' गाढवावर बसलेला अमीर खान – कॅप्टन जॅक स्पॅरोचं भारतीय व्हर्जन? – InMarathi

गाढवावर बसलेला अमीर खान – कॅप्टन जॅक स्पॅरोचं भारतीय व्हर्जन?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

बहुचर्चित असलेला ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. फक्त ५ तासापूर्वी युटूब वर जवळपास ४४ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. याच अमिताभ बच्चन, आमीर खान, कतरिना कैफ सारख्या स्टार्स ना घेऊन बनवलेल्या किओनेमबाबत आम्ही घेऊन आलो आहोत काही खास गोष्टी :

‘थग्स ऑफ हिंदुस्तान’ ही पिरिअड फिल्म असून फिलिप मीडोज टेलर यांच्या ‘कन्फेशन्स ऑफ अ थग’ या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित आहे.

फिलिप मीडोज टेलर यांनी लिहिलेली ही कादंबरी प्रथम १८३९ मध्ये प्रकाशित झाली. त्या काळातील भारतात प्रचलित असलेल्या ठगांच्या तस्करीतल्या कारनाम्यांची ही कथा आहे.

 

Thugs-of-hindostan-inmarathi01
newsx.com

असे म्हटले जाते की, प्रसिद्ध ठग सईद अमीर अली यांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी आहे. १९ व्या शतकात होई कादंबरी ब्रिटनमध्ये बेस्ट सेलर ठरली होती.

यश राज फिल्म्सच्या आदित्य चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. एकाच चित्रपटात दोन मोठे स्टार्स एकत्र आणून काम करून घेण्याचं आदित्य यांच कसब प्रसिद्ध आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि अमीर खान एकत्र दिसतील.

यापूर्वी आदित्य चोप्रांनी ‘मोहब्बते’ या सिनेमासाठी अमिताभ आणि शाहरुख खान यांना एकत्र आणले होते.

 

विजय कृष्ण आचार्य हा चित्रपट दिग्दर्शित करीत आहे. ‘धूम’ सिरीज, ‘रावण’ आणि ‘गुरु’ अशा चित्रपटांसाठी ते एक संवाद लेखक म्हणून परिचित आहेत. त्यांनी आतापर्यंत ‘धूम 3’ आणि ‘टशन’ या दोन चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमाच्या आधी ते ‘धूम -4’ ची तयारी करत होते.

आमिर बहुधा मल्टीस्टारर चित्रपट करत नाही. तो कारकिर्दीत शिखरांच्या पायऱ्या जशा चढू लागला तसं त्याने कोणत्याही स्टार बरोबर काम केलेल नाही. या सिनेमात अमिताभ सारखे मेगा स्टार असले तरीही त्यांची फी ही आमिरच्या फी च्या समोर अगदी सामान्य आहे.

यावरूनच आपल्याला आमिरच्या या सिनेमातल्या भूमिकेविषयी कल्पना येईल. मोशन टीजर लॉन्च करतानासुद्धा आमीरचा टीजर सगळ्यात शेवटी लुच केला गेला यावरून अंदाज बांधता येईल.

चित्रपटात दोन महिला लीड पात्र आहेत. एक पात्र फातिमा सना शेख उभ करत आहे, तर दुसर कॅटरीना कैफ करत आहेत.

या वर्षाच्या सुरूवातीस चित्रपटाची शूटिंगमधली काही छायाचित्र लिक झाली होती, त्यात कॅटरीना, सना आणि आमिर नाचताना दिसत होते. या चित्रपटात कॅटरीना सुरय्या नामक मुलीची भूमिका बजावत आहे, जी नृत्यांगना आहे.

 

Thugs-of-hindostan-inmarathi
bollywoodlife.com

फातिमा या कथेतील जाफीरा नावाच्या मुलीच्या भूमिकेत आहे, जी एक उत्तम तिरंदाज मुलगी आहे. जी ब्रिटीश राजवटीवर सूड उगवणार आहे.
या सिनेमामध्ये बरेच अॅक्शन दृश्य आपल्याला पहायला मिळणार आहेत. हे दृश्य शूट करण्यापूर्वी अॅक्शन वर्कशॉप केले गेले. सना करत असलेली भूमिका ही अॅक्शन करणारी असून त्यासाठी तीन भरपूर मेहनत घेतली आहे.

मुळात जाफिराच्या भूमिकेसाठी आदित्य चोप्रा यांनी वाणी कपूर यांची निवड केली होती पण आमिरच्या प्रेमामुळे आणि दंगल मधल्या कामामुळे फातिमा सना शेख ला हा रोल मिळाला अशी चर्चा बीटाऊन मध्ये रंगत आहे.

या चित्रपटाचे नाव प्रथम ‘ठग’ असे होते. ऋतिक रोशनची निवड मुख्य भूमिकेसाठी केली गेली होती . पण त्या काळात ह्रितिक त्याच्या स्वत:च्या बॅनर खाली बनत असलेल्या सिनेमा ‘काबील’ मध्ये व्यस्त होता. तसेच इतर चित्रपटही चालू होते, त्यामुळे त्यानं ही फिल्म सोडली.

जॉनी डेपने वरून आहे आमीरचे पात्र?

पूर्वी असं म्हटलं जात होतं की हा चित्रपट “पायरट्स ऑफ द कॅरिबियन” वरून प्रेरीत आहे.

जरी ट्रेलरमध्ये हिंदुस्तानच्या ठगांची कथा वेगळी असली तरी आमिरचे चरित्र कॅरिबियनच्या समुद्री डाकूच्या जॉनी डेपसारखेच आहे. फिरांगी मल्लहचे पात्र ‘द चिट्रेन्स ऑफ दी कॅरिबियन’ मधील डेपच्या पात्राइतकेच हजरजबाबी , विनोदी आणि मजेदार आहे.

 

pirates-inmarathi
MovieWeb

या साहसी चित्रपटासाठी दोन दशलक्ष किलो वजनाची दोन मोठी जहाज तयार केली गेली आहेत. ही दोन जहाजे तयार करण्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागला आणि आंतरराष्ट्रीय डिझायनर आणि जहाज बांधकाम करणाऱ्या मजुरांसह १००० हून अधिक लोकांनी मदत केली आहे.

मोठ्या प्रमाणावर परिश्रम करून बनवलेल्या या जहाजांना मोठ्या स्क्रीनवरील अॅक्शन दृश्यामध्ये पाहण प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचे असेल हे नक्की.

ऋतिकने ६० कोटी रुपयांपेक्षा अधिक मानधन मागितलं म्हणूनच त्याला सिनेमातून वेगळ केल गेल अशी चर्चा आहे.

काल २७ सप्टेंबरला या सिनेमाचा पहिला ट्रेलर युटूब वर प्रदर्शित करण्यात आला. त्यात दृश्यांची मांडणी, पात्रांची रचना यावरून ही फिल्म प्रसिद्ध हॉलीवूड फिल्म सिरीज ‘द पायरेट्स ऑफ करेबिअन’ वरून प्रेरीत असावी अशी मत सिनेमाच्या चाहत्यांद्वारे व्यक्त कलेली जात आहेत.

यात तथ्य किती हे तर येत्या दिवाळीत, ८ नोवेंबर ला हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?