' कोण म्हणतं राजकारणी रोमँटिक नसतात? वाचा राजकारण्यांच्या ८ सदाबहार प्रेमकहाण्या – InMarathi

कोण म्हणतं राजकारणी रोमँटिक नसतात? वाचा राजकारण्यांच्या ८ सदाबहार प्रेमकहाण्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्रेम… किती सुंदर भावना! प्रेम कुणीही कुणावरही करू शकतं. गल्लीतल्या बंड्या आणि पिंकीचे प्रेम असो वा सलीम अनारकलीचे फिल्मी प्रेम असो, आपण अगदी चवीने त्याची चर्चा करतो. सिनेमातल्या नटनट्यांची प्रेमप्रकरणे तर अगदी उत्सुकतेने चघळण्याचा विषय आहे. पण…

एखाद्या राजकारणी व्यक्तीचे प्रेमप्रकरण चव्हाट्यावर आल्यास मात्र आपल्या विचारांची दिशा बदलते.

त्याचंच एक उदाहरण म्हणजे काही दिवसांपूर्वी  कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे  यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचे केलेले आरोप. या आरोपांपेक्षाही वादग्रस्त ठरलं ते मुंडेंचं यावरील स्पष्टीकरण.

#समाजमाध्यमांमध्ये_माझ्या_विरुध्द_होणारे_आरोप #पूर्णपणे_खोटे_बदनामी_आणि_ब्लॅकमेल_करणारे_आहेत

कालपासून समाज…

Posted by Dhananjay Munde on Tuesday, January 12, 2021

अर्थात यातील सत्यता पडताळण्यापेक्षा राजकारण्याची प्रेमप्रकरणं, विवाहबाह्य संबंध हे विषय नेहमीच चविने चघळले जातात,

राजकारणी म्हणजे सदैव भाषणे ठोकणारा वगैरे प्रतिमा आपल्या मनात असते. त्याविरुद्ध हळुवार, तरल प्रेम करणारा ही प्रतिमा सामोरी आल्यास ते स्वीकारायला जरा जडच जातं.

राजकारणी म्हणजे शेवटी माणूसच ना? आणि कुठल्याही माणसाची प्रेम ही मुलभूत भावना असते हे नाकारून चालणार नाही.

चला तर मग जाणून घेऊया भारतात गाजलेली राजकारणी व्यक्तींची काही प्रेमप्रकरणं….

 

१. दिग्विजय सिंग आणि अमृता राय

काँग्रेसचे देशातील प्रमुख नेते दिग्विजय सिंग आणि न्यूज चॅनल अँकर व पत्रकार अमृता राय यांचे प्रेमप्रकरण जेव्हा समोर आले तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला. दोघांच्या वयातील अंतर जास्त असल्याने त्यांच्यावर बरीच टीकाही झाली.

जवळपास पंचवीस वर्षांचा वयातील फरक मात्र दोघांच्या प्रेमावर परिणाम करू शकला नाही. हे प्रकरण दोघांचे एकत्रित फोटो अचानक उघडकीस आले म्हणून प्रकाशझोतात आले. विशेष बाब म्हणजे त्यावेळी अमृता राय विवाहित होती आणि आधीच्या नवऱ्यापासून घटस्फोट मिळण्याची वाट पाहत होती.

 

digvijay_amritarai-inmarathi

 

याबद्दल दिग्विजय सिंग यांनी म्हटले की,

लग्न, प्रेम या राजकारणी व्यक्तींच्या खाजगी बाबी असतात. त्यावर जाहीर चर्चा करू नये. मात्र हे बोलताना स्वतः नरेंद्र मोदींवर लग्नावरून केलेली जहरी टीका ते विसरले हे विशेष!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

२. चांद आणि फिझा

काही वर्षांपूर्वी अफाट गाजलेले हे गुंतागुंतीचे प्रेमप्रकरण. हरियाणाचे डेप्युटी सीएम चंद्रमोहन अचानक गायब झाले. एवढ्या मोठ्या पदावरील व्यक्ती गायब झाल्याने अर्थातच तो मोठ्या चर्चेचा विषय झाला. सगळा देश याबाबत चर्चा करत असताना ते अचानक प्रकट झाले पण, हिंदू चंद्रमोहन नाही तर मुस्लिम चांद नाव धारण करून.

लग्न झालेले असतानाही राज्य अधिवक्ता अनुराधा बाली हिच्यावर त्यांचे प्रेम जडले होते. दुसरे लग्न करण्यासाठी मुस्लिम धर्मातील तरतुदींचा आधार घेऊन त्यांनी निकाह केला आणि चंद्रमोहन-अनुराधा हे ‘चांद-फिझा’ बनले. या घटनेमुळे खळबळ माजली नसती तरच नवल!

 

chand-fiza-inmarathi

 

पण दोघांचे हे नाते अल्पकाळच टिकले. एकमेकांवर केलेल्या आरोप प्रत्यारोपाच्या अनेक फैरीनंतर चंद्रमोहन परत हिंदू धर्मात परतले आणि फिझा सोबत घटस्फोट घेतला.

त्यानंतर दोन वर्षांनी अनुराधा उर्फ फिझा यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी सडलेल्या अवस्थेत सापडला. त्यांची हत्या की आत्महत्या याबाबत अजूनही संभ्रम आहे असे म्हणतात.

 

३. एन टी रामा राव आणि लक्ष्मी पार्वती

प्रेमात पडायला वयाचे बंधन नसते हे वारंवार दिसून येते. आंध्र प्रदेशचे तीन वेळा मुख्यमंत्री पद भूषविलेले एन टी आर (नंदमुरी तारका रामा राव) वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांचे चरित्र लिहिणाऱ्या लक्ष्मी पार्वतीच्या प्रेमात पडले.

ही प्रेमकहाणी सुद्धा जोरदार गाजली आणि तिने आंध्र प्रदेशचे राजकीय वातावरण ढवळून काढले. एनटीआर यांचे जावई चंद्राबाबू नायडू हे आधीच सासऱ्यांच्या  विरोधात निवडणुका लढून मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेले होते.

त्यात या बातमीमुळे त्यांना टीका करण्याची आणखी एक संधी मिळाली. सगळ्यांच्या विरोधाला न जुमानता अखेर दोघांचा विवाह पार पडला. मात्र लक्ष्मी पार्वतीला एनटीआर यांच्या घरी कधीच प्रवेश मिळाला नाही.

 

nt-rama-rao-inmarathi

तिचा सर्वांनीच द्वेष केला. तिने स्वतःची पार्टी स्थापन करून जनतेला भावनिक आवाहन करून निवडणुका लढवल्या पण त्यातही ती अपयशी ठरली.

 

४. नारायण दत्त तिवारी – उज्ज्वला शर्मा

यांची कहाणी फारच रंजक आहे.

नारायण दत्त तिवारी आपल्या रंगील्या स्वभावामुळे उत्तराखंड मध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांचे नाव आतापर्यंत अनेक स्त्रियांशी जोडले गेले आहे. १९६० मध्ये ते उज्ज्वला शर्मा यांच्या निकट संपर्कात आले आणि त्यांना एक मुलगा सुद्धा झाला. पण या मुलाला स्वतःचे नाव देण्यास तिवारींनी नकार दिला.

उज्ज्वला या काँग्रेस नेते शेरसिंग यांच्या सुपुत्री. शेरसिंग यांनी इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद भूषवले होते. अनेक वर्षांच्या कालखंडानंतर २००८ मध्ये एका मुलाने तिवारी हेच माझे वडील असल्याचा दावा ठोकला. हा मुलगा म्हणजे उज्ज्वला यांचा मुलगा रोहित शेखर!

तिवारींनी अर्थातच ते नाकारले. तेव्हा सुप्रीम कोर्टाने डी.एन.ए. तपासणी करण्याचे आदेश दिले. त्या तपासणीत नारायण दत्त तिवारी हेच रोहितचे वडील असल्याचे उघड झाले आणि तिवारींना रोहितला स्वीकारावेच लागले.

 

nd-tiwari-ujjwala-inmarathi

 

५. शशी थरूर आणि सुनंदा पुष्कर

भारतीय सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा झालेली ही राजकारणी प्रेमकहाणी आहे. ही कहाणी तेव्हा उघडकीस आली जेव्हा तत्कालीन केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्यावर उद्योजिका सुनंदा पुष्कर यांना आयपीएलच्या कोची संघाची फ्रांचायजी नियमबाह्य पद्धतीने मिळवून देण्यास मदत केल्याचे आरोप झाले.

शशी थरूर यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला.

नंतर थरूर यांनी सुनंदा पुष्कर यांच्यासोबत लग्न केले. एकमेकांना शोभणारे जोडपे म्हणून यांचा उल्लेख होतो. दोघेही आपल्या प्रेमाचे प्रदर्शन जाहीररीत्या करण्यास कधीही मागे हटले नाहीत. त्यांच्या वागण्यातून प्रेमाची भावना सर्वांनाच दिसून यायची.

 

shashi-tharoor-inmarathi

 

नंतर मात्र दोघांमध्ये काही वादविवाद झाले आणि त्यांचे नाते बिनसले. एके दिवशी दिल्लीमधील एका हॉटेलमध्ये सुनंदा पुष्कर मृतावस्थेत सापडल्या. मृत्यूचे कारण झोपेच्या गोळ्यांचे अतिसेवन असे सांगितले जाते. अश्या तऱ्हेने या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत झाला.

६. इंदिरा आणि फिरोझ

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची लाडकी मुलगी इंदिरा. नेहरू त्यांना आपला मुलगाच मानत असत. अतिशय सुंदर आणि तेवढीच बुद्धिमान असलेल्या इंदिरा यांनी इलाहाबादमध्ये आनंद भवन या निवासस्थानी राहायची. तिथे त्यांची आई कमला नेहरू यांच्या ओळखीने एका तरुणाने प्रवेश केला. त्याचे नाव फिरोझ गांधी!

फिरोझला इंदिरा खूपच आवडली आणि त्याने इंदिरा समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यावेळी इंदिरा फक्त १६ वर्षाची असल्याने तिने त्या प्रस्तावाला नकार दिला. पुढे शिक्षणासाठी इंदिराजी लंडनला गेल्या तर तिथेही मागोमाग फिरोझ पोचले. मात्र लंडन मध्ये फिरोझच्या प्रयत्नाला यश आले.

दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करू लागले आणि लग्न करण्याची इच्छा त्यांनी जवाहरलाल नेहरूंसमोर बोलून दाखवली. जवाहरलाल आणि कमला नेहरू यांचा या विवाहाला तीव्र विरोध होता परंतु मुलीच्या इच्छेपुढे त्यांना शरण जावे लागले.

 

Feroze_Gandhi_and_Indira_Gandhi-inmarathi

 

लग्नानंतर दोघांमध्ये टोकाचे मतभेद झाले आणि इंदिराजींना लग्न केल्याचा पश्चाताप झाला. त्यांनी आपले बाकी जीवन राजकारणासाठी समर्पित करून टाकले.

हे ही वाचा – भारतातील हे प्रसिद्ध चेहरे अविवाहित का आहेत? जाणून घ्या यामागची कारणे..

७. राजीव गांधी आणि सोनिया मायनो

इंदिराजींचे द्वितीय सुपुत्र आणि भारताचे माजी पंतप्रधान राजीव  गांधी यांचे केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण सुरू होते. त्यावेळी तिथेच शिकणाऱ्या आणि वेट्रेस म्हणून काम करणाऱ्या इटालियन मुलीसोबत त्यांची भेट झाली. त्या मुलीचे नाव सोनिया मायनो.

सोनिया यांच्या सुंदरतेमुळे आणि प्रभावी व्यक्तित्वामुळे राजीव गांधी त्यांच्या प्रेमात पडले. स्वतः राजीवजी देखण्या आणि रुबाबदार व्यक्तिमत्वाचे धनी असल्याने सोनिया मायनो यांना आवडले. दोघांची प्रेमकहाणी तीन वर्षे रंगली आणि अखेर इंदिरा गांधींची परवानगी घेऊन दोघे विवाहबद्ध झाले.

 

rajiv-sonia-inmarathi

 

राजीवजींच्या दुर्दैवी मृत्यूमुळे न खचता सोनिया गांधी काँग्रेसची धुरा समर्थपणे चालवत असल्याचे आपण बघतोच आहोत.

८. सचिन पायलट आणि सारा अब्दुल्ला

एखाद्या सिनेमात शोभावी अशी ही प्रेमकहाणी! हिंदू सचिन आणि मुस्लिम सारा यांच्या कहाणीत मसाला ठासून भरला आहे. दोघांचे घराणे भारतातील प्रतिष्ठित राजकीय घराणे म्हणून ओळखले जाते.

काँग्रेसचे बडे नेते राजेश पायलट यांचे सुपुत्र असणारे सचिन परदेशात शिकत असताना त्यांची ओळख जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सारा सोबत झाली. दोघांमध्ये प्रेमाचा बंध तयार झाला.

 

sachin-pilot-sara-abdullah-inmarathi

परंतु या प्रेमकहाणीत अनंत अडचणी होत्या. सारा यांचे मुख्यमंत्री बंधू उमर व वडील फारुख यांचा या नात्याला तीव्र आक्षेप होता. हिंदू जावई त्यांना मुळीच पसंत नव्हता. नोंद घ्यावी अशी गोष्ट ही की, स्वतः फारुख यांनी ख्रिश्चन महिलेशी विवाह केलाय आणि उमर यांनी हिंदू महिलेला पत्नी बनवले आहे. असो!

तर या विरोधाला न जुमानता सचिन साराने साध्या समारंभात विवाहगाठ बांधली. नंतर सचिन पायलट जेव्हा निवडणुका जिंकून राजकारणात लोकप्रिय झाले तेव्हा मात्र अब्दुल्ला परिवाराचा विरोध मावळला आणि त्यांनी सचिन पायलट यांचा जावई म्हणून स्वीकार केला.

तर कश्या वाटल्या या कहाण्या? जरूर कळवा…

हे ही वाचा – मृत्यू पावलेली पत्नी अजूनही पाठवतीये पत्र : अद्वितीय प्रेमाची सत्य कथा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?