लग्नानंतर असं काय बदलतं? कल्पनेपलीकडील छोटे बदल आणि त्यातून बदलणारं आयुष्य…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लग्न हे प्रत्येकाच्या जीवनात एक नवा उत्साह घेऊन येते, जीवनातील खूप महत्वाचे वळण म्हणजे लग्न. कारण ह्यानंतर अनेकश्या गोष्टी बदलून जातात. त्यामुळे लग्नाआधी अनेक जण आपले वैवाहिक जीवन कसे असावे ह्याची स्वप्न बघत असतात. पण प्रत्येक स्वप्न पूर्ण होतच असं नाही.
कदाचित म्हणूनच एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली, प्रेमासाठी वाट्टेल ते करण्यास तयार असलेली जोडपी लग्नानंतरच्या पुढच्याच वर्षी वैतागलेली, त्रासलेली दिसतात.
म्हणूनच म्हणतात की शादी के लड्डु… खाये वो पछताए, जो ना खाए वो भी पछताए.
अर्थात असं असलं तरी प्रत्येकाला एकदा तरी या खमंग रेसिपीची चव चाखायची असते. मात्र तुम्हाला तुमचं नातं लग्नानंतरही पुर्वीसारखंच सुंदर ठेवायचं असेल तर त्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावे लागतील.
दुरून सुंदर आणि मजेशीर दिसणारं हे वैवाहिक जीवन एक रोलरकोस्टर राईडपेक्षा काही कमी नसतं. ज्यात रोज एक नवा ट्वीस्ट येत असतो. जसे लग्नाचे काही चांगले परिणाम आहेत तसेच त्याचे काही वाईट परिणामही आहेत.
लग्न झाल्यावर प्रत्येकालाच आपल्यावर आलेली ही जबाबदारी ओझं वाटू लागतं. काही काळ चाललेला रोमान्सदेखील कधी कधी ह्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबून जातो.
जर कुठल्या दाम्पत्याचं लव्ह मॅरेज झालं असेल तरी देखील काही वेळाने ते प्रेमही कमी होतं. लग्नाआधी जे जोडपे एकमेकांची एवढी काळजी घ्यायचे तेच लग्नानंतर अगदी बेफिकीर होऊन जातात. ज्यामुळे ह्या जोडप्यांमध्ये भांडणे वाढू लागतात.
तर इकडे अरेंज्ड मॅरेज झालेल्या लोकांना तर ह्यापेक्षा जास्त समस्यांना सामोरे जावे लागते. कारण त्यांच्यासाठी जोडीदार आणि त्याच्यासोबतच इतर गोष्टीही नवीन असतात. त्यात अॅडजस्ट होणं कुणाला जमतं कुणाला नाही. त्यामुळे अश्या जोडप्यांमध्ये देखील भांडणे होऊ लागतात.
लग्नाआधी हेच जोडपे एकमेकांना भेटण्यासाठी नानाविध प्रकारे प्रयत्न करत असतात, पण लग्नानंतर हे चित्र पूर्णपणे पालटून जातं. त्यानंतर हे सर्व तेवढ स्पेशल राहत नाही.
लग्नाआधी प्रत्येक मुलगी ही स्वतंत्र जीवन जगत असते, पण लग्न झाल्यावर तिने जश्या आयुष्याचे स्वप्न बघितले असते तसं काहीही तिच्यासोबत होत नाही. एवढचं नाही तर जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली ती पार दबली जाते.
लग्नाआधी भलेही मुलं आवडत असली तरी जेव्हा खरोखर आपल्याला मुल होतात तेव्हा त्यांचा सांभाळ करणे हे काही तारेवरच्या कासरतेपेक्षा कमी नाही. त्यांचा सांभाळ करण्यात तुमचा दिवसच नाही तर रात्रही अनेकदा खराब होते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.