' काम न करणारा रिमोट दोन-तीनदा आपटल्यानंतर पुन्हा चालू, यामागे काय विज्ञान आहे? – InMarathi

काम न करणारा रिमोट दोन-तीनदा आपटल्यानंतर पुन्हा चालू, यामागे काय विज्ञान आहे?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

टेलिव्हिजन सेट्स आता अगदी सर्रास घराघरात दिसून येतात, अगदी झोपडीत राहणाऱ्या लोकांच्या घरी सुद्धा स्मार्ट टीव्ही आणि तो ही सगळ्यात मोठा टीव्ही पाहायला मिळतो!

जेंव्हा टेलिव्हिजन आला तेंव्हा ती गोष्ट अत्यंत चैनीची समजली जायची. बिल्डिंग, चाळ, कॉलनी असं मिळून एखाद दुसऱ्या घरातच टीव्ही दिसायचा आणि सगळ्या लोकांची त्यांच्याकडे दूरदर्शनवरचे कार्यक्रम पाहायला गर्दी होत असे!

 

old tv set inmarathi

 

पण हळू हळू तिथून घराघरात टेलिव्हिजन दिसू लागले आणि आज तर ती घरातली एक आवश्यक गोष्ट बनली आहे!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

ब्लॅक अँड व्हाईट, कलर पासून २४ तास टीव्ही चॅनल्स पासून आता आपण स्मार्टटीव्ही वरून इंटरनेट सुद्धा हाताळू शकतो. तंत्रज्ञान जसं बदललं तसं टीव्हीच रूप बदलत गेलं!

पण एक गोष्ट आहे जी कधीच बदलली नाही, आणि आजही कोणताही लेटेस्ट टीव्ही घ्याय तर त्या बरोबर ती वस्तु येतेच, ती गोष्ट म्हणजे रिमोट कंट्रोल! 

टीव्ही बघत असलो आणि चॅनेल बदलायच्या वेळी अचानक टीव्हीचा हा रिमोट काम करणेच बंद करतो. आणि असं बऱ्याचदा घडतं.

मग आपण सर्व बटणं दाबून बघतो तेरी देखील तो काम करत नाही, त्यानंतर त्रस्त होऊन आपण त्याला दोन तीनदा आपटतो आणि मग तो रिमोट काम करू लागतो.

हे आपल्या प्रत्येकाच्या घरात रोजच होत असतं.

पण दोन-तीनदा रिमोट आपटल्यावरच तो काम करू लागतो ह्याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

आज आपण याचेच उत्तर जाणून घेणार आहोत.

 

remote control inmarathi

हे ही वाचा – ९० च्या दशकातल्या ‘या’ जाहिराती लागल्या की पालक लगेच टीव्हीचा रिमोट शोधायचे!

रिमोटमध्ये लावण्यात येणाऱ्या बॅटऱ्या ह्या खूप वेळासाठी रिमोटमधेच असतात. कधीकधी वर्षभर देखील ह्या बॅटीरिज त्या रिमोटमध्ये असतात, ते आपण रिमोट किती वापरतो यावर अवलंबून असते.

खूप काळ ह्या बॅटरी रिमोटमध्ये राहिल्याने त्यांच्या टर्मिनल्स आणि बॅटरी मध्ये एक ऑक्सिडेशन लेयर तयार होते.

ऑक्साईड लेयर मुळे हाय रेझिस्टीविटी तयार होते जी करंट वाहून नेण्यास अडथळा निर्माण होतो.

ज्यामुळे व्होल्टेज कमी होतो आणि रिमोट व्यवस्थितपणे काम करत नाही.

ऑक्साईड लेयरमुळे करंट वाहून नेण्यात अडथळा येत असल्याने हा आपला रिमोट कधी कधी काम करत नाही. तसेच टीव्हीचा रिमोट हा खूप कमी उर्जा वापरतो.

म्हणजे जेव्हा आपण रिमोटची बटण दाबतो तेव्हा एक लाल लाईट लागतो. तेवढीच उर्जा रिमोट वापरतो.

 

TV-Remote-inmarathi

 

एवढ्या कमी उर्जेच्या दाबाचा ऑक्साईड लेयरवर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे कधी कधी आपला रिमोट हा व्यवस्थितपणे काम करत नाही.

टीव्ही रिमोटमध्ये खूप कमी करंटचा वापर होतो त्यामुळे ऑक्साईड लेयरच्या रेझिस्टन्सवर ह्याचा काहीही परिणाम होत नाही.

तेच कॅमेरामध्ये ज्या बॅटीरिज लागतात त्यातील करंट हा जास्त असतो त्यामुळे कॅमेऱ्यात ऑक्साईड लेयर जास्त काळ टिकू शकत नाही.

रिमोट आपटल्याने रिमोटच्या आतील पार्ट्स हलतात. अश्याप्रकारे रिमोट आपटन्याला एक नाव देखील आहे- Percussive Maintenance.

 

Percussive Maintenance म्हणजे काय?

 

 

तर ह्याचा साधा सरळ अर्थ असा की Percussive Maintenance ह्या शब्दाचा वापर ‘एखाद्या मशीनला खूप वेळा आपटून त्याने त्या मशीनमध्ये काही सुधार येतो का हे बघण्यासाठी केलेली क्रिया’ ह्यासाठी होतो.

Percussive Maintenance ह्याचा वापर फक्त रिमोटच नाही तर टोस्टर, कार बॅटीरिज आणि एवढचं नाही तर टीव्हीह्यासारख्या मशीन्ससाठी देखील केला जातो.

 

TV-Remote-inmarathi02

 

अचानकपणे रिमोट आपटल्याने बॅटीरिज आणि टर्मिनल्समधील जो तुटलेला संपर्क आहे तो पुन्हा जोडला जातो त्यामुळे आपटल्यानंतर रिमोट पुन्हा काम करू लागतो.

आता तुम्हाला समजलं असेल की हा काही भारतीय जुगाड नाही, हे साधं सायन्स आहे, कित्येक लोकांना ही गोष्ट ठाउकच नाहीये की आपटून रिमोट चालू होण्यामागे हे कारण आहे!

===

हे ही वाचा – TV वर दिसणारा हा क्रमांक अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावतो!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?