' ह्या १० महान शास्त्रज्ञांचे जगभर गाजलेले प्रसिद्ध शोध खरंतर दुसऱ्यांनीच लावले होते…! – InMarathi

ह्या १० महान शास्त्रज्ञांचे जगभर गाजलेले प्रसिद्ध शोध खरंतर दुसऱ्यांनीच लावले होते…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपण ज्यांच्या नावाने शोध ओळखतो ते त्यांचे नसले, चोरलेले असले तर आपल्या मनात त्या “शास्त्रज्ञां”बद्दल वेगळी प्रतिमा निर्माण होते. येथे चोरणे याचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे.

शोध मुळात एका व्यक्तीचा म्हणजे वस्तुतः संकल्पना एका व्यक्तीची आणि त्याचं पेटंट मात्र दुसरी व्यक्ती घेते.

मग तो शोध दुसऱ्या व्यक्तीच्या नावे नोंदवला जातो. यात प्रसारमाध्यमांचाही तितकाच महत्त्वाचा भाग आहे.

तर बघूया असेच काही प्रसिद्ध शोध –

१. टेलिफोन 

अलेक्सान्डर ग्रॅहम बेल ह्याने १८७६ साली टेलिफोनचा शोध लावला हे आपणा सर्वांस माहित आहे. पण २००२ साली अमेरिकेच्या काँग्रेसने टेलिफोनचा खरा जनक एक गरीब इटालियन शास्त्रज्ञ अँटोनियो मेउच्ची आहे असं घोषित केलं.

बेलने १८७६ साली पेटंट घेण्याअगोदर १६ वर्षांपूर्वी मेउच्चीने त्याच्या “टेलेट्रोफोनो”चं डेमॉन्स्ट्रेशन हे इटालियन अमेरिकन प्रेसला न्यूयॉर्क येथे दिलं होतं.

मेउच्चीने १८७२ साली त्याचा हा शोध वेस्टर्न युनिअन टेलेग्राफ कंपनीला पाठवला. पण त्याचा हा शोध बाजारात आणण्यात आला नाही. दोन वर्षांनंतर त्याने माझा “प्रोटोटाईप” परत द्या अशी मागणी वेस्टर्न युनिअनकडे केली, तेव्हा तो हरवला म्हणून युनिअनने सांगितलं.

 

alexander-graham-bell-inmarathi
Bio.com

बेल हा मेउच्चीसोबत एकाच लॅबमध्ये काम करत असे. त्याने पेटंट घेऊन वेस्टर्न युनिअनसोबत सौदा केला. मेउच्चीने बेलवर केस ठोकली, ती केस तो जिंकलासुद्धा! त्यानंतर काही काळातच त्याचा मृत्यू झाला.

२. रेडिओ –

ग्लिएमो मार्कोनी ( Gugliemo Marconi) ह्यास लांब पल्ल्याच्या रेडिओ ट्रान्समिशनसाठी नोबेल पारितोषिक देण्यात आलं. पण त्याने हे निकोला टेस्ला ह्या अत्यंत प्रसिद्ध शास्त्रज्ञाच्या नावे असलेल्या अनेक पेटंट्सना चोरून केलं.

मार्कोनीने इंग्लंडमध्ये प्रात्यक्षिक करून दाखवलं. मार्कोनीने रेडिओचे पेटंट मिळावे म्हणून सलग तीन वर्ष अर्ज केले. पण प्रत्येकवेळेस ते नाकारण्यात आले कारण असे सतरा पेटंट्स टेस्लाच्या नावाने होते.

 

tesla_head-inmarathi
bigthink.com

मार्कोनीने त्याची प्रात्यक्षिकं सुरु ठेवली आणि त्याला अमेरिकेतल्या मोठ्या गुंतवणूकदारांकडून पाठबळ मिळू लागलं.

१९०४ साली अमेरिकेच्या पेटंट कार्यालयाने मागचे निर्णय बदलून मार्कोनीला पेटंट देऊन टाकलं. १९४३मध्ये म्हणजेच टेस्लाच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी सुप्रीम कोर्टाने टेस्लाच्या बाजूच्या समर्थनार्थ निर्णय दिला.

 

३. लेझर –

गॉर्डन गुल्ड (Gorden Gould) याने तब्बल तीस वर्षे कोर्टात पेटंटची लढाई लढवल्यानंतर लेझरचा शोध आपल्या नावावर केला. कोलंबिया विद्यापीठात असतांना गुल्ड याने लेझर कसा तयार करता येऊ शकतो हे तेथील भौतिकशास्त्राचे प्रोफेसर चार्ल्स एच.टाऊन्स यांना सांगितले.

 

gorden-gould-inmarathi
thehindu.com

त्याने “लेझर” ही संज्ञा आणि त्यासंबंधीच्या सर्व संकल्पना एका वहीत लिहून ठेवल्या, ती वही कायदेशीररीत्या सुरक्षित ठेवली. परंतु, दोनच वर्षांनी म्हणजेच १९५९ साली टाऊन्स यांनी लेझरचे पेटंट मिळवले.

१९८८ साली गुल्ड कोर्टातली लढाई जिंकला आणि लेझर बनवणाऱ्या प्रत्येकाने त्यास रॉयल्टी द्यावी असं ठरलं.

४. एनीवे अप कप (The Anyway Up Cup) –

मॅंडी हेबर्मन ह्या एका हौशी बाईने हा एक नवीन प्रकारचा कप शोधून काढलाय ज्यात वाल्व आहे, जेणेकरून लहान मुलाकडून कपमधील पदार्थ सांडणार नाही अशा पद्धतीने त्याची रचना केली गेलीये.

मॅंडीने तिचं हे इन्व्हेंशन मोठ्या कंपन्यांना दाखवलं. त्यापैकी जॅकेल इंटरनॅशनल ह्या कंपनीने तिचं हे इन्व्हेंशन चोरलं आणि ते टॉमी टिप्पि कप ह्या नावाने बाजारात आणलं.

 

mandy-inmarathi
twitter.com

कोर्टात मॅंडी जिंकली आणि तिला नुकसान भरपाई देण्यात आली. मॅंडी आता १० मिलियन कप एका वर्षाला विकतेय! (एक मिलियन = १० लक्ष)

५. टेलिस्कोप –

गॅलिलिओचे हे अत्यंत प्रसिद्ध असलेले इन्व्हेंशन! पण त्याचा शोध गॅलिलिओने लावलेला नाही! होय, तुम्ही बरोबर वाचलत!

टेलिस्कोपच्या शोधाच्या पेटंटसाठी १६०८ मध्ये सर्वात आधी अर्ज करणारा व्यक्ती म्हणजे नेदरलँडचा चष्मे बनवणारा हांस लिपरशे (Hans Lippershey).

 

hans-lippershey-inmarathi
storiesofworld.com

पण त्याच्या पेटंटला मान्यता मिळाली नाही. एका वर्षानंतर ह्या शोधाची बातमी इटलीत पसरली आणि गॅलिलिओने त्याची कॉपी तयार केली.

त्याने लिपरशेच्या टेलिस्कोपमध्ये बऱ्याच सुधारणा केल्या आणि शुक्र ग्रहाचे भ्रमण कसे होते त्याचा पद्धतशीरपणे अभ्यास केला.

६. क्विक रिलिज सॉकेट रेंच (The Quick Release Socket Wrench) –

पीटर रॉबर्ट्सने तो अठरा वर्षांचा असताना क्विक रिलीज सॉकेट रेंचचा पेटंट मिळवला. त्यावेळी तो एका डिपार्टमेंटल स्टोरमध्ये काम करीत असे. सेअर्स नावाच्या कंपनीने फक्त १०००० डॉलर्स देऊन त्याच्याकडून हे विकत घेतले आणि त्याला सांगितले की ह्याचा खप विशेष होणार नाही.

परंतु नंतर रॉबर्टसच्या लक्षात आले की बाजारात त्याच्या शोधाचा खप भरपूर होतोय.

 

peter-robert-inmarathi
WordPress.com

सेअर्सने २६ मिलियन रेंच फक्त एका वर्षातच विकले होते आणि त्यात त्यांना ४४ मिलियन डॉलर्स इतका नफा झाला होता. तब्बल पंचवीस वर्षांच्या कायदेशीर लढाईत रॉबर्टस्ने ८.२ मिलियन डॉलर्सवर समाधान मानून सेअर्सबरोबर सेट्लमेन्ट केली.

७. मोनोपॉली गेम –

चार्ल्स डरो हा एक गेम डिझायनर अशी पहिली व्यक्ती आहे जो लखपती झाला! त्याने मोनोपॉली नावाचा गेम पार्कर ब्रदर्स ह्या कंपनीला १९३५ साली विकला. पण १९०४साली लिझी मॅगीने ह्याचं पेटंट घेऊन ठेवलं होतं.

 

darrow-from-assocpress
abcnews.com

त्या गेमचं नाव होतं “लँडलॉर्ड्स गेम”. पार्कर ब्रदर्स कंपनीने मॅगीला फक्त ५०० डॉलर्स देऊन केस सेटल करून घेतली आणि चार्ल्स डरॉं हा एक प्रतिभाशाली व्यक्ती म्हणून ओळखला जाऊ लागला. दुर्दैव!

चित्र – लँडलॉर्ड्स गेम

८. इंटरमिटंट विंडशिल्ड वायपर्स (Intermittant Windshield Wipers)-

रॉबर्ट कर्न्सचा हा शोध जेव्हा तीन मोठ्या कंपन्यांनी चोरला, तेव्हा कर्न्सचा जॉब तर गेलाच पण त्याचं मानसिक स्वास्थ्यसुद्धा बिघडलं आणि घटस्फोट देण्याची वेळ त्याच्यावर आली.

 

wipers-inmarathi
youtube.com

फोर्ड, जनरल मोटर्स, क्रायझलर ह्या त्या तीन कंपन्या होय. जवळजवळ तीस पेटंट त्याच्या नावावर असतांना ह्या कंपन्यांनी त्याचा हा शोध वापरण्यास सुरुवात केली.

वीस वर्षे कोर्टात ह्या कंपन्यांविरुद्ध लढल्यानंतर फोर्ड आणि क्रायझलर कंपन्यांनी त्याला १० मिलियन डॉलर्स नुकसान भरपाई दिली, पण त्याला शोध त्याच्या नावे करता आला नाही!

९. ब्राउन पेपर बॅग मशीन –

मार्गारेट नाईट ह्या एकोणिसाव्या शतकातल्या एक प्रसिद्ध इन्व्हेन्टर होत्या. एका पेपर बॅग प्लांटमध्ये काम करत असतांना त्यांना सुचलं की जर पेपर बॅग ला फ्लॅट बॉटम असेल तर त्यात अधिक सामान ठेवता येईल.

 

margaret-night-inmarathi
timeline.com

एवढच नाही तर तिने असं यंत्र तयार केलं ज्यात अशी पेपर बॅग पूर्ण तयार होऊन बाहेर येईल. सुरुवातीला तिने फक्त लाकडी यंत्र तयार केलं.

चार्ल्स अनान नावाच्या व्यक्तीने ते चोरलं आणि त्याचं पेटंट करून घेतलं. नाईटने कोर्टात हे सिद्ध केलं कि तीच खरी शोधकर्ती होती!

१०. लाईट बल्ब –

लाईट बल्बचा शोध थॉमस अल्वा एडिसनने लावला असं आपणा सर्वांना ठाऊक आहे. पण त्याने हा शोध ब्रिटिश शास्त्रज्ञ जोसेफ स्वान ह्याच्या मुळच्या संकल्पनेवर काम करून लावला आहे.

एडिसनने प्रसारमाध्यमांना आपल्या हाताशी घेऊन असा प्रचार सुरु केला की ह्याचा खरा संशोधनकर्ता तो स्वतः आहे.

 

josephswan-inmarathi
gatesheadhistory.com

त्याने अमेरिकन पेटंटसुद्धा घेऊन टाकलं, पण स्वानने एका वर्षाआधीच बल्बचा शोध लावला होता.

कोर्टात उगाच भांडण नको म्हणून एडिसनने स्वानला पटवून एक लाईट बल्ब तयार करणारी कंपनी इंग्लंडमध्ये काढली. स्वानने एडिसनला अमेरिकेत त्याच्या नावावर बल्ब विकण्याची परवानगी दिली आणि लाईट बल्ब हा शोध एडिसनच्या नावावर झाला.

पेटंट कायदा, प्रसार माध्यमे, मोठमोठे गुंतवणुकदार हे कसे माहिती आणि तंत्रज्ञान manipulate करू शकतात हेच ह्या १० शोधांवरून आणि त्यांच्या मागच्या interesting stories वरून आपल्याला शिकायला मिळतं!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?