रामभक्त ‘चिरंजीव हनुमान’ आजही जिवंत आहेत का? मग ते राहतात कुठे?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक – निखिल सोनजे
===
आपल्यापैकी बरेच जण हे जाणतात की सात चिरंजीवांपैकी एक म्हणजे श्री हनुमान! बरं चिरंजीव आहेत तर याचा अर्थ ते आजही ह्या पृथ्वीतलावर वास्तव्य करतात. यांपैकी श्री हनुमान यांच्या वास्तव्याबद्दल काय वर्णनं आपल्या शास्त्रांमध्ये आली आहेत त्याबद्दल थोडं जाणून घेऊया!!!
हनुमान कलियुगात “गंधमादन” या पर्वतावर वास्तव्य करतात असा श्रीमद्भागवत यात उल्लेख आहे!
ह्या गंधमदन पर्वताची कथा अशी की एकदा भीम सहस्रदल कमळ आणायला गंधमादन पर्वतावर गेला होता त्यावेळी बजरंगबलींनी त्याचे गर्वहरण केले होते.
–
- हनुमानाच्या या मंदिरात शनी देव चक्क स्त्री वेशात आहेत …वाचा
- संजीवनी आणताना इथे थांबले होते हनुमान… आजही दिसतात त्यांच्या पाऊलखुणा…!!
–
तसेच आपण हेही ऐकून आहोत की जिथे जिथे राम नाम घेतले जाते आणि हरी कीर्तने होतात तिथे तिथे हनुमान सूक्ष्म रूपात असतात.
साहजिकच, “आजच्या काळात ह्या पर्वताचा पत्ता काय ???” असा प्रश्न अनेकांना पडतो!
रामेश्वरजवळचा जो पर्वत आहे तो हा गंधमादन नव्हे तसेच आजच्या ओरिसा राज्यातील देखील हा तो गंधमादन नव्हे!!! आपण ज्या गंधमादन पर्वताबद्दल बोलतोय तो हिमाचल मधील कैलाश पर्वताच्या उत्तरेला स्थित आहे.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
कैलाशच्या दक्षिणेला केदार पर्वत आहे तर उत्तरेला गंधमादन पर्वत आढळतो.
या पर्वताच्या शिखरावर कुठल्याही वाहनाने पोहोचणे अशक्य आहे.
येथे जाण्याचे ३ मार्ग आहेत – via नेपाल मानसरोवरच्या पुढे, दुसरा मार्ग म्हणजे via भूटान आणि तिसरा via अरुणाचल आणि चीन!
येथे जाणे फार सुरक्षित नाही असे बऱ्याच लोकांचे म्हणणे आहे.
तेही बरोबरच आहे म्हणा, रामभक्त हनुमान इतक्या सहजासहजी भेटतील का??
–
- हनुमानाच्या स्पर्शाने निर्माण झालेल्या या तळ्याची किर्ती सातासमुद्रापार पोहोचली आहे
- बालब्रह्मचारी हनुमानाला होता पुत्र… त्याच्या जन्माची ‘ही’ कहाणी ठाऊक आहे का?
–
“सेतू एशिया” नामक एका spiritual संस्थेने कलियुगातील हनुमानाच्या वास्तव्याबद्दल बरंच संशोधन केले आहे. श्रीलंकेत स्थित ह्या संस्थेने असा दावा केला आहे की श्रीलंकेतील मातंग आदिवासी लोकांच्या एका समूहाला भेटायला श्री हनुमान दर ४१ वर्षांनी येत असतात.
ते २७ मे २०१४ रोजी या समूहाला भेटायला आले होते असा या संस्थेचा दावा आहे.
पिदूरू हा श्रीलंकेतील सर्वात उंच पर्वत असून तेथेच हा मातंग लोकांचा समूह राहतो. त्यांची जीवनशैली सामान्य लोकांपेक्षा खूप वेगळी असून ते जगापासून अगदी disconnected आहेत.
पर्वताच्या आजूबाजूचा परिसर हा घनदाट जंगलाचा आणि प्राचीन गुहा व महालांचा आहे. Carbon dating करून पुरातत्व संशोधनकर्त्यांनी याचा काळ रामायणाच्या काळाशी मिळताजुळता आहे असे सांगितले आहे.
सेतू एशिया संस्थेच्या संशोधनानुसार मातंग समूहाचा प्रमुख हनुमान यांच्या सहवासाचे अगदी प्रत्येक क्षणाचे वर्णन एका पुस्तकात त्यांच्या भाषेत लिहून ठेवत असतात. त्यांची भाषा समजायला कठीण असल्याने त्यांचे decipher करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
हनुमान हे श्री राम अवतार समाप्ती नंतर येथे दर ४१ वर्षांनी येतात. अधिक माहितीसाठी सेतू एशिया यांच्या website ला जरूर भेट द्या.
टीप: वरील topic बद्दल कुणाला अधिक माहिती असल्यास जरूर लेखकाला संपर्क साधावा. तक्रार, सूचनांचे स्वागतच आहे.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.