' ऑनलाईन शॉपिंग करताना सहज होणारी फसवणूक टाळण्यासाठी या १० खबरदाऱ्या घ्यायलाच हव्यात – InMarathi

ऑनलाईन शॉपिंग करताना सहज होणारी फसवणूक टाळण्यासाठी या १० खबरदाऱ्या घ्यायलाच हव्यात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘ जे लोक शॉपिंगचे शौकीन असतात त्यांना शॉपॉहॉलीक म्हणतात..!’ हा शब्द इंग्रजी असला तरी तो आता सगळ्याच भाषेत रूढ झालेत. खरेदी करणे हा कायमच चोखंदळ लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो.

जसे अल्कोहॉलिक असतात, तसे शॉपॉहॉलीकही असतात.

म्हणजे हातात पैसे आले रे आले की, ह्या माणसांची पाऊले बाजाराच्या दिशेने वळतात. बाजारातली शॉपिंग ही देखील एक कला आहे.

वस्तूंचा भाव करणे आणि तोलून मोलून वस्तू विकत घेणे ह्यामध्ये ज्याने मास्टरी मिळवली त्याची खरी शॉपिंग झाली. नाहीतर बाजारात फसवेगिरीला कुणीही बळी पडू शकते.

ज्यांना उन्हातान्हात फिरून, प्रत्येक दुकान पालथे घालत खरेदी करायची इच्छा नसते त्यांच्यासाठी हल्ली ऑनलाइन शॉपिंगचे एकाहून एक सरस पर्याय उपलब्ध आहेत.

 

indian girls shopping inmarathi

 

ऑनलाइन शॉपिंगमध्ये एखादे ऍप डाउनलोड केल्यास आपल्याला बरेच पर्याय उपलब्ध असतात. दुकानदाराशी घासाघीस करण्याची सोय जरी नसली तरी, ऑनलाइन ऍप वर देखील ‘सेल’ लागतात.

ज्यातून तुम्ही स्वस्त सामान खरेदी करू शकता.ज्याची किंमत MRP पेक्षा कमी असते. पैसे देण्याचेही भरपूर पर्याय असतात. कॅश ऑन डिलिव्हरी, क्रेडिट कार्ड – डेबिट कार्ड पेमेंट, वगैरे.

पूर्वी दुकानातून घेतलेली वस्तू स्वतःच्या हाताने पाहून आणली आणि खराब निघाली तर बदलून मिळण्याची हमी असायची. ऑनलाइन शॉपिंगमध्ये पूर्वी लोकांना हा अनुभव मिळत नसल्याने तिच्या भानगडीत कोणी पडत नसत.

वस्तू खराब निघाली तर अंगावर पडायची आणि पैसेही वाया जायचे या भीतीने. पण आता तोही पर्याय उपलब्ध आहे. १५ एक दिवसात आपण ती वस्तू परत देऊन नवीन मिळवू शकतो. म्हणून आता ऑनलाइन शॉपिंग सगळीकडेच जोमाने सुरू झालेले आहे.

ऑनलाइन शॉपिंग करताना सुद्धा फसवेगिरीची संभावना आहेच..

त्यासाठी काही मुद्दे लक्षात ठेवले आणि त्यांचे कटाक्षाने पालन केले तर, आपण घरबसल्या शॉपिंगचा आनंद नक्कीच मिळवू शकतो. बघुयात आपल्याला काय काय माहिती असणे गरजेचे आहे.

१. इंटरनेट कनेक्शन सेक्युअर आहे का ते पाहणे

‘https’ पासून सुरू होणाऱ्या लिंक्स/वेबसाईट्स ह्या सेक्युअर वेबसाईट असतात. सहसा अशाच वेबसाईट वरून शॉपिंग करावी. नाहीतर तुमचा पत्ता, क्रेडिट/डेबिट कार्ड आणि बँकची माहिती हॅक होऊ शकते आणि त्याचा गैरवापरही होऊ शकतो.

कॉम्प्युटर पेक्षा स्मार्टफोनवर जास्त धोका असतो.

इंटरनेट फिशिंगमुळे तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे वेबसाईटची सेक्युरिटी योग्य असल्याची खातरजमा केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नये. वेबसाईटची ‘प्रायव्हसी पॉलिसी’ वाचून पाहिल्यास उत्तम.

 

online-shopping-inmarathi.jpg

 

२. वस्तूंच्या किमतीची खातरजमा करून घ्या

जर तुम्ही एखाद्या ऑक्शन साईटवरून काही खरेदी करत असाल तर, तुमच्याकडून बिडिंग जास्त होत नाहीये ना ते तपासा. नाहीतर खऱ्या किमतीपेक्षा जास्तीचे पैसे वाया जायचे.

इतर वेबसाईटवर देखील काही छुपे चार्जेस नाहीत ना याचीही खात्री करून घ्यावी. पेमेंट क्रेडिट कार्डने असल्यास इतर पर्यायांपेक्षा जरा ‘सेफ’ असते. कारण काही गडबड झाल्यास तुमचा तोटा नक्कीच कमी असतो.

 

online-shopping-inmarathi01

 

३. वस्तूची ‘रिटर्न पॉलिसी’ तपासून घ्या

वस्तूंची रिटर्न पॉलिसी हा महत्वाचा मुद्दा आहे. कधी कधी काही पॉलिसीज फसव्या असतात. कधी रिटर्नसाठी ‘नियम आणि अटी’ लागू असतात. म्हणजेच एक मोठी किंतु परंतु यादी तयार असते.

ती न वाचताच आपण वस्तू खरेदी केली आणि ती परत पाठवायची झाल्यास लीगल रिटर्न पॉलिसीच्या टर्म्समुळे अडथळा येऊ शकतो. त्यासाठी ती यादी नीट वाचून घेणे आवश्यक असते. नाहीतर आपली फसगत नक्की.

 

online-shopping-inmarathi02

 

४. योग्य पेमेंट पर्याय निवडा

जर तुम्ही नेटबँकिंग किंवा डेबिट कार्डद्वारे ऑनलाइन पेमेंट करत असाल तर खूपच खबरदारी घ्यावी लागते. फिशिंग रेसिस्टंट प्रोग्रॅम सेट करावा लागतो.

बँकेची सगळी माहिती आपण ह्या वर्ल्ड वाईड वेब म्हणजेच इंटरनेटला देत असतो. ज्याचा फायदा हॅकर्सना होऊ शकतो. त्यामुळे बँकेतील सगळी रक्कम ऑनलाइन चोरीस जाऊ शकते.

क्रेडिट कार्डने पेमेंट हा जरा सोपा आणि सुरक्षित पर्याय आहे. कारण क्रेडिट कार्डला शॉपिंगसाठी लिमिट असते. कमी लिमिटचेच कार्ड ऑनलाइन वापरल्यास उत्तम.

कारण कोणी ते हॅक केलेच तर लिमिटपेक्षा जास्त वापरू शकता नाही. त्यामुळे बँकेतील सगळे सेविंग्ज जाण्यापेक्षा क्रेडिट कार्ड वापरल्यास कमी धोका असतो.

 

online-shopping-inmarathi03

 

५. स्वतःबद्दल कमीत कमी माहिती इंटरनेटवर द्या

वेबसाईटवर खाजगी माहिती गोळा करण्यासाठी एखादी प्रश्नमंजुषा पॉप अप होत असेल तर सावधान..!! इथे नक्कीच काहीतरी काळंबेरं असतं.

कोणतीही बँक आपल्याला खाजगी माहितीचे किंवा पासवर्ड्सचे मेसेज, पॉप-अप देत नाही. जेव्हा अशी माहिती गोळा केली जाते तेव्हा त्याचा उपयोग फ्रॉड करण्यासाठीच केला जातो. म्हणून कुठेही आपली माहिती देऊ नका.

 

online-shopping-inmarathi04

 

६. मोबाईल वापरत असल्यास जास्त खबरदारी घ्या

हल्ली स्मार्टफोन आल्याने कॉम्प्युटरचा वापर कमी झाला आहे. पण एक गोष्ट महत्वाची आहे की, ज्याप्रमाणे कॉम्प्युटर्स अँटी व्हायरसने प्रोटेक्ट केलेले असतात त्याप्रमाणे मोबाईल प्रोटेक्ट केलेले नसतात.

याचा फायदा हॅकर्सना होतो आणि ते सहजपणे तुमच्या मोबाईलवर मालवेअर पाठवून तुमचा सगळा डेटा हॅक करतात.

 

online-shopping-inmarathi05

 

७. चेक आउट पेज एनक्रिप्टेड आहे की नाही ते बघा आणि पासवर्ड अवघड निवडा

चेकआउट करताना पेज तुमच्या ऑनलाइन विक्रेत्याने एनक्रिप्ट केलेलं असल्याची खात्री करून घ्या.

आपले पासवर्ड्स सुद्धा कॉमन, सहज शोधता येऊ शकतील असे नसावेत. योग्य पासवर्ड्स बनवण्याची पद्धत अवलंबावी. अप्पर केस, लोवर केस, स्पेशल कॅरेक्टर आणि एखादा आकडा असे कॉम्बिनेशन असलेला पासवर्ड स्ट्रॉंग मानला जातो.

 

online-shopping-inmarathi06

 

८. पब्लिक कॉम्प्युटरवरून कधीच खरेदी करू नका

तुम्ही सर्फिंग केलेली सगळी माहिती इंटरनेटच्या ‘कॅशे’मध्ये सेव्ह केली जाते. तुम्हाला तीच माहिती बघताना त्रास होऊ नये म्हणून. त्यामुळे तुमचे पासवर्ड्स, बँकेची माहिती वगैरे सुद्धा सेव्ह केले जाऊ शकते.

जर तुम्ही इंटरनेट कॅफेमधील कॉम्प्युटरवर तुमची शॉपिंग केलीय तर तुमचा सगळा डेटा दुसऱ्यासाठी उपलब्ध होतो. आणि सरळ फसगत होण्याची शक्यता असते. त्यामुळे सहसा स्वतःच्या घरीच बँकेशी संबंधित व्यवहार करावेत.

 

online-shopping-inmarathi07

 

९. ऑर्डरची कॉपी सेव्ह करून ठेवा 

तुम्ही जी ऑर्डर देता त्याची ऑनलाइन किंवा इ-रिसीट जपून ठेवा. हवा तर स्क्रीन शॉट घ्या किंवा प्रिंट करून ठेवा.

म्हणजे जर ऑर्डर वेळेत आली नाही किंवा काही कारणाने मिळालीच नाही तुम्हाला तर, त्या बिलाचा उपयोग करून तुम्ही कायदेशीररित्या ग्राहक मंचाला तक्रार करू शकता.

 

१०. ऑनलाइन सेलचा लाभ घ्या

ऑनलाइन पद्धतीने खरेदी करताना वेगवेगळ्या ऍपवर किंवा वेबसाईटवर  सेल असतात. त्यावेळी खरेदी केल्यास आपल्या शिपिंग कॉस्टचा खर्च नक्कीच वसूल होतो. वस्तूही बऱ्यापैकी स्वस्तात मिळतात.

वेगवेगळ्या ऑफर्सखाली काही वस्तू ठराविक शॉपिंगवर फुकट मिळून जातात. त्यामुळे अशा सेलवरही आपले लक्ष असल्यास त्याचा फायदा आपण उचलू शकतो.

 

online-shopping-inmarathi09

 

ऑनलाइन शॉपिंगची भीती बाळगायची काहीच गरज नाही. वरील काही गोष्टी ध्यानात घेतल्या आणि आपल्या बँकिंग संदर्भातील माहितीला जपून वापरले तर धोका अजिबात नाही.

घरबसल्या हव्या त्या वस्तू आपण मिळवू शकतो. कसलीही धावपळ न करता आणि एका क्लिकच्या साहाय्याने..!

So shop till you drop..!! असा आनंद ऑनलाइन मिळवा..!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?