सुप्रसिद्ध “मोना लिसा” – स्त्री आणि तिचं चित्र – दोन्हींबद्दल सगळं काही जाणून घ्या
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
मोना लिसा ही जगातील सर्वात प्रसिद्ध पेंटिंग पैकी एक आहे. ह्या पेंटिंगला एका इटालियन कलाकार लिओनार्डो दा विन्ची ह्यांनी १५०३-१५०६ दरम्यान बनविली. मोना लिसाची ही पेंटिंग जगभरात अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे.
पण त्यामागील काही फॅक्ट्स कदाचितच कुणाला माहित असतील. आज तेच फॅक्ट्स आम्ही आपल्यासमोर घेऊन आलो आहोत.
१. तिचे खरे नाव हे Mona Lisa नाहीये, तर काही स्पेलिंग मिस्टेकमुळे तिचे हे चुकीचे नाव सर्वत्र पसरले. तिचे खरे नाव हे Monna Lisa असे आहे. Monna ह्याचा इटालियन भाषेत ‘My lady’ असा अर्थ होतो.
२. मोना लिसाच्या भुवया देखील अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरल्या. काहींचा असा विश्वास आहे की चित्र पूर्ण करत असताना त्या चुकून काढण्यात आल्या होत्या. तर काहींच्या मते इतर लिओनार्डो दा विंची ह्यांची ह्या कार्याच्या परिपूर्णतेकडे ओढ असल्यामुळे त्यांना कधीही ही पेंटिंग पूर्ण करता आली नाही. याचा अर्थ असा की मोना लिसाच्या कधीच भुवया नव्हत्या.
त्याकाळी स्त्रियांनी त्यांच्या भुवया आणि पापण्या काढणे लोकप्रिय होतं.
३. ह्या चित्रात मोना लिसाच्या तीन वेगवेगळ्या लेयर्स आहेत ज्यात तिच्या वेगवेगळ्या पोझेस आहेत.
४. १९६० च्या दशकात या पेंटिंगचा प्रवास दौरा झाला, जेथे याला १०० दशलक्ष डॉलरचा विमा मूल्यांकन देण्यात आला. परंतु ही पॉलिसी कधीही काढली गेली नाही, कारण प्रीमियमची किंमत सर्वोत्तम सुरक्षेच्या खर्चापेक्षा जास्त होती.
५. Louvre Museum जे पॅरिस येथे आहे तिथे मोना लिसासाठी स्वतःची एक हवामान नियंत्रित खोली आहे. जी बुलेटप्रुफ ग्लासने सुरक्षित आहे. ही खोली बनविण्यासाठी ७ मिलियन डॉलर एवढा खर्च आला होता.
६.अनेकांना असे वाटते कीही पेंटिंग लिसा घेरार्डीनी ह्याच्या प्रतिमेवरून बनविण्यात आली आहे, तर काहीच्या मते ही लिओनार्डो दा विंची ह्यांची स्वत: ची पोर्ट्रेट आहे.
७. Louvre Museum येथे स्वतःची खोली असण्याआधी मोना लिसाच्या ह्या पेंटिंगला मुद्दाम खराब करण्याचा प्रयत्न करण्यात आला. १९५६ ला Ugo Ungaza ह्याने दगड मारून मोना लिसाच्याह्या पेंटिंगच्या कोपरा जवळचा भाग खराब केला होता.
८. १९११ साली मोना लिसाची ही प्रसिद्ध पेंटिंग Louvre Museum मधून चोरी झाली. ह्याचा संशय Pablo Picasso वर घेण्यात आला आणि त्यासाठी त्याची चौकशी देखील केली गेली. पण त्यात तो निरपराध सिद्ध झाला.
अशी ही मोना लिसाची पेंटिंग जेवढी सुंदर आहे ती तेवढीच लोकप्रिय आणि प्रसिद्ध देखील आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.