१८५७ चा उठाव चिरडून, इंग्रजांनी घेतला, मुस्लिमांचा थरकाप उडवणारा बदला…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
१८५७ चा उठाव तसा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचं पाहिलं सुवर्ण पान समजलं जातं. ब्रिटिश शासनाविरोधात करण्यात आलेला तो पहिला सशस्त्र उठाव होता ज्याने ब्रिटनच्या राणीला भारत विषयक धोरणात आमूलाग्र बदल करण्यास भाग पाडलं होतं.
भारतातील ईस्ट इंडिया कंपनीच शासन संपुष्टात आणून राणींने ब्रिटिश सरकारच्या ताब्यात भारतीय द्वीपकल्पाची सत्ता सुपूर्द केली होती.
अनेक लोकांच्या मतानुसार १८५७ चा उठाव हा जुलमी ईस्ट इंडिया कंपनी विरोधात पुकारलेला एकत्रित बंड होता. तर अनेकांच्या मते ते स्वातंत्र्य समर होते.
अनेकांना तो उठाव राजेशाहीच्या पुनरुज्जीवनासाठी शासकांनी पुकारलेला एकत्रित उठाव होता.
त्यातून भारतात राजेशाहीच पुनरुज्जीवन हा एकमेव उद्देश होता असं म्हटलं जातं. परंतू या सर्व पारंपरिक मतांना खोडुन काढणारं एक अजून मत आहे. त्यानुसार,
हा उठाव भारतात मुस्लिम शासकांनी हिंदू शासकांना हाताशी घेऊन पुकारलेला “जिहाद” होता. यातून त्यांना मुघल सत्तेचे पुनरुज्जीवन करायचे होते.
हे कसं होत ते आपण जाणून घेऊया …
१८१८ साली मराठा साम्राज्य खालसा करून ब्रिटिशांनी संपूर्ण भारतावर एकछत्री अंमल प्रस्थापित केला होता. त्यानंतर त्यांनी प्रस्थापित राज्यांशी तैनाती फौजेचा करार केला होता. त्यांनी दिल्लीतील मुघल शासन संपूर्णत: फोडून काढत, दिल्ली येथील मुघल सत्ताकेंद्र एकदम कमकुवत करून टाकलं होतं.
यावरच न थांबता त्यांनी बहादुरशहा जफरला नाममात्र मुघल अधिपती म्हणून सत्तेत ठेवलं होतं.
यामुळे दिल्ली व उत्तर भारतातील मुस्लीम संस्था मध्ये कमालीचं चिंतेच वातावरण निर्माण झालं होतं.
मुस्लिम शासक हे वेगवेगळे झाले असून आता भारतात एकजूट मुस्लिम राजवट नसल्यामुळे मुस्लिमांच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर त्यांचा मनात प्रचंड अस्वस्थता होती.
मुस्लिम शासन असताना धर्म कार्यासाठी प्रचंड निधी उपलब्ध तर असायचा वरून एक वेगळा सन्मान मुस्लिम धर्मसंस्थाना देशभरात असायचा, निर्धोक पणे धर्मांतर, धर्मशिक्षणचे प्रयोग राबवता येत होते. परंतु ब्रिटिश शासनाने खासकरुन ईस्ट इंडिया कंपनीने त्यांच्यावर बरीच बंधनं लादली होती.
यामुळे त्यांचा मनात असंतोष खदखदत होता. याविरुद्ध एकत्र येऊन उठाव पुकारण्याचा त्यांचा मानस होता.
दिल्ली व लखनऊ या मुस्लिम सत्ताकेंद्रातील मुल्ला मौलवी यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनाविरोधात एकत्रित “जिहाद” पुकारून मुस्लिम सत्ताकेंद्राचे पुनरुज्जीवन करण्याची कल्पना मांडली होती.
त्यांनी ही कल्पना वेळोवेळी उत्तरेतील मुघल शासक बहादूर शहा जफर जवळ मांडली होती. पण ते कसं करायचं यासाठी त्यांचा कडे विस्तृत नियोजनाचा कुठलाच आढावा नव्हता. शिवाय एकटे मुस्लिम ईस्ट इंडिया कंपनीशी लढा देऊ शकत नाही हे देखील ते जाणून होते.
यासाठी हिंदू शासकांना हाती घ्यावं लागेल, हे त्यांना माहिती होतं.
१८५७ च्या उठावाआधी ईस्ट इंडिया कंपनीने भारतभरातील सत्ता संस्थांनात तैनाती फौज लावली होती. त्यामुळे राजेशाहीची स्वायत्तता नष्ट झाली होती.
यामुळे अनेक हिंदू राज्यकर्त्यांचा मनात असंतोष खदखदत होता. यात भरीसभर म्हणून ईस्ट इंडिया कंपनीने दत्तक विधान ना मंजूर केलं, त्यामुळे असंतोष भडकला झाशीची राणी, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे हे लोक याविरुद्ध पेटून उठले, सोबत भारतातील इतर संस्थानिकांचे त्यांना पाठबळ मिळाले.
अश्यावेळी ह्या असंतोषाचा फायदा मुस्लिम राज्यकर्त्यांनी घेतला. त्यांनी हिंदु संस्थानिकांच्या मनात मुघल सम्राट बहादूर शहा जफरला पुन्हा भारताचा राजा बनवण्यासाठी व जुलुमी ब्रिटिश व्यवस्थेला उथलवून टाकण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.
हिंदू राजे ह्या साठी तयार झाले. त्यांनी बहादूर शहा जफरचे नेतृत्व त्यासाठी मान्य केले. त्यामुळे ह्या युद्धात हिंदू राज्यकर्त्यांना मुस्लिम समुदायाचा पुरेपूर पाठिंबा मिळाला.
१८५७ चा उठाव झाला खरा, पण व्यवस्थित नियोजन व एकत्रित प्रयासाच्या आभावामुळे ईस्ट इंडिया कंपनीने हा उठाव चिरडला. ह्यात बरेच संस्थांन खालसा केले. झाशीची राणी, तात्या टोपे यांनी आपले प्राण यासाठी गमावले, नानासाहेब पेशवे नेपाळला हिंदू सम्राटाच्या आश्रयाला पळाले.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे नेपाळच्या हिंदु सम्राटाने मात्र या युद्धात ब्रिटिश राज्यकर्त्यांना मदत केली होती.
हे देखील एक कारण आहे की १८५७च्या उठावाला मुघल सत्तेच्या पुनर्स्थापनेसाठी केलेला जिहाद म्हटलं जातं. जर हा उठाव बहादूर शहा वगळता इतर कुठल्या हिंदू राज्याचा नेतृत्वाखाली झाला असता, अगदी नानासाहेब पेशव्याच्या नेतृत्वात झाला असता तर ह्यात मुस्लिम शासक उतरलेच नसते.
पण हा उठाव बहादूर शहाच्या अधिपत्याखाली झाला आणि त्याला धार्मिक संस्थांच्या मिळालेल्या पाठबळामुळे मुस्लिम समाज त्यात सहभागी झाला होता.
मुस्लिम शासित राष्ट्राची निर्मितीसाठी पुकारलेला एक जिहाद होता असा देखील उल्लेख बऱ्याच ठिकाणी आढळतो.
ह्या दाव्याला पूरक अस कारण १८५७ च्या नंतरच्या इतिहासात आहे. जेव्हा १८५७ चा उठाव चिरडण्यात आला आणि ईस्ट इंडिया कंपनीचे सरकार जाऊन ब्रिटिश संसदेच्या ताब्यात भारत आला, तेव्हा त्यांनी मुस्लिम राज्यकर्ते संपवले.
त्यांनी २४ मुघल युवराजांचा खून केला. तसेच हिंदू व्यापाऱ्यांचा मदतीने अनेक जुने दर्गे मशिदी विकत घेऊन त्या ताब्यात घेतल्या.
–
- ‘शिपायांचा उठाव’ आणि तात्या टोपेंचं धाडसी ‘ऑपरेशन रेड लोटस’
- इंग्रजांनी “मोस्ट डेंजरस मॅन” ठरवलेला हा मराठी क्रांतिकारक आपण साफ विसरलो आहोत
–
तसेच त्यांनी दिल्ली व लखनऊ या मुस्लिम बहुल भागातील धर्म संस्थांवर ताबा घेतला. मुस्लिम मुल्ला आणि मौलवी , धर्मगुरू , फकीर यांच्यात हत्या केल्या, त्यांना शिक्षा केली. त्यांचा संपत्तीला ताब्यात घेतले. लाखो मुस्लिमांची हत्या केली. अनेकांना बंदिस्त केले.
अनेक मुस्लिम कवी आणि शायर यांनी ब्रिटिशांच्या ह्या क्रुरतेचा उल्लेख केला आहे.
हा सर्व मुस्लिम विरोधात्मक पवित्रा त्या शासकांना घ्यावा लागला कारण त्यांना माहिती होतं की हे मुस्लिम राजे व शासक ब्रिटिश सत्तेविरुद्ध कधीही “जिहाद ” पुकारू शकतात.
ह्या वरील सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास अनेक इतिहासकारांनी केला असून त्यांचा मतानुसार १८५७ चा उठाव हा मुस्लिमांचा जिहाद होता ज्याला ब्रिटिशांनी दडपले होते.
अर्थातच अनेक असे इतिहासकार देखील आहेत ज्यांना हा सिद्धांत मंजूर नाही. पण १८५७ च्या उठावाचा हा भाग मात्र कायम दुर्लक्षित राहिला आहे जो खरंतर राहायला नको होता.
यातून एक संकेत असा देखील मिळतो की मुस्लिमांना देखील त्यांचे प्रभुत्व असलेल्या मुस्लिम राष्ट्राची, गादीची निर्मिती करायची होती व मुस्लिम धर्मसंस्था त्यासाठी प्रयत्न करत होत्या.
–
- भारताप्रमाणेच ब्रिटीशांच्या तावडीतून स्वतंत्र झालेले हे देश खरा जागतिक इतिहास दर्शवतात
- जेव्हा मुठभर मराठे दहा हजारांच्या गनीमाला कापून काढतात…!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.