डीजीपी साहेबांचा अफलातून प्रयोग- कैद्यांच्या हातच्या चवदार जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी रांग लागते!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
तुम्ही कधी तुरुंगातील जेवणाचा आस्वाद घेतला आहे का? आता तुम्ही म्हणाल की, त्यासाठी तर तुरुंगात जावं लागेल, नाही का.. पण त्यासाठी तुम्हाला तुरुंगात नाही तर शिमला येथे जाण्याची गरज आहे.
शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज जवळ तुरुंगातील जेवण मिळतं आणि ह्या जेवणासाठी लोक तासंतास रांगेत उभे देखील राहतात.
पण हे जेवण तुरुंगातील कैदींनी बनविले आहे हे अनेकांना माहितच नाही. एवढचं नाही तर जेवण वाटणारे लोक देखील तुरुंगातील कैदीच आहेत. तुरुंगात शिक्षा भोगत असलेले भूपिंदर सिंह केवळ २५ रुपयांत येथे मोबाईल वॅनमधून कडी, भात आणि राजमा विकतात.
ते म्हणतात की, ‘जेव्हा लोकांना हे कळतं की, ते कैदी आहेत तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न हाच असतो की त्यांना तुरुंगातून सोडलेच कसे?’
भूपिंदर सिंह ह्यांना २००० साली त्याच्या पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ते हिमाचल प्रदेश येथील त्या १५० कैदींपैकी एक आहेत जे तिथल्या ओपन तुरुंग व्यवस्थेचे भाग आहेत. हे कैदी दिवसा तुरुंगातून बाहेर जातात आणि पैसे कमावतात. त्यानंतर रात्री तुरुंगात परततात.
हे कैदी फॅक्ट्रीमध्ये देखील काम करतात. तसेच शिकवणी देणे आणि मोबाईल लंच वॅन चालवण्याचं काम करतात. ‘द बुक कॅफे़’ नावाचा हा कॅफे़ मागील वर्षी उघडण्यात आला. आणि आता येथील जेवण हे तिथल्या लोकांचं आवडतं जेवण झालं आहे. ह्या कॅफे़मध्ये मोठ्या प्रमाणत लोक चहा-कॉफी घेण्यासाठी येतात.
ह्या कॅफे़ची जबाबदारी प्रामुख्याने काहीच लोकांजवळ आहे आणि इतरांच्या मदतीने ते कॅफे चालवत आहेत.
हिमाचल प्रदेशाचे डीजीपी सोमेश गोयल ह्याबाबत बोलताना सांगतात की,
‘’खाली दिमाग शैतान का घर होता है”
ही म्हण तुरुंगांच्या भिंतींवर देखील लिहिलेली आहे. आणि ह्यानेच त्यांच्या मनात ह्या ओपन तुरुंगाची आयडिया आली. त्यांच्या मते,
‘एका गुन्हेगाराला कैदेत ठेवणे हे न्याय व्यवस्थेचा एक महत्वपूर्ण भाग आहे. पण आपल्याला आपल्या गुन्हेगारांसोबत मानवी वागणूक करायला हवी. त्यांना तुरुंगातून बाहेर गेल्यावर स्वतःच्या पोटापाण्याची व्यवस्था करता येईल एवढं सक्षम बनवायला हवं.’
डीजीपी सोमेश गोयल ह्यांचा हा विचार खरंच कौतुकास्पद आहे. आणि ह्याचा अवलंब करण्याचा प्रयत्न आपल्या देशातील प्रत्येक तुरुंगातील कैद्यांसाठी व्हायला हवा.
स्त्रोत : टाईम्स ऑफ इंडिया
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.