इतर देशातल्या या ५ मृत्यूदंडाच्या पद्धती बघून थक्क व्हाल!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
कुठल्याही क्रूर गुन्ह्यासाठी जगभरातील न्यायालये एकच शिक्षा देतात जी अंतिम असते, ती शिक्षा म्हणजे मृत्युदंड. भारतीय न्यायव्यवस्थेत देखील एखाद्या गुन्हेगारासाठी जर कुठली सर्वात मोठी शिक्षा असेल तर ती म्हणजे मृत्युदंड…
पण भारतात मृत्युदंड म्हणजे फाशीची शिक्षा, तसेच इतर देशांमध्ये मृत्युदंड देण्याचे वेगवेगळे प्रकार आहे.
ह्यापैकी काही तर अत्यंत क्रूर आहेत. मृत्युदंडाचे असेच काही प्रकार आपण जाणून घेणार आहोत.
१.फाशी :
मृत्युदंड देण्याचा सर्वात प्रसिद्ध प्रकार म्हणजे फाशीची शिक्षा. हा प्रकार भारत, अफगाणिस्तान, बांग्लादेश, पाकिस्तान, इराण, इराक, जपान, मलेशिया आणि कुवैत ह्या देशांमध्ये वापरला जातो.
अनेक देशांमध्ये फाशी देण्याआधी गुन्हेगाराच वजन केलं जाते जेणेकरून दोरखंड किती मोठा लागेल हे कळू शकले.
भारतात नाय्यालयीन मुत्युदंडाच्या शिक्षेसाठी फाशी दिली जाते. मृत्युदंडाचा हा प्रकार भारतात अनेक वर्षांपासून प्रचलित आहेत. अगदी प्राचीन काळापासून फाशी देण्याची ही प्रथा सुरु आहे.
इराणमध्ये २०१३ मध्ये ३६९ लोकांना फाशी देऊन ठार मारण्यात आले होते.
२६ एप्रिलला बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एक इराणी कैदीला सार्वजनिकपणे फाशी देण्यात आली. एका इराणीने रस्त्यावर झालेल्या भांडणात एकाची चाकू भोकसून हत्या केली होती, त्या आरोपाखाली त्याला १५ एप्रिल २००७ ला फाशीची शिक्षा देण्यात आली.
अमेरिकेत फाशी देण्यात आलेली शेवटची व्यक्ती म्हणजे विल्यम बेली ज्याला १९९६ मध्ये डेलॅरेअरमध्ये हत्या केल्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा देण्यात आली होती.
२.गोळी मारणे :
गोळी झाडून मृत्युदंड देणे ही पद्धत इंडोनेशिया, चीन, सौदी अरब, तैवान, आणि व्हियेतनाम येथे वापरली जाते. फायर स्क्वॉडमध्ये १२ सशस्त्र सैनिक कैद्याला गोळ्या झडतात. जर त्यानंतरही कैदीचा मृत्यू झाला नाही तर कमांडर त्याच्या डोक्यावर एक शेवटची गोळी चालवतो.
इंडोनेशियामध्ये जानेवारी २०१३ साली एका ५६ वर्षीय वृद्ध ब्रिटीश महिला लिंडसे सँडीफोर्डला कोकेनची स्मगलिंग करण्याच्या आरोपाखाली फायर स्क्वॉड अंतर्गत मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
युनायटेड स्टेट्सने १८ जून २०१० ला युटा येथे रोनी ली गार्डनरला शेवटची फायर स्क्वॉड अंतर्गत शेवटची मृत्युदंडाची शिक्षा दिली होती.
३.शिरच्छेद करणे :
संपूर्ण जगात केवळ सौदी अरेबियात मृत्युदंडाची शिक्षा ही शिरच्छेद करून दिली जाते. तसेतर मृत्युदंड देण्याची हि पद्धती खूप प्राचीन आहे. ह्यामध्ये धारधार तलवारीने मानेवर वार करत शीर धडापासून वेगळे केले जाते. ह्यालाच शिरच्छेद करणे असे म्हणतात.
एमनेस्टी आंतरराष्ट्रीय नुसार २०१३ साली सौदी अरब येथे ७९ लोकांचे शिरच्छेद करण्यात आले.
तर मागील वर्षीच्या मी महिन्यात सौदी अरेबियात पाच येमेनी माणसांना देखील हिच शिक्षा करण्यात आली. ह्या येमेनी पुरुषांना सशस्त्र टोळी, सशस्त्र लुबाडणे व हत्या करण्याच्या आरोपाखाली दोषी ठरवले गेले होते.
शिरच्छेद करण्याची ही प्रक्रिया सर्वांसमोर उघड्यावर केली जाते.
४.प्राणघातक इंजेक्शन :
मृत्युदंडाचा शेवट हा मृत्यूच असतो, मग ती कुठल्याही पद्धतीने का ना होवो. त्याच पद्धतींपैकी एक आहे प्राणघातक इंजेक्शन पद्धती. ही पद्धती मृत्युदंडाच्या इतर पद्धतींपैकी जरा कमी क्रूर आहे.
मृत्युदंडाची ही पद्धती अमेरिका, चीन आणि व्हियेतनाम ह्या देशांत वापरली जाते. ह्या इंजेक्शनमध्ये साधारणतः तीन प्रकारच्या रसायनांचा उपयोग होतो. सोडियम पेंटोनाल, पॅनकुरोनियम ब्रोमाईड आणि पोटॅशियम क्लोराईड.
हे इंजेक्शन आरोपीला लावले जाते. पण जर एका इंजेक्शनच्या डोजमध्ये त्या व्यक्तीला मारायला वेळ लागत असेल म्हणजेच हे रसायन त्या व्यक्तीवर लगेच परिणाम करत नसेल तर हे त्या व्यक्तीसाठी दीर्घकाळापर्यंत त्रासदायक ठरू शकते.
५.खुर्चीतून विद्युतप्रवाह करणे :
युनायटेडस्टेट्स हा असा एकमेव देश आहे जो अश्याप्रकारच्या खुर्चीतून विद्युतप्रवाह करून मृत्युदंड देतो. ही प्रक्रिया अतिशय क्रूर आणि त्रासदायक आहे.
–
- भगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांच्या फाशीविरोधात एका पाकिस्तानी वकिलाची लढाई
- भारतात सुर्योदयापूर्वीच फाशी का दिली जाते?
–
ह्यामध्ये शिक्षेस पत्र असणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावरील केस काढले जातात. त्यानंतर तिला एका खुर्चीत बसविण्यात येते, तिला एक टोपी घातली जाते ज्याच्या आत मिठाच्या पाण्यात भिजवलेला स्पंज असतो.
त्यानंतर ५०० ते २००० व्होल्ट पर्यंत विद्युतप्रवाह सोडला जातो. ही प्रक्रिया तोवर निरंतर सुरु असते जोवर ती व्यक्ती आपला शेवटचा श्वास घेत नाही.
रॉबर्ट ग्लेसन ज्युनिअर ह्या ४२ वर्षाच्या व्यक्तीला दोन वेगवेगळ्या प्रसंगी दोन हत्या केल्याच्या आरोपाखाली १६ जानेवारी २०१३ ला खुर्चीतून विद्युतप्रवाह देत शिक्षा करण्यात आली.
१९९७ साली फ्लोरिडा येथे पेड्रो मेडीना नावाच्या आरोपीला अशीच शिक्षा ठोठावण्यात आली. तेव्हा ह्या प्रक्रियेदरम्यान त्या आरोपीचं डोकं जळायला लागलं.
तसेच फ्लोरिडा मध्येच १९९९ साली एलेन ली डॅवीस ह्या नावाच्या व्यक्तीला देखील ह्याच पद्धतीने मृत्युदंड देण्यात आला.
पण २००८ साली नेब्रास्का सर्वोच्च न्यायालयाने अश्याप्रकारे मृत्युदंड देण्याच्या पद्धतीला ‘क्रूर आणि अनैसर्गिक’ सांगत अमान्य ठरवलं.
–
- फाशीची शिक्षा दिल्यानंतर जज साहेब पेनाची निब का तोडतात?
- काळ्या पाण्याची शिक्षा एवढी भयावह का होती? जाणून घ्या!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.