' भगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांच्या फाशीविरोधात एका पाकिस्तानी वकिलाची लढाई! – InMarathi

भगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांच्या फाशीविरोधात एका पाकिस्तानी वकिलाची लढाई!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

२३ मार्च १९३१ चा तो दिवस ! लाहोरच्या त्या शादमान चौकात भारतमातेच्या तीन वीरपुत्रांनी हसत हसत मृत्यूला आलिंगन दिले. आपल्या देशाला गुलामगिरीतून वाचवण्यासाठी भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांनी सुरु केलेला प्रवास हा त्या फासापर्यंत येऊन संपला.

पण त्यांच्या विचारांना मात्र अमरत्व बहाल झाले. त्यांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्यप्राप्तीची आग अधिकच भडकली आणि अखंड भारत इंग्रजांविरुद्ध उभा राहिला.

भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांना इंग्रजांनी सँडर्सच्या हत्येच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा ठोठावली होती. आता याच शिक्षेच्या विरोधात इम्तियाज रशीद कुरेशी या पाकिस्तानी वकिलाने ब्रिटीश सरकार विरोधात लाहोर न्यायालयामध्ये याचिका दाखल केली.

त्याच म्हणणं आहे की केवळ द्वेषापोटी भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांना ब्रिटीश सरकारने खोट्या आरोपांखाली फाशी सुनावली.

 

bhagatsingh-rajguru-sukhdev-marathipizza02

स्रोत

इम्तियाज कुरेशी हे भगतसिंह मेमोरियल फौंडेशन या लाहोरमधील संस्थेचे चेअरमन देखील आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार,

जनरल सँडर्सच्या हत्येबद्दल ज्या शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना ब्रिटिशांनी फाशी दिली होती ती हत्या  या तिघांनी केलीच नव्हती. ते निर्दोष होते. त्यांचे  नाव कोणत्याही प्राथमिक माहिती अहवालात नव्हते हे सिद्ध झाले आहे.

तेव्हा ब्रिटीश सरकारने या खोटारडेपणाविरोधात माफी मागावी आणि त्याबद्द्दल नुकसान भरपाई करावी या मागणीसाठी मी न्यायालयाकडे दाद मागितली आहे.

pak-court.InMarathi

पंजाबमध्ये `सायमन गो बॅक’  या मागणीसाठी चाललेल्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱया लाला लजपतराय यांचा पोलिसांच्या अमानुष लाठीहल्ल्यात मृत्यू झाला.

त्यामुळे भगतसिंग, राजगुरु,  सुखदेव या तीन क्रांतीकारकांनी त्यांच्या हत्येचा सूड उगविण्याचे ठरविले. त्यांनी या लाठीहल्ल्याचा आदेश देणाऱया जनरल स्कॉटच्या हत्येचा विडा उचलला.

 

bhagatsingh-rajguru-sukhdev-marathipizza03

स्रोत

तो लाहोरच्या ब्रिटिश असेम्ब्लीत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी असेम्ब्लीवर बॉम्ब टाकला. त्यात जनरल स्कॉटऐवजी जनरल सँडर्स मारला गेला. त्यानंतर पिसाळलेल्या ब्रिटिश सरकारने त्यांची हत्या करणाऱयांना फासावर चढवून क्रांतीवीरांचे आंदोलन उधळून लावण्याचे ठरवले.

त्यानुसार केलेल्या हल्लेखोरांच्या तपासात भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांची नावे पुढे आली. अन् त्यांना सापळा रचून पकडण्यात आले आणि ब्रिटिश सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप ठेवून २३ मार्च १९३१ रोजी लाहोरच्या शादमान चौकात भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आले.

इम्तियाज कुरेशी यांनी भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्यावर वरिष्ठ पोलिस अधीक्षक जॉन सँडर्स याच्या हत्येप्रकरणी नोंदविण्यात आलेल्या प्राथमिक माहिती अहवालाची (एफआयआर) साक्षांकित प्रत एका याचिकेद्वारे मागविली होती.

ही याचिका मिळताच लाहोर पोलिसांनी अनारकली पोलिस ठाण्यातील नोंदीचा शोध घेतला तेव्हा त्यांना सँडर्सच्या हत्येच्या वेळचा एफआयआर सापडला.

तो उर्दू भाषेत असून त्यात १७ डिसेंबर १९२८  रोजी सायंकाळी दोन इसमांनी सँडर्सची हत्या केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 

bhagatsingh-rajguru-sukhdev-marathipizza04

स्रोत

इम्तियाज कुरेशी यांनी भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्यावर वरिष्ठ पोलिस अधीक्षक जॉन सँडर्स याच्या हत्येप्रकरणी नोंदविण्यात आलेल्या प्राथमिक माहिती अहवालाची (एफआयआर) साक्षांकित प्रत एका याचिकेद्वारे मागविली होती.

ही याचिका मिळताच लाहोर पोलिसांनी अनारकली पोलिस ठाण्यातील नोंदीचा शोध घेतला तेव्हा त्यांना सँडर्सच्या हत्येच्या वेळचा एफआयआर सापडला.

तो उर्दू भाषेत असून त्यात १७ डिसेंबर १९२८  रोजी सायंकाळी दोन इसमांनी सँडर्सची हत्या केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अनारकली ठाण्याचे अधिकारी तक्रारदार होते. प्रत्यक्षदर्शींनी एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे ५ फूट ५ इंच उंचीच्या हिंदू चेहऱयाच्या, मिशी असणाऱया मजबूत देहयष्टीच्या व पांढरा पायजमा व राखाडी कुर्ता,  डोक्यावर काळी टोपी परिधान केलेल्या इसमाने ही हत्या केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

यासाठी ४५० साक्षीदार जमा करण्यात आले होते पण त्यातील एकाचीही साक्ष न नोंदविताच भगतसिंग, राजगुरु व सुखदेव या क्रांतिकारांना फासावर लटकवण्याचे आदेश देण्यात आले.

न्यायालयाने देखील इम्तियाज कुरेशी यांचा खटला ग्राह्य धरला असून फेब्रुवारी २०१६ रोजी या खटल्याची पहिली सुनावणी पार पडली. एफआयआर मध्ये भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या नावाचा कोठेच उल्लेख नाही, मग कोणत्या आधारावर ब्रिटिशांनी या तिघांना फाशी दिली हा प्रश्न इम्तियाज कुरेशी यांनी न्यायालयात उपस्थित केला.

 

bhagatsingh-rajguru-sukhdev-marathipizza05

स्रोत

भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या मृत्यनंतर सुमारे ८५ वर्षांनी हे सत्य उलगडले आहे. या खटल्याचा अपेक्षित निकाल लागून ब्रिटीशांना माफी मागण्यासाठी भाग पाडू असा निश्चय  भगतसिंह मेमोरियल फौंडेशन या संस्थेने केला आहे. त्यांना यश मिळो हीच आशा !!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?