' मुलीसाठी बांधलेले “फिरते घर”, ही अफलातून आयडिया बघून थक्क व्हाल! – InMarathi

मुलीसाठी बांधलेले “फिरते घर”, ही अफलातून आयडिया बघून थक्क व्हाल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

डॅडि्ज गर्ल असं म्हटलं जातं, कारण मुलगी आणि वडील हे नातं काही वेगळंच असतं,

वैज्ञानिक दृष्ट्या देखील सिद्ध झालं आहे कि सर्वसाधारणपणे मुलगा हा त्याच्या आईशी जास्त जोडलेला असतो आणि मुलीला तिचे वडील जास्त जवळचे वाटतात आणि प्रत्येक मुलीसाठी तिचे वडीलच हिरो असतात!

प्रत्येक वडिलांचं हे स्वप्न असतं की आपल्या मुलांना जगातील सर्व सुख सोयी द्याव्यात,

जे आपल्याला मिळालं नाही, ते आपल्या लेकीला आणून द्यावं आणि त्यासाठी जशी आई झटते तितकाच किंबहुना त्यापेक्षा जास्त एक बाप झटत असतो मुला-मुलींच्या उज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी!

father son relationship

त्यांना नेहेमी संकटांपासून दूर ठेवावं म्हणून प्रत्येक पिता आपल्या मुलांसाठी जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करत असतो. अश्याच एका पित्याने आपल्या मुलीसाठी एक ट्रक तयार केला आहे.

पण हा कुठला मालवाहू ट्रक नाही तर चक्क चालतं फिरतं घर आहे,

हो हे ऐकून सुद्धा आपल्याला आश्चर्य वाटू शकतं,  पण हे खरं आहे.

लेकीसाठी आपली कल्पनाशक्ती पणाला लावणा-या या वडिलांविषयी आणि त्यांच्या भन्नाट आयडियाबद्दल जाणून घेऊया…

 

kiravan-inmarathi08

 

एकेकाळी प्रख्यात वॉल्ट डिस्ने या स्टुडिओसाठी रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट मध्ये प्रेसिडेंट म्हणून काम करणाऱ्या अमेरिकन टेकनॉलॉजिस्ट आणि व्हिज्युअल इफेक्ट्स आर्टिस्ट ब्रॅन फेरन (Bran Ferren) यांनी आपल्या मुलीसाठी एक अतिशय अलिशान आणि सुंदर असा ट्रक तयार केला आहे.

त्याच्या मुलीचे नाव किरा फेरन (Kira Ferren) असून ह्या ट्रकला त्यांनी KiraVan हे नाव दिलं,

 

Walt and Kira Ferren inMarathi

 

त्यांनी आपल्या मुलीसाठी २६० हॉर्सपॉवरचा हा ट्रक ह्यासाठी तयार केला जेणेकरून ती संपुर्ण जग बघू शकेल.

विज्ञान आणि तंत्रज्ञान इतकं पुढे गेल आहे याचा आपण अंदाज देखील लावू शकत नाही!

 

 

 

ब्रॅन सध्या Applied Minds LLC करता काम करत आहेत. त्यांना ही आयडिया २०१० साली आली आणि आता त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे.

ह्या ट्रकसाठी Mercedes-Benz Unimogच्या फ्रेमला री-डिझाईन करून बनविण्यात आलं. ह्यावर नक्कीच ब्रानने खूप मेहनत घेतल्याचं दिसून येतं.

हा ट्रक बनवण्यासाठी त्यांना ४ वर्षं आणि लाखो डॉलर्स खर्च करावे लागले!

 

 

ह्या ट्रकमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

एवढचं नाही तर हा ट्रक इको-फ्रेंडली देखील आहे. आणि हा ट्रक विक्रीसाठी नसून तंत्रज्ञानाचा आविष्कार जगापुढे मांडण्यासाठी आहे, कित्येक नवीन सोयी सुविधांनी भरलेला ट्रक हा कुणालाही मोहात पाडेल असाच आहे!

ह्या ट्रकमध्ये 260hp Durbo-Diesel Engine चे इंजिन लागलेले आहे. आणि हा ७० मैल प्रती तास ह्या गतीने रस्त्यावर धावू शकतो.

या ट्रक मध्ये प्रवेश करण्यासाठी ज्या पायऱ्या बसवल्या गेल्या आहेत त्यांची किंमतच काही २५००० डॉलर्स इतकी आहे,

मग तुम्ही विचार करू शकता जगातील एकमेव ६*६ ड्राइव्ह व्हील च्या या ट्रकची किंमत किती असेल!

 

 

ह्या ट्रकच्या आत सुसज्ज असे किचन आहे , ज्यामध्ये एक स्टोव्ह आणि एक फ्रीज आहे.

तसंच डायनिंग हॉलमध्ये एक टीव्ही आहे, किरासाठी स्वतंत्र एक बेडरूम देखील आहे.

शिवाय सुरक्षेची काळजी घेत याच्या १७० गॅलन फ्युल टॅंक मध्ये समजा चुकून खालच्या दर्जाचं इंधन टाकलं तर तो ट्रक ऑटोमॅटिकली ते मॉनिटर करून इंजिन ताबडतोब बंद करतो अशी सुद्धा सोय यात केली गेली आहे!

 

 

एन्ट्री गेट सोबतच एक बटन देखील बनविण्यात आले आहे. हे बटन दाबले की शौचालयातील वेस्ट ऑटोमेटिकली एका पावडरमध्ये बदलून जाते जे बायोदिग्रेडेबल आहे.

ह्याच्या किचनवर आणखी एक छोटसं बेडरूम आहे. येथे एक लहानसं ऑफिसही आहे जिथे कॉम्पुटर आणि इंटरनेटची सुविधा आहे.

आपल्या मुलीला वाटेल तेंव्हा अगदी सुरक्षितपणे कुठेही फिरता यावं आणि तिला जग बघायला मिळावं याच इच्छेतूनच हा ट्रक बनवायची प्रेरणा त्या ब्रॅनला मिळाली.

Amazing truck InMarathi

नुसतं विज्ञान किंवा तंत्रज्ञान अवगत असून चालत नाही तर ते योग्य वेळी योग्य त्या पद्धतीने वापरता आलं पाहिजे यातच खरं कौशल्य आहे, या सगळ्या गोष्टी सत्यात उतरवण्यासाठी नक्कीच पैशाची गरज असते पण त्याहीपेक्षा जास्त गरज असते ती प्रबळ इच्छाशक्तीची,आत्मविश्वासाची आणि जिद्दीची!

पैसा तर ब्रॅन कडे होताच, पण प्रबळ इच्छशक्तीमुळेच आपल्या मुलीच्या भविष्याखातर त्याने त्याच्या पैशाचा आणि ज्ञानाचा सदुपयोग करून हा आविष्कार लोकांसमोर आणला! केवळ त्याच्या मुलीवरचे त्याचे प्रेम आणि त्याची जिद्द यामुळेच हे शक्य झाले आहे!

 

 

सुरक्षिततेच्या प्रत्येक अँगल ने हा ट्रक एक उत्तम उदाहरण आहे,  शिवाय या ट्रक ची किंमत काही शेकडो कोटी आहे जे आपल्या कल्पना शक्तीपकडचे आहे, शिवाय खासकरून या ट्रॅकवर लावलेलं लाईट्स आणि ते जेंव्हा रात्री लागतात तेंव्हा या ट्रक ची शान काही औरच असते रात्रीच्या वेळी हा ट्रक त्यावर लागलेल्या या लाईट्सच्या प्रकाशात उजळून निघतो.

ह्यासोबतच ब्रान ह्याने एक मोटारसायकल देखील बनविली आहे. CDI Turbo-Diesel Engine ने बनलेल्या ह्या मोटारसायकलमध्ये तीन सिलेंडर लागलेले आहेत.

एखाद्या जादुई कथेतील रथाप्रमाणे दिसणारा हा ट्रक प्रत्यक्षात आला, याचं सगळं श्रेय विज्ञानाला आणि ते सकारात्मकरित्या वापरण्याची इच्छा पुर्ण करणा-या वडिलांच्या अफाट जिद्दीला जातं.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?