नोकरी करत व्यवसाय करायचाय? ह्या “सिनेस्टार्सची स्ट्रॅटेजी” तुमच्यासाठी दिशादर्शक ठरेल!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आऊट-गोईंगपेक्षा पैशाचे इन-कमिंग कसे वाढेल ह्याकडे सर्वसाधारणपणे सगळ्यांचे लक्ष असते.
नवनवीन क्लृप्त्या लढवून पैशा ला पैसा जोडला जातो. कोणी म्हणतात गुजराती आणि मारवाडी ह्यांना पैसे कसा कामवावा आणि राखावा ह्याचा ज्ञान जन्मजात असते.
तर कोणी म्हणते व्यापारी बुद्धीच्या लोकांकडे आपसूकच पैसा जातो.
नोकरदार आयुष्यभर नोकरी करत राहतात. प्रॉव्हिडंट फंड, फिक्स्ड डीपोझिट हीच काय ती त्यांच्या आयुष्याची पुंजी. नाहीतर बँकेच्या खात्यात कायम खडखडाटच दिसेल.
भले भले श्रीमंत सुद्धा खरं तर एक पेक्षा अनेक पैसे कमवायचे मार्ग शोधताना आपल्याला दिसतात.
टाटा, बिर्ला, अंबानीने सुद्धा पेट्रोलियम, कपडे, कम्युनिकेशन, सॉफ्टवेअर सारख्या सगळ्याच क्षेत्रात आपले बाहू पसरले आणि सगळीकडून खोऱ्याने पैसा ओढतायत.
आपल्या बॉलिवूड मधील अभिनेते, अभिनेत्री मंडळी सुद्धा फक्त सिनेमे करणे ह्यावर आपले बँक खाते अवलंबून नाही ठेवले.
निवृत्तीनंतरचे आयुष्य जर सिनेमांशिवाय जगाव लागले तर पैसे कुठून आणायचे म्हणून त्यांनीही आपापले साईड बिझनेस उघडलेत. जेणे करून पैशांचे इन-कमिंग सुरूच राहील.
तुम्ही म्हणाल हे तर कमालीचे श्रीमंत आहेत. ह्यांना काय कमी आहे. उद्योग धंद्यासाठी लागणारे भांडवल ह्यांच्याकडे सहज उपलब्ध असेल. आम्ही नोकरदार आणणार कुठून इतका पैसा धंद्यामध्ये ओतायला..?
रास्त आहे हा प्रश्न… पण काही छोटे मोठे उद्योग आपली नोकरी आणि पैशांचे गणित सांभाळून आपणही करू शकतो. प्रत्येक वेळी बिझनेस मोठाच पाहिजे असे न्हवे. तो हळू हळू मोठा करूच शकतो.
काही सिनेतारकांनी आपापल्या बुडत्या करिअर मधून धडा घेत स्वतःचे दुसरे पैसे कमावण्याचे रस्ते शोधून काढले.
काही अभिनेते बॉलिवूडमध्ये सुप्रसिद्ध असले तरी देखील त्यांची जोडधंदा करण्याची हौस त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे घेऊन आली.
बघुयात ह्या नट नट्यांकडून आपल्याला काही कल्पना सुचते का? त्यांच्या सारखा जोडधंदा कदाचित शक्य नसेल पण आपल्याला काही तरी सुरू करण्यासाठी दिशादर्शक तर नक्कीच ठरेल.
१. शाहरुख खान :
बॉलिवूडचा किंग खान हे बिरुद मिरवणाऱ्याला खरं तर साईड बिझनेस ची काय गरज..? त्याने अनेक सुपरहिट सिनेमे बनवलेत आणि त्यातून अब्जो रुपये कमवलेत की, त्याच्या पुढच्या २ पिढ्या तरी बसून खातील. पण डोक्यातला बिझनेसचा किडा काही जणांना स्वस्थ बसूनच देत नाही.
शाहरुख खान स्वतः रेड चिलीज एंटरटेनमेंट ह्या कंपनीचा मालक आहे.
त्याने कोलकाता नाईट रायडर ही आयपीएल ची क्रिकेट टीम आपली मैत्रीण जुही चावला सोबत भागीदारीमध्ये विकत घेतलीये.
त्याने खूप ठिकाणी गुंतवणुकी करून ठेवल्यात जसे की किडझेनिया नावाच्या फॅमिली एंटरटेनमेंट संस्थेचे शेअर्स विकत घेऊन ठेवलेत.
ह्या सगळ्यातून सुद्धा शाहरुख खूप पैसे कमावतो. त्याच्या सिनेमांसारखेच हे व्यवसाय देखील सुपरहिट ठरले आहेत.
२. शिल्पा शेट्टी :
काही सुपरहिट सिनेमे हिच्या नावावर असले तरी फ्लॉप नट्यांमध्येच गणली जाणारी ही नायिका एक फिमेल बिझनेस टायकून मात्र आहे असे म्हणायला हरकत नाही.
एक तर तिने बड्या उद्योगपतीशी म्हणजे राज कुंद्राशी विवाह केल्यामुळे ती आपसूकच श्रीमंत झालेली आहे.
तशात शाहरुख प्रमाणे हिने आणि हिच्या नवऱ्याने राजस्थान रॉयल्स नावाची आय पी एल क्रिकेट टीम विकत घेतली आहे.
हिचा स्वतःचा परफ्युम चा ब्रँड आहे. अत्यंत कमालीची फिगर असलेली शिल्पा फिटनेस चे मंत्र देखील लोकांना देते त्या साठी तिच्या फिटनेस चे सिक्रेट सांगणाऱ्या सीडीज बाजारात उपलब्ध आहेत.
शिल्पा शेट्टी ‘आयोसिस’ नावाच्या स्पा चेन ची बिझनेस पार्टनर देखील आहे.
३. सुनील शेट्टी :
अभिनयात वैविध्य दाखवू शकला नसला तरी अमिताभ आणि तत्कालीन सुपरहिरोज ना ढिशुमढिशुम शिकवणाऱ्या मास्टर शेट्टींचा मुलगा असलेला सुनील शेट्टी बिझनेस मॅन म्हणून नक्कीच सुप्रसिद्ध आहे.
उडुपी असल्याने उडुपी खाद्यपदार्थांची हॉटेल्स सुनील ने मुंबईत चालू केली आहेत. खाबूगिरी करणाऱ्यांसाठी ती एक पर्वणीच आहे.
खूप खाऊन झाले की वजन कमी करणे ओघाने आलेच त्यात स्वतः फिटनेस क्रेझी असलेल्या सुनील ने जिमची एक चेन सुद्धा उभारली आहे.
पॉपकॉर्न एंटरटेनमेंट नावाचे प्रोडक्शन हाऊस त्याच्या नावे आहे. टीव्ही वरील शोज पण त्याने होस्ट केलेले आहेत. बुटीक आणि रिअल इस्टेट मध्ये देखील सुनीलने नशीब आजमावले आहे.
ह्या सगळ्या जोडधंद्यांमधून सुनील ने सिनेमांपेक्षा जास्ती माया कमावली असणार हे नक्की.
४. सुश्मिता सेन :
एके काळची मिस युनिव्हर्स असलेली ही बंगाली सुंदरी आज २ मुलींची सिंगल मदर आहे. सिनेमात फारसे यश कमवू शकली नसली तरी बिझनेस मध्ये तिने बऱ्यापैकी बस्थान बसवले आहे. तिचे दुबईला दागदागिन्यांचे रिटेल विक्रीचे दुकान आहे.
हॉटेल आणि स्पा ची चेन उघण्याची तिची तयारी चालू आहे. आय एम शी नावाची तिची मिस इंडिया प्रशिक्षण संस्था आहे. जी नुकतीच फेमिना इंडिया नि विकत घेतलीये.
सिनेसृष्टीशी निगडित असल्याने तंत्रा एंटरटेनमेंट नावाची प्रोडक्शन संस्था देखील तिच्या नावे आहे. मधून अधून ती तिचे मॉडेलिंग देखील जपते.
५. जॉन अब्राहम :
मॅचो असूनही चॉकोलेट हिरो म्हणून आलेला जॉन अजूनही बॉलिवूड मध्ये चाचपडतोय. अर्थात पण पैसे कमावण्यामध्ये तो कुठेही मागे नाही.
स्वतःचे प्रोडक्शन हाऊस असल्याने तो वेगवेगळ्या सिनेमांची निर्मिती करतो आणि त्याद्वारे पैसे कमावतो.
फिटनेस फ्रिक आणि खेळाडू वृत्तीचा असल्याने बॉक्सिंग चे प्रशिक्षण देणारी संस्था उघडण्याची त्याची तयारी चालू आहे.
६. ट्विंकल खन्ना :
सुपरस्टार राजेश खन्ना अबी डिंपल कपाडिया ची मुलगी असून चित्रपट क्षेत्रात काहीच न करू शकलेली डिंपल लग्नानंतर एक गृहिणी बनली होती.
तिने आई बरोबर मेणबत्त्या बनवण्याचा बिझनेस चालू केला जो आता देशविदेशात देखील वेगवेगळ्या डिझायनर मेणबत्त्या पुरवण्याच्या स्पर्धेत उंचीवर आहे.
त्यासोबत ट्विंकल ने स्वतःचे इंटेरिअर डिझायनिंग देखील सुरू केले. तेही अत्यंत यशस्वी पणे. ग्रेझिंग गोट नावाची तिची प्रोडक्शन संस्था आहेच.
त्या उप्पर ती एक लेखिका म्हणून जास्ती सुप्रसिद्ध आहे. तिचे आर्टिकल, कॉलम खूप फॉलो केले जातात. तिची पुस्तके बेस्ट सेलर्स आहेत.
७. अर्जुन रामपाल :
अनेक फ्लॉप चित्रपट देऊनही एकेकाळचा सुपरहिट असलेला मॉडेल ऍक्टर अर्जुन रामपाल आपले आयुष्य ऐशोरामात जगतो आहे.
ह्याचे कारण असे की त्याचा दिल्ली मध्ये एक एक विस्तीर्ण जागेत लाऊंज बार आहे. तो लाऊंज अत्यंत देखण्या पद्धतीने बनवला आहे.
अतिश्रीमंत माणसे ह्या लाऊंज मध्ये नेहमीच जात असतात. तसेच अर्जुनची चेझिंग गणेशा नावाची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी देखील आहे. अर्थातच ह्यातून ही तो बक्कळ पैसे कमावतो.
८. सलमान खान :
बॉलिवूडचा हमखास १०० करोड कमावून देणारा भाईजान म्हणजेच सलमान खान.
हा देखील वैयक्तिक व्यवसायपासून दूर राहू शकला नाही. बिईंग ह्यूमन नावाचा त्याचा कपड्याचा ब्रँड सुप्रसिद्ध आहेच.
त्याचबरोबर यात्रा.कॉम ह्या कंपनीमध्येही त्याचे शेअर्स आहेत. त्या बरोबर अनेक जाहिरातीत झळकून त्यांने खंडीभर पैसे कमावलं आहेच.
९. हृतिक रोशन :
HRX नावाचे स्वतःचे ब्रँड नेम वापरून हृतिक ने मिनत्रा नावाच्या इ कॉमर्स कंपनी चे आपले शेअर्स ठेवलेले आहेत.
सिनेमांमध्ये पाहिल्यापासूनच सुपरहिट ठरलेला हृतिक आपल्या बिझनेस द्वारेही चांगले पैसे कमावतो.
–
- अमिताभ बच्चन ते सलमान खान पर्यंत या बॉलीवूड स्टार्ट्सची खरी नावं तुम्हाला माहित आहेत का?
- हे १० डायलॉग्ज तुम्हाला फार आवडले होते – पण हे खरं तर अत्यंत अर्थहीन आहेत!
–
१०. अभिषेक बच्चन :
लिविंग लेजेंड अमिताभ चा मुलगा असल्याने अभिषेक कडून सिनेमात खूप अपेक्षा होत्या पण तो त्या पूर्ण करू शकला नाही. तरीही वडिलांची ए बी सी एल कॉर्प ही संस्था तो बघतो.
त्या व्यतिरिक्त जयपूर पिंक पँथर्स ही कबड्डीची टीम आणि चेन्नईयिन एफ सी नावाची फुटबॉल टीम त्याने विकत घेतलेली आहे. ह्या दोन्ही टीम लीग चॅम्पियन्स आहेत.
११. करिष्मा कपूर :
एक यशस्वी अभिनेत्री असलेली करिश्मा कपूर लग्नानंतर सिनेमात पुन्हा येऊ शकली नाही.
त्यांनतर संजय कपूर बरोबर घटस्फोट घेतल्याने तिला कोणता तरी साईड बिझनेस करणे क्रमप्राप्त झाले. जाहिरातींमध्ये आपले करिअर सुरू करून तिने नुकतीच एक ई-कॉमर्स ची कंपनी विकत घेतली.
१२. मिथुन चक्रवर्ती :
सिनेमे, टीव्ही शोज द्वारे अर्थार्जनाचे रस्ते वापरून मिथुन चक्रवर्ती एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांची स्वतःची रेस्टॉरंट ची चेन आहे. मोनार्क गृप ऑफ हॉटेल्स नावाने ते प्रसिद्ध आहेत.
१३. लारा दत्ता :
एकेकाळची मिस युनिव्हर्स असलेली लारा सिनेसृष्टीत बऱ्यापैकी सिनेमे देऊन गेली. एक मुलाची आई असलेली लारा आता पुन्हा आपले करिअर बिझनेस वुमन म्हणून आकाराला आणत आहे.
तिने स्वतःचा साडी चा ब्रँड सुरू केला आहे.
हे आणि असे अनेक कलाकार मंडळी भरपूर पैसे कमवताना आपल्याला दिसतात. ह्यांच्या इतके मोठाले नाही तरी पण लहान मायक्रो किंवा मिनी लेवल चे उद्योग धंदे आपणही सुरू करू शकतो. ह्या साठी कर्ज ही उपलब्ध असते. तर मग करताय ना सुरुवात..??
–
- पुरुषी वर्चस्व झुगारून देत ‘ती’ बनली बॉलीवूडची पहिली महिला गॅफर !
- बॉलीवूडमध्ये आपल्या अनोख्या अंदाजासाठी गाजलेल्या या खलनायकांची मुलं काय करतात माहिती आहे?
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.