' मिलिटरीच्या गाड्या आणि सामान्य व्यक्तींच्या गाड्या या नंबरप्लेटमध्ये हा आहे फरक! – InMarathi

मिलिटरीच्या गाड्या आणि सामान्य व्यक्तींच्या गाड्या या नंबरप्लेटमध्ये हा आहे फरक!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतात प्रत्येक गाडीला RTO ऑफिसमधून एक वाहन क्रमांक दिला जातो. तो वाहन क्रमांक म्हणजे त्या गाडीची ओळख!

त्या वाहन क्रमांकावरून मग गाडीचा मालक कोण? गाडी कधी घेतली? अशाप्रकारे गाडीची सर्व माहिती उपलब्ध होते. प्रत्येक राज्याचे RTO ऑफिस त्यांच्या निर्धारित कोड आणि क्रमांकानुसार आपल्या राज्यातील गाड्यांना क्रमांक पुरवते.

 

rto inmarathi

 

Central Motor Vehicle Rules  नुसार गाडीच्या मालकाला RTO ऑफिसकडून मिळालेला क्रमांक गाडीच्या पुढल्या आणि मागच्या बाजूला दिसेल अश्या स्थितीमध्ये लावणे बंधनकारक असते.

या नंबर प्लेट देखील विविध रंगाच्या असतात. त्यावरून त्या गाडीचा प्रकार ओळखला जातो.

 

indian number plates inmarathi

 

पांढऱ्या नंबर प्लेटच्या गाड्या या खाजगी/वैयक्तिक असतात. पिवळ्या नंबर प्लेटच्या गाड्या पब्लिक वाहन (बस, रिक्षा टॅक्सी) असतात. काळ्या नंबर प्लेट हे दर्शवते की त्या गाड्या व्यावसायिक (commercial) वापरासाठी आहेत.

निळ्या रंगाच्या नंबर प्लेटवर असणारी पांढरी रेषा हे दर्शवते की ती गाडी कोणत्या तरी देशाच्या वकिलाची आहे.

जसं या नंबर प्लेटमध्ये विविध प्रकार असतात तसेच, त्या नंबरमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात, व्हीआयपी नंबरसाठी तर आरटीओमध्ये वेगवेगळे रेट्स सुद्धा लागतात!

खासकरून मुंबई पुणे नाशिक इथल्या गाड्यांचे नंबर्स पाहून तर तुम्ही थक्क व्हाल, नंबर्समध्ये त्या गाडीच्या मालकाचे नाव किंवा एखाद्या देवाचे नाव हे असले प्रकार महाराष्ट्रात भरपूर पाहायला मिळतात!

 

indian number plate inmarathi

 

शिवाय कित्येक नंबर प्लेट्सवर तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा सुद्धा पाहायला मिळते, जे अयोग्य आहे. पण लोकांच्या हौसेला मोल नाही हे सुद्धा तितकंच सत्य आहे!

आपल्या लोकांना हे नंबर्सचं आकर्षण खूप असतं. त्यामागची प्रत्येकाची कारणं वेगळी असतात, काहींना त्या नंबरमध्ये ऍस्ट्रोलॉजी किंवा संख्याशास्त्र दिसतं तर काहींना नुसता रुबाब दाखवायचा असतो!

 

shivaji maharaj number plate inmarathi

 

हे झालं या नेहमीच्या रोजच्या गाड्यांबद्दल. पण या सर्व गोष्टी आणि नियम मिलिटरी गाड्यांना मात्र लागू होत नाही. असं का?? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

 

military-cars-number-plates-marathipizza03

हे ही वाचा – भारतीय सैन्य महागड्या गाड्या न वापरता ‘जिप्सी’च वापरतं! वाचा अभिमानास्पद कारण..

मिलिटरी गाड्या या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत रजिस्टर असतात.

या गाड्यांवर एक वरच्या बाजूला दाखवलेला बाण असतो आणि बाणाच्या पुढे ज्या वर्षी गाडी बनवली गेली किंवा आयात (Import) केली गेली त्या वर्षाचे शेवटचे दोन क्रमांक असतात. उदा. २००३ हे वर्ष असेल तर (03)!

या दोन क्रमांकाच्या पुढे असतो बेस कोड, त्यापुढे असतो वाहन क्रमांक आणि त्यापुढे असतो गाडीचा दर्जा..!

मिलिटरी गाड्यांच्या नंबर प्लेटवर बाण यासाठी दाखवतात की समजा चुकून नंबर प्लेट उलटी लागली तर त्या बाणामुळे ते लक्षात येते. हा बाण तुम्हाला संरक्षण मंत्रालयाच्या फक्त गाड्यांवरच नाही तर प्रत्येक मालमत्तेवर दिसेल.

 

military-cars-number-plates-marathipizza01

 

मिलिटरी गाड्यांच्या नंबर प्लेट हिरव्या किंवा काळ्या रंगाच्या असतात. संरक्षण खात्यातले अधिकारी केवळ अधिकृत कामासाठीच या गाड्यांचा वापर करू शकतात.

मिलिटरी गाड्यांना सिग्नल सुटेपर्यंत वाट पाहण्याची गरज नसते. म्हणजेच या गाड्यांना सिग्नल तोडायची मुभा असते.

फक्त सिग्नलचा नियमच नाही तर वाहनासंबंधीचे अनेक नियम जे तुम्ही आम्ही सर्वसामान्य पाळतो ते मिलिटरी वाहनांना लागू नाहीत.

तसेच या मिलिटरी गाड्यांवर तुम्ही स्टार्स देखील पाहिले असतील. हे स्टार्स अधिकाऱ्याच्या हुद्द्यानुसार त्याच्या गाडीवर लावले जातात.

जर लष्करातील दलप्रमुख (Chief Of Staff) अधिकारी असेल तर गाडीवर लाल रंगाची दुसरी प्लेट लावलेली असते ज्यावर चार स्टार्स असतात.

जर वायुदलातील कोणी दलप्रमुख अधिकारी असेल तर त्याच्या गाडीवर आकाशी रंगाची दुसरी प्लेट लावलेली असते ज्यावर चार स्टार्स असतात.

त्याचप्रकारे जर नौदलातील कोणी दलप्रमुख अधिकारी असेल तर गाडीवर नेव्ही ब्ल्यू रंगाची दुसरी प्लेट लावलेली असते ज्यावर चार स्टार्स असतात.

 

military-cars-number-plates-marathipizza04

 

या अधिकाऱ्यांच्या वरच्या पदावर असणारे अधिकारी म्हणजे लष्करप्रमुख, नौदलप्रमुख किंवा हवाईदल प्रमुख असतील तर त्यांच्या गाड्यांवर पाच स्टार्स असतात.

हे स्टार्स असं दर्शवतात की हे अधिकारी त्यांचे युनिफॉर्म निवृत्त झाल्यानंतरही मरेपर्यंत घालू शकतात.

 

army number plate inmarathi

 

याव्यतिरिक्त इतर अधिकृत गाड्यांबद्दल सांगायचे झाल्यास राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना सरकार कडून देण्यात येणाऱ्या गाड्यांवर  सोनेरी अशोकस्तंभ असतो.

या गाड्यांना वाहन क्रमांक नसतो. ही गोष्ट बहुधा सगळ्यांना माहित नसेल.

 

military-cars-number-plates-marathipizza06

 

अश्या या सरकारी गाड्या आणि अशी या सरकारी गाड्यांची शान!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?