मोदींच्या “नाल्यावरील गॅस”वर विनोद करून झाले? भेटा शाम शिर्केंना, ज्यांचं उदाहरण मोदींनी दिलं होतं
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
नरेंद्र मोदी हे असे पंतप्रधान आहेत जे सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही पद्धतीने नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी कोणत्याही साध्या गोष्टीचा जरी उल्लेख केला तरी त्यावर चर्चांना उधाण येतो. सोशल मीडियावर तर नरेंद्र मोदी सतत ट्रोल होत राहतात. प्रत्येक दिवशी सोशल मीडिया नरेंद्र मोदींविषयी पोस्ट असतेच असते.
जणू काही मोदी नसते तर सोशल मीडिया ओसाड पडलं असतं. मीडियाची ही कृपा किंवा अवकृपा ते गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून आहे. मोदींचे वैशिष्ट्यच असे आहे की ते नेहमीच चर्चेत असतात.
मागे त्यांनी असे विधान केले होते की
“विदेशी बॅंकांमध्ये इतके पैसे आहेत की प्रत्येक भरतीयांच्या बॅंक अकाऊंटमध्ये १५ लाख रुपये जमा होतील”.
यावरुन मोदी आजही ट्रोल होत आहेत. आमच्या बॅंकेत १५ लाख कधी देणार असं म्हणत मोदींना फेकू म्हटलं जात आहे. तर मोदी समर्थक, “जोपर्यंत प्रत्येकाच्या बॅंकेत १५ लाख येत नाहीत तोपर्यंत आम्ही मोदींना खुर्चीवरुन हलू देणार नाही.” असे म्हणतात. दोन्हीकडून मोदींची नुसती चर्चा होत असते.
एका हॉस्पिटलच्या उद्घाटना प्रसंगी नरेंद्र मोदींनी भाषण केले होते. तेव्हाही त्यांना प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. मोदी म्हणाले की
“महाभारतात, कर्णाचा जन्म आईच्या उदरातून झाला नव्हता. याचाच अर्थ त्यावेळेस जेनेटिक सायंस अस्तित्वात होते. आपण गणपतीची पूजा करतो. कुणी तरी प्लास्टिक सर्जन त्या काळी असेल, ज्याने माणसाच्या धडावर हत्तीचे डोके बसवले असेल.”
या वक्तव्यावरुन मोदींवर टिकाची प्रचंड झोड उठवण्यात आली. अनेक वैज्ञानिक त्यांच्यावर नाराज झाले. तर काही वैज्ञानिकांनी भारतीय प्राचीन विज्ञानविद्येचे दाखले द्यायला सुरुवात केली. कृषीशास्त्रज्ञ आणि जीन-संबंधित तंत्रज्ञानाचे जाणकार देवेंद्र शर्मा यांनी सांगितले की
“पंतप्रधानांच्या या विधानाने भारतीय वैज्ञानिक नाराज का होतात? उलट त्यांचा आत्मविश्वास वाढायला हवा.”
देवेंद्र शर्मा पुढे म्हणाले की “कौरव हे शंभर बंधू होते. कुणीही सांगू शकेल की एक स्त्री शंभर अपत्यांना जन्म देऊ शकत नाही. असे लिहिले आहे की गांधारीने एका मातीच्या घडामध्ये विशिष्ट पदार्थ शिंपडले आणि कौरवांचा जन्म झाला. याचा अर्थ ते सर्व क्लोन होते. हे तर आनुवंशिक विज्ञानाचे उदाहरण आहे.”
दुसरीकडे ऑल इंडिया फॉरम ऑफ राईट टू इज्युकेटचे सह-संस्थापक प्रोफेसर मधू प्रसाद यांनी पंतप्रधानांच्या उल्लेखाला संविधानाच्या परिच्छेद ५१ए चे उल्लंघन असल्याचे सांगितले.
अशा प्रकारे नरेंद्र मोदी सतत चांगल्या किंवा वाईट अर्थाने सतत चर्चेत असतात.
१० ऑगस्टला जागतिक जैव ईंधन दिवशी नरेंद्र मोदींनी शिर्के नावाच्या एका माणासाचा उल्लेख करुन सांगितले की त्यांनी नाळ्यातून निघणार्या गॅसपासून चहा बनवला होता. यावरुन सर्वच स्तरातून नरेंद्र मोदींना अक्षरशः झोडपले गेले. त्यांची खिल्ली उडवण्यात आली.
त्यांनी “फेकू” हा शब्द सार्थकी लावला आहे असंही म्हटलं गेलं. Scientists have discovered a new gas – mitrogen अशा प्रकारचं स्टेटमेंट देऊन मोदींचा फोटो असलेलं ट्विट करण्यात आलं.
नरेंद्र मोदी जनतेचा उल्लेख करुन भाईयों और बहनो असं तर म्हणतातच, त्याच बरोबर “मित्रो” असंही म्हणतात. या मित्रोवरुनही अनेक विनोद सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हाच संदर्भ घेऊन “मित्रोजेन” गॅस अशी खिल्ली उडवण्यात आली.
मोदींच्या अच्छे दिन या निवडणूकीतल्या प्रचारवाक्याला अनुसरुन,
“हम नाली से गॅस बनाने वाले है… अच्छे दिन आले वाले है”
अशी कोटी करण्यात आली. इतकंच काय तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केलं की “इसीलिए कहते है कि देश का प्रधान पंत्री पढ़ा लिखा ही होना चाहिए”. इतक्या मोठ्या प्रमाणात आणि खालच्या थराला जाऊन मोदींवर टिका करण्यात आलेली आहे.
आता आपण नरेंद्र मोदींच्या वक्यव्यामागचं सत्य जाणून घेऊ. नरेंद्र मोदींनी इतक्या मोठ्या पदावरुन खोटे बोलले का? ज्या व्यक्ती मोदींनी उल्लेख केला तो खरोखरच अस्तित्वात आहे का?
मग कुठे राहतात हे शिर्के? नक्की काय करतात? आणि त्यांनी नेमके काय केले आहे. चला तर जाणून घेऊ.
नरेंद्र मोदींवर वरील विधानामुळे टिकेची झोड उठवली गेली होती. पण नरेंद्र मोदींनी ज्या व्यक्तीचा उल्लेख केला ती व्यक्ती आता स्वतःहून समोर आली आहे. रायपूरच्या चंगोरामाठा भागात राहणारे श्याम राव शिर्के यांचा उल्लेख मोदींनी केला होता, हे आता समोर आलं आहे.
शिर्के ६० वर्षांचे गृहस्थ आहेत. शिर्केंनी एक देशी पद्धतीचे विशिष्ट मशीन बनवले आहे. या मशीनमध्ये प्लास्टिकचे तीन ड्रम किंवा कंटेनर जोडून व एक वॉल्च लावला आहे. हे तीन कंटेनर नदी, नाळे आणि गटारांमध्ये वर अशा जागेवर ठेवले जाते, जिथून दुर्गंधित पाणी वाहत असते. पाण्यात घाणीचा जाळ साचू नये म्हणून खाली एक जाळी लावण्यात येते.
ही मशीन विशिष्ट पद्धतीने काम करते. ही मशीन असा पद्धतीने फिट केली जाते, ड्रम किंवा कंटेनरमध्ये जमा झालेला गॅसचा इतका दाब निर्माण होईल, ज्यामुळे हा गॅस पाईपलाईनच्या माध्यमातून ज्या ठिकाणी जेवण बनवण्याचा स्टो आहे त्या ठिकाणी पोहोचेल.
शिर्के यांच्या मते कंटेनरमध्ये जमा होणार्या गॅसचे प्रमाण नदी, नाळ्याची लांबी, रुंदी आणि खोलीवर अवलंबून असते.
त्यांच्या सांगण्यावरुन असे समजले आहे की ज्या घरात त्यांनी हे उपकरण लावले आहे त्या घरात तीन चार महिन्यांपर्यंत बारा माणसापेंक्षा अधिक लोकांसाठी सकाळचा नाश्ता, दुपारचं आणि रात्रीचं जेवण बनवण्यात येतं.
शिर्केंनी सांगितले की
“मी नाल्याचे पाणी आणि पाण्याचे बुडबुडे एकत्र करण्यासाठी मिनी कलेक्टर बनवले आहे. गॅस होल्दर बनवण्यासाठी मी ड्रमचा वापर केला. परीक्षण करताना प्रणाली कार्यात्मक होती. मी हे उपकरण गॅस स्टोला जोडले आणि चहा बनवला.”
ते पुढे सांगतात,
“छत्तीसगड विज्ञान आणि तंत्रज्ञानाने (छत्तीसगढ़ विज्ञान आणि प्रौद्योगिकी) यास पुढच्या टप्प्यात घेऊन जाण्यासाठी मला पैसे दिले आहेत. मी हे उपकरण बनवून एका नाळ्यात स्थापित केले आणि प्रयोग यसस्वी झाला आहे.”
–
“वैज्ञानिकांनी मला सांगितले की माझे दस्तऐवज पुढे पाठवण्यात आले आहे. या घटनेला दोन वर्ष झाले. मी तर विसरुनच गेलो होतो. मला आता कळले की नरेंद्र मोदींनी माझ्या अविष्काराचा उल्लेख त्यांच्या भाषणात केला आहे.”
शिर्के म्हणाले की त्यांना यासाठी कुणीही आर्थिक मदत केली नाही. नगरपालिकेने त्यांचे उपकरण बेकार आहे असे म्हणत फेकून दिले. विज्ञान आणि प्रौद्योगिकीने मला एफआयआर दाखल करण्यास सांगितले. पण निराश झालो होतो म्हणून मी काहीच केले नाही. त्यांनी अशी माहिती दिली की नाळे मिथेन वायू आणि प्रदुषण उत्सर्जित करीत आहे.
यामुळे अशा प्रकारचे अजून काही इंधन बनवता येईल. यामध्ये राष्ट्राचे केवढे तरी मोठे हित लपलेले आहे.
तर हे आहे नरेंद्र मोदींच्या वक्तव्यामागचं सत्य. हे सत्य जाणून न घेता सर्वांनी यावर टिका केली. अगदी राहूल गांधी यांनी पंतप्रधानांच्या वक्यव्याची खिल्ली उडवली. परंतु तुम्हाला यामगचे सत्य कळले आहे. हा लेख अधिकाधिक शेअर करायला विसरु नका.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.