' चीनची इस्लामविरोधी कडवी नीति; प्रत्येक भारतीयाने समजून घेतली पाहिजे. – InMarathi

चीनची इस्लामविरोधी कडवी नीति; प्रत्येक भारतीयाने समजून घेतली पाहिजे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतात अल्पसंख्यांक असुरक्षित आहेत असं नेहमी म्हटलं जातं. पण भारतीय घटना आणि राज्यव्यवस्था अल्पसंख्यांकांचे हक्क, त्यांचे धार्मिक स्वातंत्र्य यांना अबाधित ठेवण्यासाठी कटीबद्ध आहे. धार्मिक स्वातंत्र्य हे भारतीय घटनेचे वैशिष्ट्य आहे.

त्याची परिणीती प्रत्येक अल्पसंख्यांक धार्मिक समूहांना स्वतःच्या चालीरीती अवलंबिता येण्यात झाली आहे.

 

Muslims-marathipizza

 

अनेकदा या धार्मिक चालीरीती, प्रथा राज्याच्या मार्गात, कायदा आणि सुव्यवस्थेत अडथळा ठरतात. त्यावेळी त्यांना थारा न देणे घटनेत अपेक्षित असते. पण तरी अल्पसंख्यांकांच्या मतांच्या राजकारणासाठी राज्यकर्ते त्याचा अवलंब करताना कचखाऊ धोरण स्वीकारतात.

पण भारताच्या शेजारी चीनने मात्र मध्यंतरी वेगळा मार्ग अवलंबला आहे. सध्या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आशियातील मुस्लिम देश भारतावर टीका करत आहे.

 

China Banned Things.Inmarathi

 

देशाच्या सुरक्षेचा, सार्वभौमत्वाचा प्रश्न येतो तेव्हा, सगळ्या अल्पसंख्यांक धार्मिक समूहांच्या श्रद्धा आणि हक्क दुय्यम असतात हे सांगणारे धोरण चीनने तिथल्या मुस्लिमांच्या बाबतीत अवलंबले.

या काळात चीनमध्ये पाच हजाराहून अधिक मशिदी बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आल्या असल्याचे समोर आले आहे.

सरकारी न्युज एजन्सी शिन्हुआच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार मस्जिदी पाडण्याचे काम कट्टरपंथी मुस्लिम विचारधारा वाढण्यापासून रोखण्यासाठी करण्यात आले होते.

 

demolition-inmarathi

===

हे ही वाचा – चीनचा विकृत चेहरा दाखवणाऱ्या १३ गोष्टी : बुटक्यांचं प्रदर्शन, भुतांचं शहर आणि…

===

चीनच्या जिंझियांग प्रांतात मुस्लिमांची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. तिथे मुस्लिमांना उईघुर मुसलमान म्हटले जाते. एका अनुमानानुसार चीनमध्ये साधारणपणे पाच कोटी मुस्लिम राहतात.

इथे अनेक नवीन-जुन्या मशिदी अस्तित्त्वात होत्या.

मात्र चिनी अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की या मशिदींमध्ये कट्टर मुस्लिमवाद शिकवला जातो आणि आतंकवादी तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

त्यामुळे देशाला धोका पोहोचू शकेल अशी प्रार्थनास्थळे नष्ट करण्यातच देशाचे आणि जगाचे हित आहे.

काही काळातच ७०% मशिदी तोडून टाकण्यात आल्या.

 

 

मशिदी उध्वस्त करण्याबरोबरच इस्लामी कट्टरपंथीयांचा शोध मोठ्या वेगाने घेण्यात आला होता.

हे कट्टरपंथी लोक सरकारी कार्यक्रम आणि सरकारी इमारतींवर हल्ला करतात. ज्या मशिदी जमीनदोस्त करण्यात आल्या त्यातील बहुतांश जमिनींवर बाजार उघडण्याचे किंवा सार्वजनिक शौचालये बांधण्याचे आदेश देण्यात आले होते.

हे संपूर्ण अभियान पीपल्स रिपब्लिक आर्मीच्या देखरेखीखाली चालविले गेले होते.

आर्मीच्या देखरेखीमुळे या कृतीला कोणाचाही विरोध होण्याची शक्यता संभवत नाही, कारण कम्युनिस्ट चायनामध्ये कोणी सरकारला विरोध केला तर त्याला जेलमध्ये टाकण्याची किंवा सरळ बंदुकीच्या गोळीने उडविण्याची पद्धत आहे.

चीनमध्ये एक “Sinicization” नावाची अतिशय कुप्रसिद्ध पद्धत आहे. सिनीसायझेशन म्हणजे एकीकडे चायनीज तत्त्वप्रणाली, चायनीज आचारविचार, चायनीज संस्कृती याचा अवलंब करण्याचा आग्रह करणे आणि दुसरीकडे चिनी संस्कृती सोडून असलेल्या इतर वसाहती उध्वस्त करणे.

 

mosque-in-china-inmarathi

 

हे “De-Sinicization” च्या विरुद्ध आहे. उईघुर लोकं हे तत्त्व मानतात. चीन उइघुर लोकांना चीनच्या जमिनीवर उपरे मानते.

त्यामुळे चिनी लोक जे जे काही उइघुर लोकांशी निगडित आहे ते उध्वस्त करण्यामागे किंवा नष्ट करण्याच्या मागे आहेत.

उदाहरणार्थ ते बौद्ध बेझेलिक साईट ही किंवा चिनी लष्करी तळ हे “made in China” असल्याचे मानतात.

शिवाय चिनी वसाहतींना इतरत्र पसरण्यासाठी, विस्तारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. यामुळे उरूमची आणि इलीसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी आता उइघुर लोकांपेक्षा चिनी लोकसंख्या वाढली आहे.

आता फक्त जिंझियांगच्या दक्षिण भागात उइघुर लोक बहुसंख्यांक आहेत.

उत्तरेकडील लोक हे लवकरच हान चायनीज लोकांच्या प्रभावाखाली येणार आहेत आणि त्यामुळेच मशिदीसुद्धा नष्ट करण्याच्या यादीतून वगळण्यात आलेल्या नाहीत.

उइघुर हे अधिककरून मुस्लिम समाजातील आहेत आणि त्यांचे चीनबरोबर जुने वाद आहेत.

याचा बदला घेण्यासाठी चीन मशिदी उध्वस्त करत चालला आहे जेणेकरून उइघुर लोकांचा प्रतिकार मोडून काढण्यात त्यांना सहजी यश मिळेल.

चीनने अशा प्रकारे सर्व मशिदी उध्वस्त केल्या तर मात्र ते मुस्लिम समाजाचे सर्वांत मोठे शत्रू बनतील आणि त्यातून त्यांना धोका निर्माण व्हायची शक्यता आहे. तर मग त्यांचा काय प्लॅन असेल असं तुम्हाला वाटतं?

 

china-inmarathi

===

हे ही वाचा – चीनची मुजोरी उधळण्यासाठी या भारतीयाने उभारले होते ‘स्वदेशी’ आंदोलन

===

यातून वाचण्यासाठी चीन दुसरीकडे मशिदी बांधत आहे. पण या कोणासाठी? तर या आहेत हुईससाठी. हा हान मुस्लिम गट आहे. त्यामुळे ते उइघुर लोकांच्या मशिदी उध्वस्त करून हुईस लोकांसाठी मशिदी बांधत आहेत.

यामुळे चीनमधील मुस्लिम समाजातील अंतर्गत तेढ वाढीस लागेल. असा त्यांचा कुटील डाव आहे.

यातून काही वाईट झाले तर त्याचा फायदा चीनलाच होईल.

यामुळे ते मुस्लिमांचा आदर करतात असं त्यांना सांगता सुद्धा येईल पण वास्तविक पाहता यात तथ्य नाही. यामुळे त्यांना जगासमोर सुद्धा खोटा मुखवटा घालून वावरता येत आहे.

यासाठी त्यांनी ईद काहसारख्या मोठ्या मशिदी उध्वस्त केल्या नाहीत तर अनेक छोट्या छोट्या मशिदी उध्वस्त केल्यात आणि त्यांच्या जागेवर चिनी पुतळे उभारण्यात आले, बाजारपेठा उभारण्यात आल्या आणि सार्वजनिक शौचालये सुद्धा…!

किती चलाखीने त्यांनी हे सगळं केलंय!

 

china-muslim-inmarathi

 

चीनचे हे पाउल तिथल्या मुस्लीम जनतेच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या विरोधात जाणारे वाटू शकते.

पण धार्मिक श्रद्धा जेव्हा देशाच्या सुरक्षेच्या आड येतात तेव्हा त्याचं काय करायचं याचं उदाहरण चीनने घालून दिलं आहे.

मतांच्या राजकारणासाठी धार्मिक लांगुलचलन ही भारतातील राजकारण्यांना आणि पर्यायाने जनतेलाही सवयीची झालेली गोष्ट. पण देशाची सुरक्षा आणि एकात्मता ही कोणत्याही समूहाच्या धार्मिक स्वातंत्र्यापेक्षा जास्त महत्वाची असते असा स्पष्ट संदेश चीनने यातून दिला आहे.

भारतातील घुसखोरीचा विषय पाहता रोहिंग्यांचा भारतात होणारा प्रवेश आणि एकूणच CAA आणि NRC कायद्यांवरून सुरु असलेलं राजकारण, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरतो. केवळ धार्मिक स्वातंत्र्यासाठी त्यांचं आसाममध्ये असलेलं वास्तव्य, भारतासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

rohingya-inmarathi

 

रोहिंग्यांच्या नावाखाली, दहशतवाद पसरविणाऱ्या व्यक्तींना भारतात पाठवणं आणि त्यांच्यामार्फत भारतातील परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करणं या गोष्टी घडू शकतात. एवढंच नाही, तर काश्मीर आणि परिसरात अशांतता पसरवण्यासाठी कुरापती करणे सुद्धा शक्य होऊ शकेल.

म्हणजेच चीनच्या या इस्लामविरोधी धोरणाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम भारतावर होणं सहज शक्य आहे.

===

हे ही वाचा – चीनवर नजर ठेवणाऱ्या भारतीय सैन्याची “उबदार” मदत करणारं “हिम तापक”

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?