ज्याच्या एका क्लिकवर संपुर्ण मनोरंजनविश्व चालतं अशा या खास यंत्राच्या शोधाची कथा तुम्ही वाचलीच पाहिजे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
‘गरज ही सगळ्या शोधांची जननी आहे.’
आदिमानवाच्या काळा पासूनचा इतिहास हेच सांगतो की मानवाला ज्याची ज्याची गरज भासली तो शोध माणूस लावत गेला. आधी काही गोष्टी अवघड होत्या त्या नवनवीन शोधांनंतर फारच सोप्या होऊ लागल्या.
काम पुर्ण होण्यासाठी लागणारा वेळही वाचायला लागला. काही शोध माणसाला परिपूर्ण बनवत गेले तर काही आळशी.
टीव्ही चा रिमोट हा ही एक असाच शोध आहे. खरं तर हा अत्यंत उपयुक्त शोध आहे. कारण हल्ली टीव्ही वर किमान ३००-४०० चॅनेल दिसतात आणि ते मॅन्युअली शोधून सेट करणे अत्यंत अवघड आहे.
जर आपण बातम्या पाहत असू आणि अचानक २०० चॅनेल नंतर चे कार्टून चॅनेल लावायचे झाल्यास टीव्ही वरील चॅनेल चे बटन २०० वेळा दाबावे लागेल.
आणि दरवेळी चॅनेल्स बदलताना हा बोटांचा विचित्र असा व्यायाम करावा लागेल. त्यामुळे रिमोट चा शोध लागल्याने ती एक पर्वणीच ठरते.
पूर्वी कमी चॅनेल्स असल्याने भारतात आलेल्या टीव्ही साठी रिमोट नव्हते. जेमतेम ३-४ चॅनेल दिसत असत आणि तेव्हा घरातील लहान मुले हेच रिमोट चे काम करत.
‘जा रे गुंड्या बातम्या लाव..!’ ‘जा ग चिमे डी डी नॅशनल लाव’ असे घरोघरी बालगोपाळ लगबगीने पळताना दिसायचे. हे जरी भारतातील चित्र असेल तरी अमेरिकेसारख्या प्रगत देशात ऑटोमॅटिक रिमोट केव्हाच बनले होते.
त्या रेमोटच्या बनण्याच्या मागची कहाणी आज जाणून घेऊ. रिमोट बनवण्यामागे एक मोठं करण होतं ज्याचा त्रास हल्लीच्या दिवसातही आपल्याला वाटतो.
ते म्हणजे टीव्ही वरच्या जाहिराती. कित्येक वेळा कार्यक्रम पाहताना मधेच २ ते १५ मिनिटे फक्त जाहिरातींनी भरलेली असतात.
काही वेळेस खूपच त्रासदायक वाटतात ह्या जाहिराती. आपण सुद्धा त्या म्युट करून ठेवतो आणि त्या संपल्या की मग आवाज पुन्हा वाढवून आपल्या आवडीच्या कार्यक्रम बघतो.
अशाच जाहिरातींना वैतागून अमेरिकेत १९५० च्या सुमारास झेनिथ इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा प्रेसिडेंट युजिन एफ मॅकडोनाल्ड ह्यांनी आपल्या कंपनीतील इंजिनीअर्स ना एक चॅलेंज दिले. टीव्ही साठी रिमोट बनवण्याचे चॅलेंज.
युजर जाहिरातींनी खूपच त्रस्त झाले होते. कार्यक्रम सुरू असताना मध्ये मध्ये जाहिराती जबरदस्तीने ऐकाव्या लागतात आणि त्यांना म्युट करायला दर वेळी जागेवरून उठून टीव्ही ची बटणं दाबून कोण आवाज कमी जास्ती करणार?? आणि किती वेळा..?
जाहिरात लागली तर आपल्याला चॅनेल बदलण्याचे देखील ऑप्शन आहे. पण त्यासाठी सुद्धा टीव्ही पर्यत जाऊन हातानेच बटणे दाबणे आलेच.
ह्याच सगळ्याला वैतागून त्यांनी आपल्या इंजिनीअर्स ना असे यंत्र बनवायला सांगितले जे टीव्ही चा आवाज, लांबून बंद आणि चालू करायला मदत करेल. तसेच चॅनेल बदलायला ही उठबस करायची गरज पडणार नाही. हे सगळेच त्या यंत्राद्वारे सहज शक्य होईल.
आणि असा झाला रिमोट चा जन्म..!
ज्याच्यामुळे माणसे टीव्ही बघताना रिलॅक्स झाली आणि जराशी यालाही देखील. कारण आवाज कमी जास्त करणे, चॅनेल बदलणे, टीव्ही चालू बंद करणे सगळेच एका क्लिक वर सोप्पे झाले. पण ह्या यंत्राला रिमोट असे नाव नसून फ्लॅशमॅटिक असे नाव होते.
ह्याचा शोध झेनिथ इलेक्ट्रॉनिक्स मधील युजिन पॉली नावाच्या इंजिनिअर ने १९५५ साली लावला.
पण हा युजिन पॉली इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रीकल इंजिनिअर नसून मेकॅनिकल इंजिनिअर होता. त्यामुळे त्याने बनवलेला रिमोट हा मेकॅनिकल रिमोट होता. अर्थातच त्याचे ओपेरशन सोप्पे नव्हते.
ह्या फ्लॅशमॅटिकच्या आधी काही रिमोट अस्तित्वात होते. जे एका कॉर्ड नी टीव्ही शी जोडलेले असायचे. त्याने चॅनेल बदलत यायचे.
पण जाहिराती बघाव्याच लागायच्या. त्या म्युट काही व्हायच्या नाहीत. ह्या फ्लॅशमॅटिक ने जाहिरातींचे तोंड मात्र बंद केले. ह्या फ्लॅशमॅटिक चा फ्लॅश लाईट टीव्ही लला असलेल्या सेन्सर वर काम करायचं आणि त्याचे स्वरयंत्र बंद करून टाकायचा.
बंदूक सदृश ह्या फ्लॅशमॅटिक मुळे टीव्ही च्या किमतीत मात्र बरीच वाढ झाली. ह्या रिमोट ला १०० $ मोजावे लागायचे.
त्यात ५०० $ अजून घातले तर एक कार सुद्धा विकत घेता यायची.
हा आविष्कार फार काही लोकांना आवडला नाही. झेनिथ वाल्याना परत चॅलेंज स्वीकारले. ह्या वेळी त्यांनी ठरवले की थोडा सोप्पा आणि टीव्ही शी छान इंटरॅक्ट करेल असा रिमोट बनवायचा. ह्याचे काम रॉबर्ट ऍडलर नामक इंजिनिअर ने सुरू केले.
आधी रेडिओ वेव्हस वापरायचे ठरले पण त्याची एक अडचण त्यांच्या लक्षात आली की त्या वेव्हस मुळे आपल्या टीव्ही बरोबर आजू बाजूच्यांचे ही चॅनेल बदलले जातील आणि चांगलाच गोंधळ उडेल. ही कल्पना त्यांनी सोडून दिली.
अल्ट्रा साऊंड वेव्हस वापरून रिमोट बनवण्यात आला आणि त्याचे ‘स्पेस कमांड’ असे बारसे झाले.
ह्या अल्ट्रा साऊंड वेव्हज ह्यूमन हिअरिंग सिस्टिम म्हणजेच माणसांच्या श्रवण संस्थेला हानिकारक नव्हत्या. पण प्राण्यांच्या श्रवण संस्थेला मात्र हानिकारक होत्या. प्राण्यांना सुपर सॉनिक वेव्हज आरामात ऐकू येतात आणि त्यांच्या फ्रिक्वेन्सीचा त्यांना त्रास होतो.
गम्मत अशीही व्हायची त्याकाळी की घरातले पाळीव प्राणी त्या रिमोट मुळे वैतागायचे.
कुत्री मांजरी ते रिमोट लावायचे किंवा तोडायचे जेणे करून कोणी ते वापरणार नाही आणि त्या वेव्हज चा त्रास त्या प्राण्यांना होणार नाही.
त्यातून हा रिमोट दिसायलाही मजेशीर होता. जणू काही स्टार वॉर्स सिनेमातील कोणते गॅजेट असावे. एक प्लास्टिक चे खोके आणि त्याला खाटखुट करायला ४ बटण. आत्ताच्या रेमोटच्या समोर हे जुने रिमोट सोपे असले तरी अगदीच सुमार होते.
१९७० च्या काळापर्यंत असेच ओबडधोबड रिमोट बनत होते. यु के च्या बी बी सी ने एक वेगळा रिमोट शोधला.
–
- टीव्ही चॅनेलचा “टीआरपी” म्हणजे काय? तो कसा मोजतात? जाणून घ्या..
- टीव्हीवर अधूनमधून दिसणाऱ्या त्या अंकांच कोडं अखेर सुटलं!
–
ज्याचे काम ऍनालॉग टीव्ही फ्रिक्वेन्सी वर चालायचे. ह्या रिमोट मध्ये नंतर अजून सुधारणा झाली आणि त्यावर नंबर पॅड आले. ज्याने टीव्ही बघणाऱ्याला सहज चॅनेल ही बदलत येऊ लागले.
आणि इथूनच खऱ्या अर्थाने functionally complicated पण वापरायला सोप्पे असे रिमोट बनायला सुरुवात झाली.
१९८० च्या सुमारास केबल टीव्ही सुरू झाल्याने २००-३०० चॅनेल्स बदलता येणे ही मोठी जबाबदारी रिमोट वर येऊन पडली. रिमोट वाट काहीच बटणे असल्याने हे कामच अवघड होऊन बसले. तरीही रेमोट्स बनवले गेले आणि टीव्ही पाहणाऱ्यांचे काम डोळे झाले.
आता तर असे सोनेरी युग आले की तुम्हाला रिमोटच हवा असेही काही नाही.
मोबाईलला वरील ऍप नि सुद्धा घरातील सगळे ऑटोमॅटिक उपकरणं कंट्रोल करता येतात.
एवढंच काय तर आपल्या आवाजात एक कमांड देऊन कामे करवली जाऊ शकतात. कुठी तरी सोफ्याच्या फटीत हरवलेला रिमोट शोधण्या ऐवजी वायरलेस डिव्हाईस ला एक कमांड दिली की झालं काम.
प्रगती इतकी झाली की ह्या रेमोटच्या उत्पत्तीची कहाणी कुठे तरी हरवून गेली. जरी काही उपकरणं वापरत नसलो तरी त्याच्या जन्माची कहाणी वाचून मजा वाटतेच.
म्हणूनच ही रिमोटच्या जन्माची ही रंजक कथा तुमच्या साठी खास आणली…!!
–
- काम न करणारा टीव्ही रिमोट दोनतीनदा आपटला की काम करू लागतो. असं का होतं? समजून घ्या
- रिमोट, मोबाईल की पॅड आणि कीबोर्डवरील ५ या अंकावर डॉट का असतो? जाणून घ्या
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.