजेच कष्टकरी वर्ग पैशांपासून वंचित राहू नये यासाठी त्यांचा विचार केला जात असल्याचे पाहायला मिळते. मात्र क्युबामधील परिस्थिती काहीशी वेगळी आहे.
१९५९ नंतर क्युबामध्ये झालेल्या समाजवाद्यांच्या क्रांतीनंतर फिडेल कॅस्ट्रोच्या सरकारने सर्व खाजगी व्यवसाय आणि जमिनी सरकारच्या ताब्यात घेतल्या. प्रत्येक हॉटेल, कारखाना, हॉस्पिटल आणि घरे देखील सरकारची मालमत्ता झाली.
त्यामुळे क्युबामधील प्रत्येक माणूस हा सरकारी कर्मचारी म्हणून काम करू लागला. भले त्या माणसाने १० वस्तू विकल्या किंवा २० वस्तू विकल्या तरी त्याला महिन्याला तेवढाचं २० डॉलर पगार मिळायचा.
हळूहळू सरकारला या पद्धतीचा तोटा जाणवू लागला आणि ही परिस्थिती १९९० नंतर बदलली. १९९० पासून क्युबा सरकारने खाजगी परवाने ( private licenses) देण्यास सुरुवात केली.
फिडेल कॅस्ट्रो नंतर त्याच्या भावाने जेव्हा देशाचा कारभार हाती घेतला तेव्हा खाजगी क्षेत्राला मोठी चालना मिळाली. क्युबामधील टॅक्सी ड्रायव्हर्सना देखील खाजगी परवाने देण्यात आले होते. त्यामुळे ते जेवढं काम करतील तेवढा पैसा त्यांना मिळतो.
डॉक्टरांना मात्र सरकारी परवाने देण्यात आलेले नाहीत, त्यामुळे ते स्वत:चे खाजगी क्लिनिक उघडू शकत नाहीत. त्यांना सरकारी कर्मचारी म्हणूनच काम करावे लागते आणि त्याबदल्यात त्यांना महिन्याला ठराविक पगार मिळतो.
याउलट टॅक्सी ड्रायव्हर्सकडे मात्र खाजगी परवाने असल्याने त्यांना जेवढी कमाई होते तेवढी कमाई स्वत:कडे ठेवण्याचा अधिकार आहे. तसेच ते आपल्या मर्जीने कितीही भाडे आकारू शकतात, भाडे मर्यादेवर क्युबा सरकारने कोणतेही बंधन घातलेले नाही.
त्यामुळेच क्युबामधील टॅक्सी ड्रायव्हर्स डॉक्टर आणि इंजिनियरपेक्षा देखील अधिक पैसे कमावतात. त्यांची दिवसाची कमाई ४० ते ६० डॉलर्सच्या आसपास असते. म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये जवळपास २५००-३५०० रुपये !
म्हणजे जी रक्कम क्युबा मधील टॅक्सी ड्रायव्हर्स दिवसाला कमावतात तेवढी रक्कम क्युबा मधील डॉक्टरर्स आणि इंजिनियर्सना दर महिन्याला मिळते.
क्युबामधील टॅक्सी ड्रायवर मंडळींना तिथली हुकूमशाही फळली म्हणायची…
क्युबा देशा अजब तुझे सरकार !
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.