' पत्नी-पीडितांचं असं ही “कर्मकांड” – गंगेत डुबकी मारून जिवंत बायकांचं श्राद्ध! – InMarathi

पत्नी-पीडितांचं असं ही “कर्मकांड” – गंगेत डुबकी मारून जिवंत बायकांचं श्राद्ध!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

नवरा बायकोच नातं म्हणजे अगदी उतार चढाव असलेलं. दोन व्यक्ती आयुष्य भर सोबत राहतात. एकमेकांच्या आवडी निवडी जपतात. नवं प्रेम निर्माण करतात. पण बऱ्याचदा या नात्यात ह्या ना त्या कारणाने वाद होत असतात.

कधी कधी दोघांपैकी एकाच प्रभुत्व मान्य होत नसतं त्यामुळे विरोधात बंड पुकारलं जातं. बऱ्याचदा हे बंड नवऱ्याचा विरोधात बायका अधिक प्रमाणात पुकारत असतात.

हे बंड पुकारण्यासाठी स्त्रीला ताकद देतं फेमिनिझम अर्थात स्त्रीवाद, पुरुषांच्या सततच्या “मालकी” प्रवृत्तीमुळे स्त्रिया दुखावतात आणि प्रस्थापिताविरोधात बंड पुकारण्याची मानसिकता त्यांच्यात निर्माण होऊ लागते.

मग त्यातून कधी कधी नवऱ्याला सोडून जाण्याच पाऊल उचलतात आणि स्वतःचं इंडिपेंडंट आयुष्य स्वीकारतात, कसलाच विचार करत नाही. यामुळे अगदी क्षुल्लक कारणावरून कुटुंबाचे विभाजन होते.

हे सर्व आता सांगायच कारण एकच आहे की गंगेच्या किनाऱ्यावर जवळ जवळ १५० पुरुष एकत्र येणार आहेत, गंगेत स्नान करून पवित्र होण्यासाठी नाहीतर श्राद्ध घालण्यासाठी, आता तुम्ही म्हणाल गंगेच्या किनाऱ्यावर श्राद्ध घालण्याचा आणि फेमिनिझमचा काय संबंध? श्राद्ध तर गंगा किनारी नेहमीच होत असतं, त्यात काय नवीन? तर तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 

shradha-inmarathi

 

तर ही जी १५० पुरुष मंडळी तिथे जाऊन श्राद्ध घालणार आहेत, ते Save Indian family foundation या संघटनेचे सदस्य आहेत आणि ते त्यांचा पत्नीचं श्राद्ध घालणार आहेत.

आता तुमच्या मनात प्रश्न येत असणारच की मेलेल्या पत्नीचं श्राद्ध घालण्यात काय चुकीचं आहे? पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, त्यांच्या बायका जिवंत आहेत तर! धक्का बसला ना?

तर चला ते असं का करत आहेत ते समजून घेऊ..

या संघटनेचे सदस्य फक्त तेच पुरुष आहेत ज्यांना त्यांचा बायकोने छळले आहे. त्यांचा विरुद्ध “फेमिनिझम”चे अस्त्र शस्त्र वापरून त्यांना घायाळ केलं आहे.

हे फेमिनिझम इतकं विखरी आहे की, त्यामुळे या लोकांचा आयुष्याची राख रांगोळी झाली आहे. यांचा बायकांनी त्यांना सोडलं असून ते आता एकटं जीवन जगत आहेत. ते पण एकदम “कष्टमय” प्रकारचं जीवन जगताय.

या लोकांच्या अनुमानानुसार फेमिनिझम हे भारतीय कुटुंब व्यवस्थेच्या ऱ्हासाला कारणीभूत आहे. ह्या संघटनेचा प्रमुख असलेला वखारीया नावाचा व्यक्तीने म्हटले आहे की, भारतीय कायदे पुरुषविरोधी आहेत.

भारतात प्राणी कल्याण मंत्रालय आहे पण पुरुष कल्याण मंत्रालय नाही, म्हणजे सरकार पुरुषांना प्राण्यांपेक्षा हीन समजते!!!

 

shradha-inmarathi02

 

वखारिया मात्र श्राद्ध घालण्याचा इव्हेंटला उपस्थित नव्हता. त्याच संघटनेचा दुसरा माणूस अमित देशपांडे जो पुरुषांच्या हक्कांसाठी लढतो त्याच नुसार, ही कल्पना त्याची आहे, सर्व पीडित नवऱ्यांंना एकत्र करून त्यांचा वैवाहिक संबंधांना हिंदू रीती रिवाजाप्रमाणे तिलांजली देण्याचा कार्यक्रम त्यांंनी योजला आहे.

त्याचाच हा एक भाग आहे. त्याचनुसार वर्षानुवर्षे स्त्रीच्या ब्लॅकमेलिंग आणि अत्याचाराला कंटाळलेल्या पीडित पुरुष वर्गाला यामुळे एक मनःशांती भेटेल. आश्चर्यकारक बाब ही आहे की, देशपांडे स्वतः मात्र कुटुंब वत्सल व्यक्ती आहे.

पीडित व्यक्तींनी घातलेलं हे श्राद्ध त्यांचा पत्नीसाठी आहे. ज्या त्यांना एकतर सोडून गेल्या आहेत, अथवा त्यांना बरोबर वागवत नाही आणि अत्याचार करत आहेत. एवढंच नाही तर बायकोच्या त्रासाला कंटाळून या पुरुषांनी हडळ मुक्ती पूजा पण केली आहे!!

देशपांडेंच्या मतानुसार त्या पूजेचा त्या पुरुषांवर सकारात्मक परिणाम झाला होता. मागील अनेक वर्षांपासून ही संघटना पुरुष हक्कांसाठी लढत आहे. त्यांच सदस्यांच्या मतानुसार भारतात पुरुष म्हणून जन्माला येणं हे पाप झालं आहे.

ह्या संघटनेचे संस्थापक वखारिया यांनी दिलेल्या माहिती नुसार भारतात दरवर्षी ९२००० हजार पुरुष वैवाहिक संबंधातील तणावामुळे येणाऱ्या मानसिक दडपणाखाली आत्महत्या करतात. याउलट स्त्रियांची संख्या ही २४००० इतकी आहे.

वखारिया सुद्धा अश्याच एका पिडेने ग्रासले होते. जेव्हा कुठलाही गुन्हा न करता देखील त्यांचा वर सेक्शन ४९८या अंतर्गत त्यांचावर गुन्हा घटस्फोटित बायकोने दाखल केला होता, त्यामुळे ५ दिवसांचा तुरुंगवास त्यांना भोगावा लागला होता.

त्यामुळे २००५ साली त्यांनी अनिल कुमार आणि पांडुरंग कट्टी या व्यक्तींना सोबत घेऊन या संघटनेची स्थापना केली.

 

shradha-inmarathi03

 

ह्या संघटनेतर्गत त्यांनी पाच वर्षात सर्व पुरुषविरोधी कायद्याच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. मागील १३ वर्षात या संघटनेने भारत भर काम पसरवले असून ह्या संघटनेचे २०० सेंटर आणि ४००० स्वयंसेवी कार्यकर्ते आहेत!

ह्या संघटनेकडून कानपुरमध्ये पिशाचीन मुक्ती यज्ञ देखील घेण्यात आला होता. यामुळे स्त्रीच्या काळ्या सावली पासून त्यांचा जीवाचं रक्षण होतं अशी त्यांची भावना आहे.

आमचा समूह हा पुरुषांचा मनातील भिती घालवून, त्यांना पाठबळ देत , सावरण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यांना लढण्यासाठी मदत करतो.

श्राद्ध घालण्याचा विचार ज्या सुपीक मेंदूतून आला ते अमित देशपांडे म्हणतात की आम्ही अश्याप्रकारचे अनेक कार्यक्रम आम्ही घेत असतो.

शूर्पणखेच्या प्रतिकृतीच नाक कापणे, हा देखील कार्यक्रम आम्ही घेतला आहे, पुरुषांच्या हक्कांसाठी सदैव आम्ही लढत राहू , पुरुषांवरील अन्यायाला वाचा फोडत राहू!

आधी भारतात पुरुषसत्ताक मानसिकता होती, त्यामुळे फेमिनिझम जन्मलं पण ते फेमिनिझम इतकं विकृत झालं की, जे शिकारी होते ते शिकार झाले, आज पुरुषांना अनेक खोट्या गुन्ह्याखाली आत टाकलं जात आहे. त्यामुळेच ह्या विखारी फेमिनिझमचा प्रतिकार म्हणून आम्ही ही संघटना सुरू केली आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजेच. अशी भावना अमित देशपांडेंनी बोलून दाखवली आहे.

आता हे बघणं रोचक ठरेल की स्त्रीवादी संघटना याचा कसा प्रतिकार करतात व काय प्रतिक्रिया देतात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?