केरळमधील ही कंपनी आता जुन्या ५०० आणि १००० च्या नोटा विकत घेणार
नोटाबंदीचा निर्णय झाल्यापासून एक प्रश्न प्रत्येकाला सतावतोय तो म्हणजे आता सरकार जमा केलेल्या एवढ्या नोटांचं नक्की करणार तरी काय? कोणी म्हणत जाळून टाकणार, कोणी म्हणत रद्दीत देणार, कोणी म्हणत अजून काय करणार, पण कितीही झाले तरी ते पैसे आहेत, सरकार हे पैसे असे वाया कसे जाऊ देईल बरे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे ५०० आणि १००० च्या तब्बल १८ अब्ज नोटा सरकारकडे जमा झाल्या आहेत. एवढ्या नोटांचं करायचं काय हा प्रश्न रिझर्व बँक ऑफ इंडियावर सोपवण्यात आला होता आणि त्याच काय करायचं हे रिझर्व बँक ऑफ इंडियाने ठरवलं देखील आहे. या सर्व नोटांचा पुनर्वापर व्हावा या हेतूने रिझर्व बँक ऑफ इंडियाने केरळमधील एका प्लायवूड कंपनीला या सर्व १८ अब्ज नोटा देण्याचा निर्णय घेतला आहे.
या सर्व नोटांचे प्रथम लहान लहान बंडल बनवले जातील. त्यानंतर हे सर्व बंडल्स रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या Shredding Centers मध्ये पाठवण्यात येतील. तेथे या नोटांना चांगल करकचून बांधून मोठे गठ्ठे बनवले जातील. त्यानंतर हे गठ्ठे गाडीमार्गाने केरळ राज्यातील कन्नूर शहरात असणाऱ्या Western India Plywood (WIPL) या कंपनीसाठी रवाना करण्यात येतील.
ही कंपनी या नोटांचे रिसायकलिंग करून त्यांचा वापर briquettes बनवण्यासाठी किंवा पेपरवेट, बोर्ड्स, फाईल्स यांसारखी stationery products बनवण्यासाठी केला जाईल. briquettes हा विटांसारखाच एक प्रकार आहे. यांचा वापर औद्योगिक क्षेत्रामध्ये केला जातो.
याबद्दल बोलताना रिझर्व बँक ऑफ इंडियातर्फे स्पष्ट करण्यात आले की,
पूर्वीची नोटा जाळून टाकण्याची पद्धत आम्हाला वापरायची नव्हती, करण त्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते, म्हणून यावेळेस आम्ही पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब करायचा विचार केला.
रिझर्व बँक ऑफ इंडियाने Western India Plywood (WIPL) कंपनीशी करार केला आहे. या कंपनीने प्रथम ४० टन नोटांचे गठ्ठे मागवले असून कंपनीने एका टनसाठी २५० रुपये देण्याचे मान्य केले आहे.
म्हणजे आपला पैसा वाया जाणार नाही तर Recycling च्या माध्यमातून त्याचा योग्यच वापर होणार आहे.