' जगातील ही १३ स्थळं इतकी सुंदर आहेत की ‘खरी’ वाटत नाहीत! – InMarathi

जगातील ही १३ स्थळं इतकी सुंदर आहेत की ‘खरी’ वाटत नाहीत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

निसर्ग हे मानव जातीला दिलेले ईश्वराचे अद्भुत देणे आहे. हे जग निसर्गाच्या वेगवेगळ्या रूपांनी सजलेले आहे.

या पृथ्वीवरील खगोलिक आणि भौगोलिक चमत्कार आपल्याला चकित करून सोडतात. सात खंडातील वेगवेगळे भूप्रदेश इतके सुंदर नटलेले आहेत की त्यांना पाहत रहावे.

काही स्थळांची सुंदरता तर खरोखरीच अनाकलनीय आहे. कुठे निसर्गाच्या रंगाची उधळण आहे तर, कुठे निसर्गाच्या चमत्काराची थक्क करणारी रूपे.

त्यातील काही स्थानांची भेट खास तुमच्यासाठी या लेखातून. चला तर करूया व्हर्च्युअल भ्रमंती..!

 

१. पेरू देशातील हुआकाचीना ओऍसिस :

आईका शहरापासून ५ किलोमीटर लांब असलेले आणि जेमतेम १०० माणसे असलेले हे हुआकाचीना नावाचे छोटेसे गाव पेरू देशात आहे. चहुबाजुनी वाळवंट आणि त्याच्या मध्यभागी वसलेलं, स्वप्नवत वाटेल असं छोटंसं हुआकाचीना गाव.

त्याच्या मध्ये आहे एक सुंदर तळे म्हणजेच ओऍसिस.

 

huacachina oasis peru-inmarathi
flickr.com

 

गावात राहणाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्या तळ्या काठची मऊ चिखलस्वरूप माती ही औषधी आहे. औषधाने जे बरे होत नाही ते ह्या मातीने होऊ शकते. तळ्याच्या भोवताली हिरवी झाडे आहेत. गावात इमारती आणि छोटी घरे आहेत.

पण उन्हात रखरखणाऱ्या वाळवंटात हे ओऍसिस म्हणजे निसर्गाची जादूच आहे.

२. हातावरील गोल्डन ब्रिज, दा नांग – व्हिएतनाम :

दा नांग शहरातील या गोल्डन ब्रिजचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले आहे. एखाद्या तैलचित्रात शोभेल असा हा ब्रिज आहे. एका वर्षाच्या मेहनती नंतर हा सुंदर ब्रिज बनवण्यात आला आहे.

 

golden-bridge-da-nang-inmarathi
liveinmuine.com

 

सगळीकडून निसर्गाची सुंदरता आणि दोन तळ हातांवर बांधलेला हा ब्रिज. ह्या पुलावर उभे राहून आजूबाजूचे नैसर्गिक सौंदर्य लोकांना टिपता येते.

 

३. बीची हेड – युनायटेड किंगडम :

उंचावरून रोमांचक सूर्यास्त पाहण्याची आवड असलेल्यांनी जरूर पहावा असा हा बीची हेड युनायटेड किंगडम मध्ये पाहायला मिळतो.

 

Beachy_Head-inmarathi
celticmythshow.com

 

ही उंचच उंच भिंत ज्याला आपण क्लीफ असेही म्हणतो ही नैसर्गिक रित्या बनलेली आहे. इथे उभे राहिल्यास खाली निळाशार उत्तरी समुद्र दिसतो. ढग जर खाली उतरलेले असतील आणि ह्या क्लीफ वर आपण उभे असू तर जणू स्वर्गात उभे आहोत असा भास होऊ शकतो.

ज्यांना थरारक अनुभव घ्यायचा आहे त्यांनी आपल्या प्रवास डायरीत ह्या स्थळाचे नाव घालण्यास हरकत नाही.

 

४. हिनातूआन एंचांटेड रिव्हर, सुरीगाओ देल सूर – फिलिपाईन्स :

एंचांटेड म्हणजे जादुई… एखाद्या नदीला असे नाव का बरे दिले असेल? फिलिपाईन्स मध्ये सुरीगाओ देल सूर ह्या भागात ही नदी वाहते. ही फिलिपाईन्स समुद्राला पॅसिफिक समुद्रा पर्यंत जोडते.

 

Hinatuan_enchanted_river-inmarathi
wikipedia.org

 

ह्या नदीचे पाणी अत्यंत निर्मळ आहे. त्यामुळे ह्या नदी मध्ये असलेल्या खोल खोल गुहा वरून दिसतात. ज्याचा गाभा कोणी पहिला नाही आणि खोली कोणी मोजलेली नाही. पण ह्या नदीला ऑनदेर अशा निळ्या जांभळ्या रंगाच्या छटा आहेत.

ह्या छाटांमुळे ह्या नदीचे सौंदर्य खुलून येते. इथल्या लोकांची अशी समजूत आहे की, ह्या रंगछटा जादुई आहेत. म्हणूनच कदाचित या नदीला एंचांटेड रिव्हर नाव बहाल केले असावे.

 

५. नॉर्दन लेक, बैकल – रशिया :

जगातील ३% फ्रेश वॉटर मधील २०% शुद्ध पिण्यायोग्य पाणी पुरवू शकणारा हा लेक रशिया मधील सैबेरिया मध्ये आहे. फोटोत पाहिल्याप्रमाणे प्रारंभी हा काचेच्या तुकड्यांचा वाटतो. क्रिस्टल क्लीयर अशा पाण्याचा हा नॉर्दन लेक हिवाळ्यात मात्र बर्फाच्छादित असतो.

 

jordan lake-inmarathi
airpano.com

 

संपूर्ण जगात ह्या लेक मध्ये सगळ्यात शुद्ध पाणी आहे असे मानतात.

६. ट्रॅव्हरटिन पूल्स अँड टेरेसेस, पामुक्कले – टर्की :

बॉलिवूड चित्रपटातून दाखवले गेलेले हे ट्रॅव्हर्टिन पूल्स आणि टेरेसेस अत्यंत सुंदर आहेत. एखाद्या संगमरवरी धबधब्याप्रमाणे भासणारे हे पूल टर्की देशात पहावयास मिळतात.

 

travertine pool and terrace turkey-inmarathi
stmed.net

 

टप्प्या टप्प्यावर बनलेले पायऱ्यांसारखे हे पाण्याचे पूल टेरेस सारखे दिसतात. ह्यातून कार्बोनेटेड मिनरल वॉटर वाहते आणि ह्या पाण्याचे तापमान कायम एकच असते.

 

७. मार्बल केव्हस ऑफ लेक, जनरल कॅरेरा – चिली :

अर्जेन्टिना आणि चिली देशांच्या मध्ये ह्या संगमरवरी गुहा आढळतात. अतिशय एकांतात असलेल्या ह्या गुहा जणू काही कोणी विविध रंग वापरून चितारल्यासारख्या भासतात. निळ्या आणि हिरव्या रंगाच्या छटा ह्या संगमरवराला शोभून दिसतात.

 

marble caves of lake-inmarathi
dont-complain.com

 

सुमारे ६००० वर्षांपासून हे कोरीव काम निसर्ग करत आहे. इथे फारसे पर्यटक पोचले नसल्याने ह्याचे सौंदर्य अजूनही टिकून आहे. अशा ह्या सुंदर स्थळाला तुमच्या यादीत नक्की स्थान द्या.

 

८. माउंट ब्रोमो वोलकॅनो, जावा – इंडोनेशिया :

धगधगता, लावा ओकणारा ज्वालामुखी सुद्धा सुंदर असू शकतो ह्याचे उदाहरण म्हणजे माउंट ब्रोमो ज्वालामुखी. इंडोनेशिया देशातील हा एकमेव जिवंत असा ज्वालामुखी आहे.

 

mount-bromo-indonesia-volcano-inmarathi
twistedsifter.com

 

जादुई परिसर असलेला असा हा सुंदर ज्वालामुखी ब्रोमो टेंगर नॅशनल पार्क मध्ये स्थित आहे.

 

९. झिकिंथॉस आयलंड – ग्रीस :

रोमँटिक जोडप्यांसाठी पर्वणी असलेला हा झिकिंथॉस आयलंड ग्रीस मध्ये पाहायला मिळतो. ह्या आयलंड भोवताली ऑनदेर बीचेस म्हणजेच समुद्र किनारे आहेत. येथील पाणी इतके निर्मळ आहे की आपली सावली ५ मीटर खोल पाण्यात वाळूवर दिसून येते.

 

zakynthos island greece-inmarathi
ytimg.com

 

इथे नैसर्गिक क्लीफस आणि केव्हस बघायला मिळतात. अत्यंत सुंदर समुद्रकिनारे लाभलेला हा झिकिंथॉस नक्की पहावा असाच आहे.

 

१०. सॉल्ट लेक, सलार दे उयुनि – बोलिव्हिया :

मिठागरे सहसा समुद्रालगतच असतात. पण दक्षिण अमेरिकेच्या बोलिव्हिया मध्ये हा सॉल्ट लेक म्हणजेच मिठाचे तळे देखील पहावयास मिळते. ह्या तळ्याचे पाणी पारदर्शी आहे. ते आरशासारखे आपले प्रतिबिंब देखील दाखवते.

 

salt lake-inmarathi
suitcaseandi.com

 

इथे सतत मीठ बनत जाते आणि चित्रात दिसत असल्या प्रमाणे मिठागरे सुद्धा बनतात.

 

११. ग्रँड प्रिझमॅटीक स्प्रिंग, व्योमिंग – युएसए : 

मिनरल वॉटरचा स्रोत असलेले हे गरम पाण्याचे तळे व्योमिंग – अमेरिका इथे बघायला मिळते. चित्रात तर हे फोटोशॉप टेक्निक वापरून काही रंग भरल्यासारखे वाटते. पण हे नैसर्गिकच इतके सुंदर आहे.

 

grand prismatic spring-inmarathi
unique-w.com

 

ह्याच्या मिनरल्समुळे तळ्याच्या कडांना वेगवेगळ्या रंगाचे पट्टे बघायला मिळतात. अमरिकेतील सगळ्यात मोठे गरम पाण्याचे हे तळे आहे. ह्याचा घेर ३०० मीटर असून खोली ६० मीटर आहे. मायक्रोबियल मट्स पासून ह्या तळ्याला इंद्रधनुषी रंग मिळाले आहेत.

 

 

१२. द डार्क हेजेस – नॉर्दन आयर्लंड :

अत्यंत गूढ वातावरण निर्मिती करणारी निसर्गाची एक अदा. नॉर्दन आयर्लंडच्या एका रस्त्यावर बीच प्रजातीची अस्ताव्यस्त फांद्या असलेली झाडे आढळतात. ह्या झाडाच्या फांद्या रस्त्याच्या वरून एकमेकांत गुंतल्या आहेत.

जणू काही रस्त्यावरून त्यांनी सावली देण्यासाठी कमान बांधली असावी आणि ह्या कमानीचा एक लांबलचक बोगदाच तयार झाला आहे.

 

the dark hedges northern ireland-inmarathi
belfasttelegraph.co.uk

 

ह्या बीच झाडाच्या कामानीला एका हॉलिवूड टीव्ही शोमध्ये स्थान मिळाले आहे. तो शो होता ‘गेम ऑफ थ्रोन्स’ अत्यंत प्रसिद्ध झालेल्या ह्या शो मध्ये ह्या झाडांच्या कामानीची झलक बघायला मिळते.

 

१३. इक-किल सिनोट, चिचेन इतझा – मेक्सिको :

पाण्याचा खूप मोठा चमत्कारिक घट म्हणू शकतो अस्सा हा इक-किल सिनोट अत्यंत देखणा आहे. वरून उघडी आणि खाली हिरवट निळे पाणी. तिथे जायला पायऱ्या देखील बांधलेल्या आहेत.

 

ik kill cenote-inmarathi
elcomercio.pe

 

८५ खोल २०० फुटाचा घेर असलेली विहिरच जणू. ह्यात वरून झाडांच्या पारंब्याही लटकलेल्या दिसतात. पर्यटकांना इथे पोहण्यासही परवानगी आहे. ह्या सुंदर चमत्काराला तुमच्या बकेट लिस्ट मध्ये दाखल करायला हरकत नसावी.

ह्या स्थळांना भेट द्यायला जाणे झाल्यास उत्तमच, पण न झाल्यास ही व्हर्च्युअल ट्रिप म्हणजे निसर्गाची एक जादुई सफरच आहे. ह्याचाही आनंद घरबसल्या घ्या..!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?