' साऱ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या ‘शास्त्रींच्या’ मृत्यूमागचं हे गूढ अजूनही कायम आहे! – InMarathi

साऱ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या ‘शास्त्रींच्या’ मृत्यूमागचं हे गूढ अजूनही कायम आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – निखिल सोनजे 

===

दिवंगत पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या मृत्यूला जवळजवळ ५६ वर्षे झाली! ११ जानेवारी १९६६ रोजी त्यांचा मृत्यू ताशकंत (रशिया) येथे झाला. पण इतका काळ लोटल्यानंतर देखील त्यांचा मृत्यू नक्की कसा झाला यावर अनेक तर्क लावले जातात…

त्याचं प्रमुख कारण म्हणजे मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव जेव्हा भारतात आणले गेले तेव्हा त्यांच्या मृत शरीराची कुठलीही फोरेन्सिक चाचणी करण्यात आली नाही. किती आश्चर्याची बाब आहे!!

भारताचे पंतप्रधान अचानक परदेशात मरण पावतात आणि त्यांच्या पार्थिवाचे साधे पोस्टमॉर्टम देखील होऊ नये? कुणाच्याही मनात शंकेची पाल चुकचुकणं साहजिक आहे.

 

lal-bahadur-shahstri-InMarathi

 

ह्या घटनेचा अत्यंत सखोल अभ्यास करून लेखक – संशोधक अनुज धर यांनी “Your Prime Minister is Dead” नावाचं पुस्तक लिहिलंय.

ह्या पुस्तकात त्यांना विषबाधा करण्यात आली असावी असं सूचित करण्यात आलं आहे. काही वर्षांपूर्वी अनुज धर यांनी लालबहाद्दूर शास्त्री यांच्या मृत्यूसंबंधी असलेले सर्व रेकॉर्ड्स जनतेसमोर यावे ह्या उद्देशाने एक RTI फाईल केला.

शास्त्रींच्या पार्थिवाचे रशियात काढलेले फोटो आणि भारतात आणल्यानंतर दिल्लीत काढलेले फोटो आणि रशियाच्या डॉक्टर्सनी त्यांच्या पार्थिवाचे Emblaming (मृतदेहाचे विघटन होऊ नये यासाठी करण्यात येणारी क्रिया) याचे रिपोर्ट्स वगळता कुठलाही पुरावा आजच्या घडीला उपलब्ध नाही.

 

lal-bahadur-shahstri-1 InMarathi

 

ह्या डॉक्टर्सनी केलेल्या प्रक्रियेनंतर त्यांनी पार्थिवाचे जे वर्णन केले आहे आणि शास्त्रींच्या कुटुंबीयांनी त्यांचे पार्थिव बघितल्यानंतर जे वर्णन केलेय त्यात साधर्म्य आहे काय? असा प्रश्न अनुज धर यांनी त्यांच्या पुस्तकात विचारलाय.

शास्त्रींच्या कुटुंबीयांनी त्यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झालेला नाही अशी शंका त्यावेळी उपस्थित केली होती. emblaming हे विषबाधा करण्यात आलीये हे लपवून ठेवण्यासाठी करण्यात आलं असाही आरोप त्यांनी केला होता.

 

anuj dhar your prime minister is dead InMarathi

 

प्रोफेसर सौम्या चक्रबर्ती (MS Anatomy, FAIMER, US) ESI PGIMSR, कोलकाता येथे Anatomy डिपार्टमेंटच्या प्रमुख आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार –

“चेहरा आणि धड यांचा रंग जर गर्द निळा झाला असेल तर विषबाधा झालीये असं समजावे किंवा रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झालेय आणि मृत्यू जीव गुदमरून झालाय असं समजावे.

शास्त्रींच्या बाबतीत विषबाधेची शक्यता आपण फेटाळू शकत नाही. पण माहिती अभावी ठाम निष्कर्ष आपण काढू शकत नाही.”

डॉ. सयन बिस्वास (MD Forensic Medicine Toxicology) NR Sircar मेडिकल कॉलेज येथे फॅकल्टी मेंबर आहेत. ते म्हणतात की,

“अचानक मृत्यू झाला तर ऑटोप्सी करणे बंधनकारक असते. गरज पडली तर दोनदा ऑटोप्सी करावी लागते. शास्त्रींच्या बाबतीत emblaming करताना वापरण्यात आलेली औषधे खूप कमी प्रमाणात आढळली.”

डॉ. अजय कुमार (माजी Head of Department of Forensic Medicine, Calcutta Medical College and Calcutta National Medical College) यांच्या मते देखील शास्त्रींना विषबाधा करण्यात आली असावी.

शास्त्रींच्या कुटुंबीयांनी रीतसर पोलिस कंप्लेंट का केली नाही याचंच आश्चर्य मला वाटत राहतं असं ते म्हणतात.

 

lal-bahadur-shahstri-2 InMarathi

 

अमेरिकन बोर्ड ऑफ इंटर्नल मेडिसिनचे मेंबर असलेले डॉ निर्मल्य रॉय-चौधरी पॅलेस्टीनचे नेते यासर अराफत यांचे उदाहरण देतात आणि म्हणतात-

“अराफत यांच्या पत्नीने परवानगी दिल्यानंतर त्यांच्या पार्थिवाचे खूप काळजीपूर्वक पोस्ट मॉर्टेम करण्यात आले. त्यात त्यांना पोलोनिअम २१० देऊन ठार करण्यात आले आहे हे सिद्ध झाले.”

शास्त्रींच्या पत्नींच्या म्हणण्यानुसार त्यांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर निळ्या रंगाची गर्द छटा उमटलेली होती. त्यांना जाऊन खूप कमी वेळ लोटला होता. चेहऱ्यावर काही ठिकाणी पांढरे डाग देखील होते.

घटनेला चार वर्षे लोटल्यानंतर शास्त्रींच्या पोटावर असलेल्या जखमेसंबंधी स्पष्टीकरण देण्यात आले. Emblaming करण्यासाठी पोट उघडण्यात आले होते असं त्यात म्हटलं होतं.

हे ही वाचा भारतातल्या या १० प्रसिध्द व्यक्तींच्या मृत्यचे गूढ अजूनही उलगडलेले नाही

सुभाषचंद्र बोस यांचे वंशज श्री. चंद्रकुमार बोस यांच्या दाव्यानुसार शास्त्रीजींनी अमियनाथ बोस (नेताजींचे भाचे) यांना एक वचन दिलं होतं. ते वचन काय होतं हे वाचून आपणास धक्का बसेल –

“नेताजी त्यावेळी रशियात आहेत का ह्याचा मी पूर्ण तपास करीन.”

ते असं देखील म्हणाले होते की-

‘मी रशियातून परतल्यानंतर नेताजींच्या मृत्यूसंबंधी एक चौकशी समिती स्थापन करीन. पण रशियातच शास्त्रीजींना गूढ पद्धतीने मृत्य आला.’

 

netaji-subhas-chandra-bose-inmarathi

 

योगी आदित्यनाथ यांनी देखील शास्त्रींच्या मृत्यूसंबंधी असेलेले सर्व कागदपत्र जनतेसमोर आणावे अशी मागणी वाराणसी येथे पत्रकारांशी बोलताना केलेली आहे.

अनुज धर हे पत्रकारिता करत असत. त्यांनी नेताजींच्या मृत्यूसंबंधी अत्यंत खळबळजनक खुलासे करणारी पुस्तके आतापर्यंत लिहिली आहेत (Back From Dead: Inside the Subhas Bose Mystery, India’s Biggest cover-up, What Happened to Netaji).

नेताजींच्या मृत्यूसंबंधी सर्व कागदपत्र declassify करण्यात यावेत आणि त्यांच्या मृत्यूवर संशोधन करण्याच्या उद्देशाने त्यांनी “Mission Netaji” नावाची संस्था देखील स्थापन केली आहे.

धर यांचे “India’s Biggest Cover – Up” हे पुस्तक खूप गाजले आणि नेताजींच्या मृत्यूसंबंधी अत्यंत अपरिचित अशा पैलूंवर ह्या पुस्तकाने प्रकाश टाकला.

 

 

आपण अशी अशा ऊरी बाळगूया की, ह्या दोन महान विभूतींच्या मृत्यूसंबंधीची सर्व माहिती जनतेसमोर येईल.

ज्या दिवशी हे होईल त्यादिवशी भारतातली लोकशाही खरोखर मजबूत झाली असं आपल्याला म्हणता येईल!

===

हे ही वाचा आझाद हिंद सेनेचा एल्गार, हिटलर भेट आणि पराक्रम दिनामागचा तळपता ‘महानायक’

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?