' चीनसारखी स्वस्त प्रॉडक्टस भारतात का बनत नाहीत? हे सत्य तुमचे डोळे उघडेल! – InMarathi

चीनसारखी स्वस्त प्रॉडक्टस भारतात का बनत नाहीत? हे सत्य तुमचे डोळे उघडेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोरोना महामारीनंतर केवळ भारतानेच नाही तर साऱ्या जगाने चीनच्या विरोधात पावलं उचलली आहेत. भारताने तर मेक इन इंडिया ही मोहीम खूप आधीपासूनच राबवायला सुरुवात केली होती. आता या मोहिमेला थोडा वेग मिळतोय.

नाही म्हंटलं तरी अजूनसुद्धा आपल्याकडे चीनी वस्तूंचा खप कमी होताना दिसत नाहीये, लोकांना चीनी वस्तु घ्यायच्या नाही हे उमजलं आहे पण त्या वस्तूला पर्यायी वस्तु भारतात उपलब्ध नसल्याने बरीच लोकं पुन्हा चीनी मालाकडे वळायला लागली आहेत!

जर भारतीय बाजारपेठांवर नजर टाकली आणि आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तूंचा ब्रँड ध्यानात घेतला तर लक्षात येईल की भारतीय बाजारपेठेत चीनी उत्पादनांचे वर्चस्व जास्त आहे.

हे ही वाचा –

===

 

आपल्या घरात हातातील मोबाईल पासून ते घड्याळात घालण्याच्या सेल पर्यंत, रोजच्या वापरातले कॉफीचे मग असतील किंवा घरातील पंखे, फ्रीज, टीव्ही सगळीकडे घरात चीन राज्य करत असलेला दिसेल.

चीनी वस्तूवर बहिष्कार टाका अशी ओरड ठराविक दिवसांनी होत असते. चीनी वस्तूंनी आपल्या घराचा आणि देशाच्या बाजारपेठांचा कब्जा मिळवलाय ही गोष्ट खरी आहे.

 

ban china inmarati

 

याचं कारण देखील आपणास माहीत आहे. चीनी बनावटीच्या वस्तू भारतीय बनावटीच्या वस्तूपेक्षा खूप स्वस्त पडतात म्हणून आपण त्या घेतो. मग प्रश्न पडतो की चीनला इतक्या स्वस्त दरात वस्तू तयार करणं कसं परवडतं?

आणि मग चीनसारखा देश जर स्वस्त दरात वस्तू बनवत असेल तर मग भारतला तशा स्वस्त वस्तू आणि सेवा बनवायला काय जातंय?

 

make in india

 

ही प्रक्रिया दिसते तितकी सोपी नाही. पहिल्यांदा हे समजून घ्या की चीनला इतक्या स्वस्त दरात वस्तू तयार करणं कस शक्य होतं?

याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे चीनची लेबर कॉस्ट किंवा मजुरी दर हा भरपूर कमी आहे. याचा अर्थ चीनमध्ये कामे करण्यासाठी मनुष्यबळ संख्येने जास्त आहे आणि ते चटकन वेळेत उपलब्ध देखील होते.

मनुष्यबळ जास्त असल्याने त्यांना द्यावी लागणारी मजुरी तुलनेने कमी राहते. पण मग प्रश्न असा निर्माण होतो की चीनपेक्षा स्वस्त मजुरी श्रीलंका आणि व्हीएतनामसारखे देश देतात पण त्यांच्या देशात बनणाऱ्या वस्तू चीनच्या तुलनेत कुठेही स्वस्त नसतात.

हे ही वाचा –

===

 

chinese guys inmarathi

 

कारण फक्त लेबर कॉस्ट कमी असून चालत नाही. ती एफिशिअंट किंवा कार्यक्षम देखील असावी लागते.

चीनकडे मजुरी दर स्वस्त आहे आणि चीनचा प्रत्येक मजूर किंवा नोकर हा तितकाच कार्यक्षम आणि तुल्यबळ असतो. त्यामुळे कमी वेळेत उत्पादन क्षमता वाढवणे चीनला शक्य होते.

हे ही वाचा चायनीज मालावर, भारत सरळ बंदी का घालत नाही? डोळे उघडणारं सत्य

दुसरी महत्वाची गोष्ट येते कमी वेळेत जास्त उत्पादन क्षमता. यामध्ये चीनने जोरदार मुसंडी घेत अगदी अमेरिकेलाही मागे टाकले आहे.

१९९० ते २००० या काळाचा विचार केला तर चीनची उत्पादनक्षमता २.८% इतकी होती त्या तुलनेत अमेरिका ०.५% आणि जपानसारखा देश फक्त ०.२% उत्पादन करू शकला होता.

यालाच जगाने ड्रॅगनझेप अशा शब्दात संबोधले होते. आता ही उत्पादन क्षमता जास्त असण्याचं देखील कारण आहे.

 

chinese workers 1

 

चीनमध्ये विपुल साधनसंपत्ती आहे. याला नशीब समजा किंवा भौगोलिक वरदान एखादी वस्तू तयार करण्यासाठी लागणारा जो कच्चा माल असतो तो चीनला कुठूनही बाहेरून मागवावा लागत नाही. तो देशांतर्गतच विपुल प्रमाणात उपलब्ध असतो.

अर्थशास्त्रात competitive pricing नावाची संज्ञा असते. जागतिक बाजारपेठेत आपल्या वस्तू जास्त प्रमाणत विकल्या जाव्यात म्हणून अनेक देश वस्तूंच्या किमती कमी करतात.

एका विशिष्ट पातळीपर्यंत नफ्याचे प्रमाण कमी करून ही किंमत कमी करता येते मात्र वस्तू बनवण्यासाठी आलेला संपूर्ण खर्चाच्या खाली ही किंमत घेता येत नाही.

चीनला competitive pricing ची कसलीही भीती नाही. याचं कारण असं की चीनमध्ये कोणतीही नवीन वस्तू किंवा नवीन वस्तू बनवण्यासाठी संशोधन केलं जात नाही.

जगभरात ज्या वस्तू बनतील त्या वस्तू जशाच्या तशा कॉपी करून चीनमध्ये बनवल्या जातात. याचा अर्थ रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर चीन शून्य खर्च करते.

आयडीया आणि कल्पना आयते उचलते आणि त्यापासून बनावट वस्तू तयार करते ज्याची किंमत मुळच्या ओरिजिनल वस्तूच्या तुलनेत कमी असते.

 

chinese-products-marathipizza11

 

याहीपुढे आता बनवलेली बनावट वस्तू जागतिक बाजारपेठेत स्वस्त विकायची असते.

म्हणून प्रचंड प्रमाणात त्या वस्तुचं उत्पादन केलं जातं आणि त्या वस्तू शेजारच्या देशात dumping strategy वापरून अक्षरश: dump केल्या जातात. dumping strategy म्हणजे चीनी व्यापारी कमीत कमी किमतीत आपला जास्तीत जास्त माल दुसऱ्या देशाला पुरवतो.

परिणामी त्या देशातील वस्तूना उठाव मिळत नाही आणि चीनी माल आपल्या घरात विराजमान होतो.

 

china-products-inmarathi

 

आता इतकं सगळ जर होत असेल तर चीनी वस्तूंवर बंदी शक्य आहे का तर याचही उत्तर नकारार्थी द्यावं लागेल. भारतात चीनी वस्तूंचा वाटा आहे ०.५% म्हणजे चीन चा निर्यात व्यापार जर १००० करोड असेल तर त्यातील भारताच्या बाजारपेठेचा हिस्सा केवळ ५० करोडचा आहे.

त्यामुळे भारताने चीन बरोबरचा व्यापार बंद केला तर चीनचं काहीही बिघडत नाही.

 

flags inmarathi

 

आता भारत चीनला जवळजवळ ०.१% इतका माल निर्यात करतो.

ही संख्या गणित समजवण्यासाठी आपण ५ करोड इतकी धरू. मुळात भारताने व्यापार बंद केला तर नुकसान भारताला होवू शकेल. चीनला फरक पडणार नाही.

शिवाय आंतरराष्ट्रीय व्यापार कायद्यानुसार सरसकट व्यापार बंदी कुठल्याच देशाला परवडणारी नसते. त्यावर बरेच इतर आर्थिक, सामाजिक, राजकीय हितसंबध अवलंबून असतात त्यामुळे सध्या तरी आपल्या घरात येणाऱ्या चीनी वस्तूंना आपण अडवू शकत नाही.

याउलट भारताने परकीय गुंतवणुकीसाठीसाठी दारे खुली करून आपल्या उद्योग धंद्यावरील निर्बंध कमी केले पाहिजेत.

शेती आणि उद्योग क्षेत्रात जे अस्ताव्यस्त आणि विस्कळीत मजुरी आहे तिला एकत्र आणण्याची आपल्याला गरज आहे. labour efficiency वाढवली, उद्योगधंद्यात काम करणाऱ्या लोकांचे कौशल्य वाढवले आणि आपला निर्यात व्यापार वाढवण्यावर लक्ष दिले तर भारत या चीनी बाजारपेठेचा सामना यशस्वीपणे करू शकतो यात शंका नाही.

===

हे ही वाचा भारतीय सैन्य काय चीज आहे याची पुसटशी कल्पना – लडाखमध्ये जे काही सैन्य करतंय त्यावरून!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?