दुर्मिळ आठवणींचा खजिना सांभाळून ठेवायचा असेल तर हे अॅप वापरण्याखेरिज तुमच्याकडे पर्याय नाही!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
सध्या लॉकडाऊनमध्ये रिकामा वेळ घालवण्यासाठी प्रत्येकजण आपआपल्यापरिने प्रयत्न करतोय.
मात्र अनेक घरात फोटोंचे जुने अल्बम पाहण्याचे चित्र सारखंच दिसून येतंय.
घरातल्या सगळ्यांबरोबर एकत्र फोटो पाहत, थट्टा मस्करी करत, जुन्या आठवणींत रमण्याचा आनंद तुम्हीसुद्धा घेत असाल ना?
जीवनातील आनंदी क्षण फोटोंमध्ये कैद करून ठेवण्याची संकल्पनाच किती सुरेख आहे ना! सध्या मोबाईल आणि कॅमेऱ्याच डिजिटल युग आहे त्यामुळे फोटो वर्षानुवर्षे जसे आहेत तसेच राहतात, फक्त डिलीट झाले नाही म्हणजे मिळवलं!
पण अगदी १०-१२ वर्षांपूर्वी देखील आपण फोटोजच्या कॉपीज काढून ठेवायचो. तेव्हा मोबाईल कॅमेरा वैगरे जास्त प्रचलित नव्हता.
आजही या फोटोंकडे पाहताच त्या जुन्या अमुल्य आठवणींना उजाळा मिळतो. म्हणूनच हा फोटोंच्या रूपातील अमुल्य ठेवा आजही प्रत्येकाने सांभाळून ठेवलेला असेल.
पण कधीकधी हे फोटो अधिक काळ पडून राहिल्यास जुने होतात किंवा खराब होतात. मग अश्यावेळेस पुन्हा डिजिटल माध्यमांचा आधार घ्यावा लागतो आणि ते जुने-खराब फोटो डिजिटल करून घ्यावे लागतात. यात खर्च देखील बराच होतो.
अश्याच सुखद आठवणींचे आणखी काही जुने किंवा खराब फोटो तुम्ही अजूनही जपून ठेवले असतील, तर बॉस तुम्ही अगदी योग्य काम केलं आहे, कारण आता या जुन्या आणि खराब फोटोंना डिजिटल करण्याचा नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे आणि तो देखील अगदी मोफत..!
गुगलने त्याचं Google Photoscan App लॉन्च केलं आहे. या app च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जुन्या किंवा खराब फोटोंना स्कॅन करून अगदी मिनिटांच्या आता या फोटोंना डिजिटल रूप देऊ शकता.
आणि मग हे फोटो अगदी वर्षानुवर्षे जसे आहेत तसेच राहतील.
अर्थात या प्रक्रिया अत्यंत जलद गतीने आणि मोफत होते.
Google Photoscan App वापरण्यासाठी अगदी सोपे आहे.
तुम्ही हवे ते पर्याय निवडून तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या फोटोला नवीन डिजिटल रूप देऊ शकता.
अश्याप्रकारचे अनेक app तुम्हाला प्लेस्टोरवर मिळतील परंतु गुगलने नवीन features add करत अगदी सुधारित app आपल्यासमोर सादर केलं आहे.
या app मध्ये flash चा पर्याय देण्यात आला आहे. म्हणजे जर कमी प्रकाश असेल तरी देखील flash च्या सहाय्याने उत्तम qualityचा फोटो स्कॅन होईल.
यात डिजिटल केलेले फोटो तुम्ही थेट गुगल ड्राईव्ह मध्ये save करू शकता, म्हणजे जरी फोनमधून डिलीट झाले तरी तुम्हाला ते परत मिळवता येतील.
सध्या वेळेचा सदुपयोग कसा करावा हा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. त्यामुळे हा सर्वोत्तम उपयोग म्हणता येईल.
फोटोतल्या आठवणी अनेकदा पुन्हा मिळवता येणार नाही, त्यातले क्षण, व्यक्ती, सोहळे यांचा अनुभव कदाचित पुन्हा घेता येणार नाही.
मात्र त्या आठवणी जपून ठेवणं हे तरी आपल्या हातात आहे.
हल्ली प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन्स आहेत, सोशल मिडीयात जास्तीत जास्त वेळ घालवण्यापेक्षा थोडा वेळ स्वतःसाठी, किंबहुना भविष्यात या आठवणी जपण्यासाठी हा थोडा तरी वेळ काढाच.
तर मग वाट कसली बघतायं? प्लेस्टोर वर जा, download करा Google Photoscan App आणि तुमच्या जुन्या-खराब फोटोंना डिजिटल रूप द्या!!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.