' ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ बद्दल च्या ९ मजेशीर गोष्टी! – InMarathi

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ बद्दल च्या ९ मजेशीर गोष्टी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

चित्रपट हे असं अजब रसायन आहे की तो पाहताना माणूस त्या रसायनात विरघळून जातो. कित्येक वर्षे बनत आलेले सिनेमे चाहत्यांच्या मनात घर करून राहतात.

अलीकडच्या काळातील दिल चाहता है, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, जब वुई मेट सारखे तारुण्याने भारलेले सिनेमे वारंवार पाहिले जातात. जिंदगी ना मिलेगी दोबारा हा देखील ह्याच पठडीतला सिनेमा.

 

zindagi-na-milegi-dobara InMarathi

 

तीन मित्रांच्या प्रवास वर्णनावरचा चित्रपट. ह्या चित्रपटाची पारायणं होत असतात.

कित्येक जण तर सांगतात जेव्हा जेव्हा टीव्हीवर हा सिनेमा लागतो तेव्हा तो संपेपर्यंत चॅनेल बदलले जात नाही. कधी कधी तर तो कोणत्या दिवशी लागणारे ह्याची वेळ/दिवस पाहून पॉपकॉर्न – कोल्ड्रिंक वगैरे जय्यत तयारी करून अजूनही हा सिनेमा किती तरी जण आवडीने बघतात.

 

ZNMD 2 InMarathi

 

ह्या सिनेमाची एकेक फ्रेम, एकेक सीन, डायलॉग आणि गाणी तोंडपाठ असणारे क्रेझी चाहते आहेत. अत्यंत सुंदर लोकेशन्स आणि कमाल शायरी हे दोन यूएसपी असलेला हा सिनेमा पाहणाऱ्याच्या मनात घर करतो. त्यातील ऍडव्हेंचर स्पोर्ट्स आपल्याला एक थ्रिलिंग अनुभव देतात.

हृतिक रोशन आणि कतरीना कैफची जोडी कमाल आहे. पण सोबतीला असलेले नटखट फरहान अख्तर, हुशार अभय देओल आणि सॉल्टी कल्की कोचलीन हे तिघे पण मस्त रंग भरतात. त्यामुळे कधीच कंटाळा येणार नाही असाच आहे ‘झेड एन एम डी’..!

ह्या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी बऱ्याच करामती कराव्या लागल्या होत्या. तुम्हाला काही माहीतही असतील.

त्यातील काही काही गमतीशीर किस्से वाचून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग पाहुयात झेड एन एम डी चे काही फन फॅक्टस..!

१. चित्रपटात जो ‘ला टोमॅटिना फेस्टिवल’ दाखवला होता तो खऱ्या फेस्टिव्हलच्या काळात शूट झाला नव्हता. त्यामुळे त्यांनी त्या सीनला खरेखुरे फेस्टिव्हलचे स्वरूप मिळावे म्हणून शूटिंगच्या स्थळावर, पोर्तुगाल मधून १६ टन टोमॅटो आयात केले होते.

 

 

पुढे जो टोमॅटोचा लाल चिखल झाला तो आपण सिनेमात पाहतोच..!

 

la-tomatina-znmd-inmarathi

 

२. कतरिना कैफचा पहिला सीन हा न्यूड बीचवर शूट करण्यात आला होता. कमालीचे सुंदर लोकेशन होते ते. अर्थातच ह्या सीनसाठी चित्रपटाच्या टीमला खूप जास्ती खबर घ्यावी लागली. जर चुकून कोणी एखाद्या फ्रेममध्ये आले असते तर ‘कुछ अनदेखे नझारे’ दिसले असते.

 

katrina inmarathi
pinterest

 

३. चित्रपटात पहिल्या ऍडव्हेंचर स्पोर्टमध्ये म्हणजेच स्कुबा डायविंग मध्ये अर्जुन म्हणजेच हृतिक रोशन खूप घाबरलेला दाखवला आहे. कारण त्याला पोहताच येत नाही असे दर्शवले आहे. मग कतरीना त्याला योग्य मार्गदर्शन करते आणि तो शिकतो.

पण खरे तर हृतिकच्या खाजगी आयुष्यात पाहिले तर तो पट्टीचा पोहणारा आणि उत्तम स्कुबा डायव्हर आहे.

 

scuba diving inmarathi
bookmyshow

 

४. हा चित्रपट करावाच अशी सुझान रोशननी म्हणजेच जी एकेकाळी हृतिकची बायको होती, तिने हृतिकला गळ घातली. जर हृतिकच्या जागी दुसरा कोणी असता तर..? ह्या गोष्टीचा खरे तर आपण विचारच करू शकत नाही.

५. ह्या चित्रपटात फरहान अख्तर आणि अभय देओल हे ग्राह्य धरलेले नव्हतेच. गंमत वाटेल पण हृतिक रोशन बरोबर शाहरुख खान आणि विवेक ओबेरॉय अशी कास्टिंग ठरवली गेली होती.

कदाचित ह्या चॉईसमुळे चित्रपट चाललाही नसता. फरहान आणि अभयचा रोल दुसरे कोणी करूच शकले नसते, नाही का..?

६. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ आठवा पाहू हे शब्द आधी कुठे ऐकलेत? हो हे शब्द कुठून तरी उचलण्यात आहे आहेत. फरहानचाच रॉक ऑन सिनेमा आठवतोय का? ह्याच चित्रपटातील टायटल सॉंगमधून ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हे शब्द उचलण्यात आले आहेत.

 

farhan-rock-on-inmarathi
india today

 

७. झोया अख्तरने ह्या सिनेमाच्या मुख्य पात्रांसाठी सुरुवातीला रणबीर कपूर आणि इम्रान खानला देखील विचारले होते. पण त्यांनी हा चित्रपट नाकारल्याने आपल्याला हृतिक आणि अभय देओल पहावयास मिळाले.

८. जिंदगी ना मिलेगी दोबारा हेच चित्रपटाचे नाव असले पाहिजे ह्यावर शिक्कामोर्तब करायला जावेद अख्तर ह्यांनीच मदत केली.

९. सुरुवातीला ह्या सिनेमाचे नाव अगदीच मजेशीर होते. शेवटचा, बैलांपुढे जीव मुठीत धरून पळण्याचा जो ऍडव्हेंचर स्पोर्ट दाखवण्यात आलेला होता त्यावरून चित्रपटाचे नाव ‘रंनिंग विथ द बुल्स’ असे ठरवण्यात आले होते.

ते विचित्र वाटले असते हे नक्की. चित्रपटाचे नाव सुद्धा चाहत्यांच्या पसंतीस उतरावे लागते.

 

scuba diving inmarathi
pinterest

 

चित्रपटातील नायक नायिका कोण आहेत? चित्रपटाची कथा काय आहे? गाणी आणि संगीत कसे आहे? चित्रपटाचे नाव काय आहे? अशा बऱ्याचश्या बाबींवर चित्रपटाचे यश अवलंबून असते.

जिंदगी ना मिलेगी दोबारा हा चित्रपट सगळ्याच बाबींवर खरा उतरतो. त्यामुळेच ह्या सिनेमाला डोक्यावर घेतले गेले आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?