सिकंदर म्हणजे जगज्जेता! पण, या ९ गोष्टी त्याच्याबद्दल वेगळंच काहीतरी सांगतात! वाचा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सिकंदरचा जन्म इसवीसन पूर्व ३५६ मध्ये ग्रीकच्या मकदूनिया येथे झाला होता. त्याचा पिता फिलीप हा मकदूनियाचा राजा होता आणि त्याच्या अनेक राण्या होत्या. सिकंदर हा इतिहासातील त्या राजांपैकी एक होता ज्याने ह्या संपूर्ण जगावर वर्चस्व गाजविण्याचं स्वप्न बघितलं होतं.
हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने ग्रीस ते मिस्र, सिरिया, बैक्ट्रिया, इराण, अफगाणिस्तान आणि सध्याचा पाकिस्तान जिंकला होता. एवढी राज्य जिंकत तो व्यास नदी पर्यंत येऊन पोहोचला.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
–
इतिहासात सांगितल्यानुसार सिकंदरची सेना ही लागोपाठ युद्ध करून थकली होती म्हणून ते परतले. पण ह्यामागील कारण थोडं वेगळं आहे. व्यास नदीच्या पलीकडील हिंदू गणराज्य आणि जनपद ह्यांनी सिकंदराला पुढे येऊ दिले नाही.
त्यामुळे त्याला आणि त्याच्या सेनेला नाईलाजाने परत जावं लागलं. सिकंदराच्या ह्या प्रवासात त्याचे इतिहासकार त्याच्या सोबत राहायचे जे त्याच्या यशाला चढवून लिहायचे आणि त्याच्या अत्याचारांना आणि अयशस्वी युद्धांना लपवायचे.
आज आपण ह्या विश्वविजेता म्हणवून घेणाऱ्या सिकंदरबाबत त्याच्या अशाच काही, कुणालाही माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत.
१. सिकंदर हा आपल्या भावांना मारून राजा बनला होता :
इसवीसन पूर्व ३३६ मध्ये जेव्हा सिकंदर १९-२० वर्षांचा होता तेव्हा त्याने त्याच्या पित्याची हत्या केली.
असं सांगितलं जातं की, सिकंदरची आई ओलम्पियाने फिलीपला विष दिलं होतं. त्यानंतर राजगादीवर आपलं अधिराज्य गाजविण्यासाठी त्याने आपल्या सर्व सावत्र आणि चुलत भावंडांची देखील हत्या केली. आणि त्यानंतर तो मकदूनियाचा राजा बनला.
२. सिकंदरला अरस्तूने जग जिंकण्याचं स्वप्न दाखविलं :
हे ही वाचा –
===
सिकंदरचा गुरु अरस्तू जो एक प्रसिद्ध आणि महान दार्शनिक होता. आज जगात जिथे कुठे दर्शनशास्त्र, गणित, विज्ञान आणि मनोविज्ञान शिकविले जाते त्यात कुठे ना कुठे अरस्तूच्या विचारांचा वैज्ञानिक अनुभवांचा उल्लेख नक्की असतो.
सिकंदराला देखील ह्याच अरस्तूने शिकवलं. सिकंदराच्या मनात जग जिंकण्याचा विचार देखील अरस्तू ह्यानेच टाकला होता. तर अरस्तूचा भाचा कलास्थनीज हा सिकांदराचा सेनापती होता.
३. अश्या प्रकारे झाली विजयी अभियानांची सुरवात :
सिकंदराने मकदूनियाच्या आजूबाजूचे प्रदेश जिंकून ह्या विजयी अभियानाला सुरवात केली.
त्यानंतर तो आशिया मायनरकडे वळला. तुर्कीनंतर एक-दोन छोटी राज्य सोडली तर विशाल फारसी साम्राज्य होतं. फारसी राज्य हे मिस्त्र, इराण ते पश्चिमोत्तर भारतापर्यंत पसरलेलं होतं. फारसी साम्राज्य हे सिकंदराच्या साम्राज्याच्या ४० पट मोठं होतं.
फारसी साम्राज्याचा राजा शह दारा होता ज्याला तीन युद्धात पराजित करत सिकंदराने ह्या साम्राज्यावर अधिराज्य गाजवलं. पण शाहने सिकंदरशी संधी करत आपल्या एका पुत्रीचा रुखसानाचा विवाह त्याच्याशी केला.
फारसी साम्राज्य जिंकायला सिकंदराला १० वर्ष लागली. ह्यानंतर त्याने एक मोठा जुलूस काढला आणि स्वतःला तो विश्व विजेता म्हणवू लागला.
कारण हे साम्राज्य जिकल्यानंतर तो त्याच्या माहितीच्या ६० % जमीन जिंकला होता. भारतापर्यंत पोहोचताना त्याला काही आणखी लहान राज्यांशी युद्ध करावं लागलं आणि तो ती युद्ध सुद्धा जिंकला.
४. सिंकदरचं युद्ध कौशल्य :
सिकंदर हा खरंच एक महान राजा होता. त्यामुळेच त्याची छोटीशी सेना मोठमोठ्या राज्यांना काबीज करण्यात यशस्वी होत होती.
त्याची युद्धनीती आजही युरोपातील पुस्तकांत शिकवली जाते. सिकंदरची युद्ध करण्याची पद्धत इतर राजांपेक्षा वेगळी होती. तो त्याच्या युद्धनीतीत दगड, आगीचे गोळे इत्यादींचा वापर करायचा. जर कधी त्याला त्याची सेना कमी पडतेय असं वाटलं, तर तो स्वतः पुढाकार घेऊन लढायचा.
५. सिकंदरचा भारतावर पहिला हल्ला :
इसवीसन पूर्व ३२६ मध्ये सिकंदराने भारतावर पहिल्यांदा हल्ला चढवला. त्यावेळी भारत हा लहान-लहान राज्य आणि गणराज्यामध्ये विभागलेला होता. राज्यांचं अधिपत्य राजाकडे असायचं तर गणराज्याचं नियंत्रण गटप्रमुख करायचे, जे प्रजेच्या इच्छेनुसार निर्णय घ्यायचे.
भारतात सिकंदराचा पहिला सामना हा तक्षशीला राज्याचा राजकुमार अंभी ह्याच्याशी झाला पण अम्भीने शरणागती पत्करत सिकंदरची साथ दिली.
सिकंदरला अंभीने भेट दिलेल्या वस्तू बघून तो आश्चर्यचकित झाला. त्याला वाटलं की जर भारताच्या एका छोट्याश्या राज्याजवळ एवढी संपत्ती आहे तर संपूर्ण भारतात किती असेल?
भारतातील धन-संपदाबघून त्याच्या मनात आता भारतावर अधिराज्य गाजविण्याची इच्छा निर्माण झाली.
तक्षशीला विश्विद्यालयातील आचार्य चाणक्य ह्यांना भारतावर कुठल्या परदेशी राजाचं आक्रमण पटलं नाही.
त्यामुळे त्यांनी भारताच्या संस्कृतीला वाचविण्यासाठी सर्व राजांना एकत्र येऊन त्याच्या विरोधात लढण्यासाठी विनंती केली. पण आपसातल्या क्लेशामुळे कुणीही एकत्र आलं नाही.
त्यानंतर चाणक्य ह्यांनी भारतातील सर्वात महान आणि शक्तिशाली राज्य “मगधचा राजा धाननंद”ला देखील विनंती केली. पण त्यांनी चाणक्य ह्यांना अपमानित केलं.
त्यानंतर चाणक्य ह्यांनी गटप्रमुखांना एकत्र येण्याचं आवाहन केलं, ज्यात त्यांना यश आलं. ह्या गटप्रमुखांनी सिकंदर परतत असताना त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं.
हे ही वाचा –
===
६. सिकंदर आणि पोरसचं युद्ध :
झेलम नदीच्या तीरावर सिकंदर आणि पोरस ह्यांच्यामध्ये झालेलं युद्ध हे सिकंदराच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचं युद्ध होतं. ह्या युद्धाला ‘पित्सताचं युद्ध’ किंवा ‘हायडेस्पेसचं युद्ध’ म्हणून ओळखलं जातं. महाराज पोरस सिंध-पंजाब सोबतच एका मोठ्या भागाचे राजा होते. ते त्यांच्या शौर्यासाठी खूप प्रसिद्ध होते.
सिकंदरच्या सेनेला झेलम नदी पार करत पोरसशी लढायचं होतं. पावसामुळे झेलम नदीला पूर आलेला होता, तरी देखील रात्रीच्या वेळी सिकंदरची सेना नदी ओलांडून दुसऱ्या बाजूला पोहोचली. नदीच्या त्या बाजूला राजा पोरस आपल्या ३००० पायदळ सैनिक, ४००० घोडेस्वार, ३०० रथ आणि २०० हत्तींची सेना घेऊन तयार होता.
त्यानंतर सिकंदरने पोरससाठी एक संदेश पाठवला ज्यात पोरसने माघार घ्यावी असं सांगितलं गेलं होतं. पण पोरसने ते मान्य केलं नाही. त्यानंतर ह्या दोन्ही सेनांमध्ये युद्ध सुरु झालं.
ह्यावेळी मात्र पोरसची सेना सिकंदरच्या सेनेवर भारी पडली, युद्धाच्या पहिल्याच दिवशी सिकंदरच्या सेनेने पोरसच्या सेनेची शक्ती बघितली आणि ते घाबरले.
सिकंदरालादेखील हे कळून चुकलं होतं, की पोरसच्या सेनेसमोर तो टिकू शकणार नाही. त्यानंतर त्यानं पोरसकडे युद्ध थांबविण्याचा संदेश पाठविला जो पोरसने मान्य देखील केला. त्यानंतर ह्या दोन्ही महान राजांमध्ये तह झाला की, पुढील सर्व युद्धात पोरस सिकंदराची मदत करेल आणि जिंकलेल्या राज्यांवर पोरस शासन करेल.
७. सिकंदराला त्याच्या सैनिकांमुळे परतावं लागलं :
पोरस सोबतच्या युद्धानंतर सिकंदरची सेना लहान गणराज्यावर स्वार झाली. पण ह्यावेळी कठ गन्राज्यासोबत झालेल्या युद्धात यवनींना अनेक समस्यांचा सामना करावा लागला पण कठ सेना कमी असल्याने अखेर त्यांना पराजय पत्करावा लागला. त्यानंतर सिकंदरची सेना व्यास नदीजवळ पोहोचली.
व्यास नदीच्या पलीकडे नंदवंशी राजा होता ज्याच्याजवळ २० हजार घोडेस्वार, २ लाख पायदळ, २ हजार चार घोड्यांचे रथ, आणि जवळपास ६ हजार हत्ती असलेली विशाल सेना होती. हे एकूणच सिकंदरची सेना घाबरली.
सिकंदराला भारतावर विजय मिळवायचा होता पण त्याच्या सैनिकांमुळे त्याला परतावं लागलं.
पण परत जाताना त्याला मालाव आणि क्षुद्रक राज्याच्या विधाला बळी पडाव लागलं. जाताना ह्या लहान क्षेत्रांवर विजय मिळविण्याचा सिकंदराचा विचार होता पण तो काही पूर्ण झाला नाही. ह्या लहान गणराज्यांना एकत्र आणण्यात आचार्य चाणक्य ह्यांचा खूप मोठा हात होता.
८. सिकंदर क्रूर आणि अत्याचारी होता :
आपल्या अभ्यासातील इतिहासाच्या पुस्तकात सिकंदराला एक महान योद्धा म्हटलं गेलं आहे. तसेच इतिहासात असं देखील लिहिलेलं आहे की, पोरसला त्याने युद्धात पराजित केलं, पण त्याचं शौर्य बघून त्याचं राज्य त्याला परत दिलं.
पण इतिहासकारांच्या मते सिकंदर हा एक अतिशय क्रूर व्यक्ती होता. त्याने कधीही दया दाखविली नाही. तो त्याच्या सहयोगींना देखील अतिशय क्रूरपणे मारत असे.
त्याने त्याचा सर्वात जवळचा मित्र क्लीटोसला देखील मारून टाकलं होतं. त्याने त्याचा सेनापती कलास्थनीज ह्याला मारताना देखील विचार केला नाही.
ह्याबाबत प्रसिद्ध इतिहासकार एर्रीयर लिहितात की, जेव्हा बैक्ट्रियाचा राजा बसूसला बंदी बनविण्यात आलं, तेव्हा सिकंदरने आधी त्यांच्यावर चाबुकाने वार केले त्यानंतर त्यांचे नाक कापून त्यांची हत्या केली.
९. सिकंदराचा मृत्यू :
आपलं विश्व विजयाचं स्वप्न तुटताना बघून सिकंदर खचून गेला. त्याने मद्यपान करण्यास सुरवात केली. सिकंदर भारतात १९ महिने राहिला. त्यानंतर तो इसवीसन पूर्व ३२३ मध्ये इराणला पोहोचला. तिथेच वयाच्या ३३ व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचं कारण मलेरिया सांगण्यात आलं.
तर हा “महान” समजला जाणारा सिकंदर इतिहासात महान आहे. वास्तविक तो एक अतिशय क्रूर होता. जरी तो एक चांगला योद्धा असला तरी देखील तो कधीही विश्व विजेता बनू शकला नाही, हेच सत्य आहे.
हे ही वाचा –
===
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.