' घातक भारतविरोधी षडयंत्र, जे आपल्यापासून लपवून ठेवण्यात आलं आहे. – InMarathi

घातक भारतविरोधी षडयंत्र, जे आपल्यापासून लपवून ठेवण्यात आलं आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक: शुभम जयसिंगपुरे

===

गेल्या काही दिवसांपासून ‘शहरी नक्षलवाद’ हा शब्द मेन स्ट्रीम मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून बराच गाजतो आहे, त्यामागे कारण देखील तेवढंच मोठं आहे.

३१ डिसेंबरला पुण्यात आयोजित झालेली एल्गार परिषद आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी भीमा कोरेगाव येथे उसळलेली दंगल या दोन्हीमागे नक्षलवाद्यांचा हाथ असल्याचे भक्कम पुरावे यापूर्वीच पुणे पोलिसांच्या हाती लागलेले होते, ज्या नंतर कबीर कला मंचाच्या अनेक कलाकारांवर ‘नक्षल समर्थक’ असल्याचा ठपका ठेऊन त्यांना अटक करण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वीच देशभरातल्या विविध शहरांमध्ये पुणे पोलिसांनी छापे मारत वरावरा राव (तेलंगाणा), वर्नोन गौंसाल्विज व अरुण परेरा (मुंबई), सुधा भारद्वाज (रांची) आणि गौतम नवलाखा (दिल्ली) या तथाकथित समाजसेवकांना अटक केलेली आलेली आहे.

हे सर्वजण नक्षलवाद्यांसाठी शहरी भागात ‘थिंक टॅंक’ म्हणून काम करत होते असा पोलिसांना संशय आहे. या छाप्या दरम्यान पोलिसांनी नक्षलवाद्यांसंबंधीत महत्वपूर्ण कागदपत्रे, पुस्तके, पत्रे आणि इतर नक्षल साहित्य जप्त केलेले आहे.

 

Urban naxals InMarathi

या अटक सत्रानंतर एकीकडे विरोधी पक्ष कवी आणि विचारवंतांना अटक केल्याच्या कारणावरून सरकार आणि पोलिसांवर टीकेची झोड उठवत असतांना दुसरीकडे मेन स्ट्रीम मीडिया मधला एक मोठा वर्ग ह्या विचारवंतांच्या अटकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो आहे.

अटकेत असलेल्या तथाकथित समाजसेवक आणि विचारवंतांचे शिक्षण दाखवून त्यांना निर्दोष भासवण्याचा प्रयत्न तर केल्याचं जातो आहे पण सोबतच ‘शहरी नक्षलवाद’ ह्या सारखी संकल्पनाच मुळात अस्तित्वात नसल्याचे अनेक विचारवंताकडून (?) बोलल्या जात आहे.

साधारणपणे नक्षलवाद किंवा नक्षलवादी म्हणजे घनदाट अरण्यात वास्तव्यास असणारे, हिंसक मार्गाने क्रांती घडवून प्रस्थापित शासन व्यवस्था उलथवून टाकून ‘जनतेचे सरकार’ स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवणारे डाव्या विचारांचे कार्यकर्ते असाच एक समज सर्वसामान्यांमध्ये प्रचलित आहे.

पण हेच वास्तव आहे का? नक्षलवादी चळवळ ही केवळ आणि केवळ जंगलांपर्यंतच सीमित राहिलेली आहे का? तर याचे स्पष्ट उत्तर आहे नाही.

‘In the absence of a strong revolutionary urban movement, the growth of the people’s war will face limitations and difficulties in it’s advancement’

ही वाक्य आहेत ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ [मार्कसिस्ट -लेनिनिस्ट] आणि ‘माओईस्ट कम्युनिस्ट सेंटर ऑफ इंडिया’ या दोन नक्षलवाद समर्थक संघटनांच्या कोअर कमिटींनी सप्टेंबर २००३ मध्ये तयार केलेल्या एका ड्राफ्ट मधील आणि या ड्राफ्ट चे नाव आहे,

‘Strategy And Tactics Of The Indian Revolution.’

 

Maoists_Naxal_Movement-inmarathi
indiandefencereview.com

नक्षल चळवळ अर्थातच या तथाकथित ‘पीपल्स वॉर’ मध्ये शहरी भागांचे महत्व, शहरी नक्षलवादाची कार्यपद्धती आणि त्यांच्या उद्दिष्टांचा विचार आपण पुढील काही मुद्द्यांच्या आधारावर करणार आहोत.

शहरी भागातल्या कार्यांची उद्दिष्टे :

शहरी भागात चळवळ उभी करतांना अनेक प्रकारच्या विषयांमध्ये हाथ घालावा लागतो, अनेक प्रकारची कार्ये करावी लागतात; ज्या बद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात.

१. चळवळीसाठी कार्यकर्त्यांची भरती करणे :

‘पीपल्स वॉर’च्या शहरी भागातील कार्यांपैकी हे सर्वात महत्वाचं आणि मोठं कार्य असतं, कुठलाही लढा किंवा चळवळ उभी करायला ‘मानवी भांडवलाची’ गरज सगळ्यात जास्त पडते आणि म्हणूनच शहरी भागात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असणारा कनिष्ठ मध्यमवर्गीय समाज, विद्यार्थी, विचारवंत आणि मध्यमवर्गीय नौकारदारांना चळवळीत सामील करण्यावर नक्षलवाद्यांचा मोठ्या प्रमाणावर भर असतो.

public protest inmarathi

तसेच महिला, दलित आणि धार्मिक अल्पसंख्याकांसाठी काम करणाऱ्या संस्थांमार्फत चळवळी उभ्या करून अशा चळवळींना राजकीय रंग देण्याचे काम करून जास्तीत जास्त लोकांना ‘पीपल्स वॉर’ मध्ये सहभागी करण्याचे उद्दिष्ट असते.

२. चळवळीसाठी विविध आघाड्या तयार करणे :

 

maoist_women_inmarathi

यात सर्वप्रथम नौकारदारांना एकत्र करून त्यांची आघाडी स्थापन करण्याचे कार्य असते, त्या नंतर सामान्य कामगार आणि शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांची युती करणे, तसेच साम्राज्यवादी दडपशाही व शोषणाविरुद्ध आघाड्या तयार करण्याचे काम नक्षलवाद्यांमार्फत करण्यात येते; आणि याच विविध आघाड्यांना पुढे करून छुप्या पद्धतीने शहरी भागात चळवळीचे काम पुढे रेटल्या जाते.

३. सैनिकी कार्य :

‘Peoples liberation guerilla army’ आणि ‘Peoples liberation army’ जंगली क्षेत्रात प्रत्यक्ष सैनिकी कारवायांमध्ये सहभागी होत असतांना शहरी चळवळ ह्या सशस्त्र लढ्याला मानवी भांडवल आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्याचे महत्वपूर्ण कार्य करते.

आता वरील मुद्द्यांवर आधारित काही उद्दिष्टांची सविस्तर माहिती घेऊयात.

१. उद्योग वर्गात चळवळीची उभारणी :

रेल्वे, खनिज, तेल, नैसर्गिक वायू, वाहतूक, दळणवळण इत्यादी उद्योगांचा सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यावर थेट परिणाम पडतो, त्यामुळे या क्षेत्रांमध्ये शिरकाव केल्यास चळवळीला ह्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. हे सर्व उद्योग सार्वजनिक क्षेत्रातले असले तरी गेल्या काही वर्षात या क्षेत्रांमध्ये खासगीकरणाचे वारे वाहू लागलेले आहेत. ज्यामुळे या उद्योगांमधल्या कामगार वर्गात असंतोषाचे वातावरण आहे.

कित्येक वेळा या असंतोषाचे रूपांतर आंदोलनांमध्ये होते. विविध कामगार युनियन तयार करून अथवा प्रस्थापित कामगार युनियन मध्ये डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांची (कॉम्रेड) भरती करून या आंदोलनांना राजकीय स्वरूप देण्याचे मनसुबे नक्षली ‘थिंक टॅंक’ कडून आखले जातात.

 

Union protests Inmarathi

कामगारांना चळवळीकडे आकर्षित करण्यासाठी मुख्यत्वे दोन गोष्टींचा आधार घेतला जातो.

सर्वप्रथम संघर्षाच्या काळात विविध प्रकारचे प्रोपोगँडा चालवून, कामगार मासिक आणि युनियनच्या माध्यमातून कामगारांना चळवळीकडे खेचले जाते किंवा एक प्रकारे त्यांचा बुद्धिभेद केल्या जातो. या शिवाय वर नमूद केल्याप्रमाणे त्या त्या उद्योगांमधल्या प्रस्थापित कामगार युनियन्समध्ये कार्यकर्त्यांना (कॉम्रेड) पाठवून चळवळीसाठी अनुकूल असा अजेंडा राबविला जातो.

पडद्याआडच्या घडामोडी पुढे येऊ नये म्हणून हे काम छुप्या पद्धतीने आणि संथगतीने सुरू असते.

२. शहरी चळवळीचे सैनिकी कार्य :

‘Peoples Liberation Army’ अर्थातच घनदाट अरण्यात राहून चळवळीसाठी काम करणारे माओवादी प्रत्यक्षपणे देशाच्या सुरक्षा यंत्रणांविरुद्ध हिंसक कारवाया घडूवून आणत असतात, मात्र या हिंसक कारवायांना अत्यावश्यक असणारे शस्त्रास्त्र आणि जास्तीत जास्त समर्पित कार्यकर्त्यांची (कॉम्रेड) फौज उपलब्ध करून देण्याचे महत्वपूर्ण काम शहरी चळवळीकडे असते.

या व्यतिरिक्त चळवळीसाठी शत्रू असलेले लष्कर, निमलष्कर, पोलीस दल आणि इतर अनेक शासकीय यंत्रणांमध्ये शिरकाव करून या दलांमध्येच उठाव घडवून आणण्यासाठी विविध प्रकारची गुप्त माहिती मिळवण्याचे कार्य सुद्धा केले जाते.

army_inmarathi
The logical indian

या शिवाय विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांच्या आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी चळवळीला शहरी भागावर अवलंबून राहावे लागते. शस्त्रास्त्रांची दुरुस्ती, ‘पीपल्स वॉर’मध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रवेश, ग्रामीण चळवळीत जास्तीत जास्त लोकांना खेचण्यासाठी विविध बुद्धिभेद करणारे प्रोपोगँडा चालवण्यासाठी शहरी चळवळीची सर्वात जास्त मदत होते.

३. भागात पक्षाची रचना :

ग्रामीण भागातल्या रचनेपेक्षा शहरी रचना ही वेगळ्या प्रकारची असते, प्रामुख्याने ती अस्थिरच असते. या मागची मुख्य कारणं म्हणजे स्थिर संरचनेचा अभाव, नेहमी बदलत राहणारे नेतृत्व, उघड व गुप्त कार्य, शहरी नेतृत्व व ग्रामीण चळवळ यांच्यातला समन्वयाचा अभाव, सुरक्षा यंत्रणांची मुस्तैदी आणि चळवळीसाठी फायदेशीर ठरू शकणाऱ्या कुठल्याही विषयावर तात्काळ प्रतिक्रिया देण्याची गरज इत्यादि.

 

urban-mao-inmarathi
thequint.com

शहरी चळवळीची उभारणी प्रामुख्याने ‘राजकीय केंद्रीकरण’ आणि ‘संस्थात्मक विकेंद्रीकरणाच्या’ माध्यमातून करण्यात येते, म्हणजे प्रत्येक कार्यकर्ता आणि संस्थांचा राजकीय – वैचारिक पाया मजबूत असला पाहिजे जेणेकरून स्वतंत्र्यरीत्या काम करतांना त्यांना कुठल्याही अडचणींचा सामना करण्याची गरज पडू नये.

सर्वोच्च नेतृत्व करणारे कॉम्रेड कधीही थेट कार्यकर्त्यांशी संबंध ठेवत नाहीत की त्यांना मार्गदर्शन करत नाही, असे केल्याने त्यांचे बिंग फुटण्याची भिती असते म्हणूनच प्रत्येक स्तरावर चळवळीच्या कामांचे विकेंद्रीकरण केल्या जाते.

चळवळीच्या अगदी सुरवाती पासून ते शेवट पर्यंत शहरी भाग कार्यकर्ता आणि नेत्यांची भरती करण्याचे महत्वपूर्ण काम पार पाडतो म्हणूनच काय तर ‘पीपल्स वॉर’ मध्ये शहरी चळवळीचे महत्व अनन्यसाधारण आहे.

गेल्या काही काळात ज्या कारणांवरून अनेक उच्चशिक्षित विचारवंत आणि समाजसेवकांची धरपकड केल्या गेलेली आहे ते बघता ‘पीपल्स वॉर’ मधल्या उद्दीष्टपूर्तींसाठीच तर ही मंडळी छुप्या पद्धतीने काम करत नसावी ना अशी शंका उपस्थित होते.

INDIA-POLITICS-PROTEST-ISLAM

भीमा कोरेगावच्या दंगलीवर सत्यशोधन समितीने तयार केलेला सविस्तर अहवाल येथे वाचा:

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?