“LED” वीजबचतीमध्ये एक नंबर! पण त्याचे घातक परिणाम तुम्हाला माहीत आहेत का?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मागच्या काही वर्षात भारतात LED लाईट्सचा वापर करण्यात वाढ झाली आहे. LED लाईट्स हे अधिक प्रकाशमान करणारे लाईट्स असतात. तसेच LED लाईट्स कमी ऊर्जा खर्च करतात. त्यामुळे विजेची बचत होते आणि वीज बिल कमी येतं.
LED लाईट्सच्या आकर्षक वापरामुळे त्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
रस्त्याचा कडेवरच्या पूर्वीच्या सोडीयम लाईट्सच्या जागी LED लाईट्स लावण्याचं काम सरकारने हाती घेतलं आहे. गाड्यांचा हेडलाईटपासून डेकोरेशनच्या लायटिंगपर्यंत LED लाईट्स सर्व प्रकारच्या फॉरमॅट मध्ये उपलब्ध आहेत.
हे लाईट आकाशी रंग अथवा विविध रंगाचा प्रकाश टाकण्यासाठी व कॉन्ट्रास्ट निर्माण करण्यासाठी वापरले जातात.
अगदी टीव्हीच्या ट्युबमध्ये, मोबाईल स्क्रीनमध्ये LED लाईट्स असतात. मागे शासनाने लोकांना स्वस्त दरात LED बल्ब उपलब्ध करून दिले होते.
परंतु एका संशोधनातून LED लाईट्समुळे आरोग्याला धोका निर्माण होत असतो असं सिद्ध झालं आहे. यामुळे शास्त्रज्ञ चिंतातुर झाले आहेत.
वर्ल्ड जनरल ऑफ बायोलॉजीकल सायकाट्रीने प्रकाशित केलेल्या शोध निबंधात एका सायकाट्रिक्सच्या गटाने LED लाईट्सचा मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामाबद्दल माहिती दिली आहे व पुढे उदभवू पाहणाऱ्या धोक्याची सूचना दिली आहे.
मोबाईल मधल्या ब्लु लाईटमुळे व त्याचा डोळ्यावर होणाऱ्या परिणामामुळे झोपेचा, डोळ्यावभवतीच्या काळ्या वर्तुळांचा धोका उदभवू शकतो. खासकरून निळा रंग याला जास्त कारणीभूत असतो.
–
हे ही वाचा – चिडचिड, उदासीनता दूर ठेवण्यासाठी ही एक सवय लावून घ्या आणि निरोगी आयुष्य जगा
–
शोध प्रबंध लिहणाऱ्या वैज्ञानिकांनी दिलेल्या माहिती नुसार मोबाईल मधल्या लाईटशी डोळ्यांचा येणाऱ्या संबंधा मुळे डोळ्यात अनेक बायपोलार डिसऑर्डर उदभवतात, तसेच वेगवेगळ्या नेत्रविकरांची लक्षणेही दिसु लागतात.
त्यांनी केलेल्या संशोधनाचा अजून उल्लेख करत त्यांनी सांगितलं आहे की अत्यंत जास्त प्रकाश असेल तर डिप्रेशन सारखी समस्या सोडवण्यासाठी मदत होते, असं आम्ही आधीच सांगितलं होतं.
परंतु पुढे केलेल्या संशोधनात आम्हाला कळालं की याचे मानसिक आरोग्यावर आणि झोपेवर खूप घातक परिणाम होत असतात. यामुळे माणसाच्या शारीरिक प्रक्रियेवर गंभीर परिणाम होत असतात.
प्रयोगासाठी त्यांनी एका मानसिक आजारावर उपचार करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला स्वयंचलीत अँप दिलं आणि त्याला त्याचात होणारे बदल, त्याचा विचारात, स्वभावात, इच्छेत होणारे बदल जर त्या अँपमध्ये सेव्ह करायला लावले परंतु जेव्हा याचा अभ्यास करण्यात आला तेव्हा त्यांना जाणवलं की याचा झोपेच्या आधी वापर केल्याने नेत्रविकार होत आहेत.
त्यांचा शरीरातील चक्रावर त्याचा खूप गंभीर परिणाम होत आहे.
पथदिवे, तसेच लाईटिंग, मोबाईलचा डिम लाईट, यामुळे लोकांच्या डोळ्यांना रंगा संबंधीचे विकार जडत आहेत. लोक कलर ब्लाइंड देखील होत आहेत.
या मंद व स्वच्छ प्रकाशाचा लाईट्स मुळे लाईट प्रदूषण नावाची नवी समस्या उभी राहिली आहे, जिचा सरळ परिणाम माणूस तसेच इतर सजीव प्राण्यांवर होत आहे.
मोबाईल मधला डिम ब्लु लाईट मेलाटोनिनचं उत्सर्जन थांबवतो आणि त्यामुळे निद्रेवर गंभीर परिणाम होतो. निद्रेचे चक्र बिघडते. त्यामुळे निरामय जीवनावर गंभीर परिणाम होतो.
आधी अश्याच प्रकारच्या एका संशोधनात हे प्राथमिक स्वरूपात मांडण्यात आलं होतं.
झोपण्यापूर्वी या टेक्नॉलॉजीकल डिव्हाइसेस ज्यात LED फ्लॅश आहे, त्याने परिणाम अधिक गंभीर होतात. अनेकांना निद्रानाशाचा त्रास होत असतो.
या साठी नॅशनल स्लिप फाउंडेशन या संस्थेने कुठल्याच टेक्नॉलॉजीकल वस्तूचा वापर झोपण्यापूर्वी ३० मिनिटे करू नये अशी सूचना केली आहे व मानसिक आरोग्यासाठी आजून अनेक सूचना केल्या आहेत.
डोळ्याभवती येणारे काळे वर्तुळ हे डोळ्याच्या शक्तीहिनतेचे प्रतीक असल्याने त्यासाठी ही विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.
आज LED चा होणाऱ्या जलद गती प्रसाराला थांबवता येणं शक्य नाही. कारण ते एक कमी खर्चिक आणि जास्त प्रकाशित करणारं उपकरण आहे.
त्यामुळे आता वैज्ञानिक व LED कंपनी एकत्र येत नवीन संशोधन करत आहेत. ज्याचा मुख्य भाग हा LED मधील ब्लु रंगाची पातळी कमी करणे व त्याला अधिक नेचर फ्रेंडली बनवण्यावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे.
हे जेवढं लवकर शक्य होईल तितकं लवकर व्यक्तीचं मानसिक आजारांपासून संरक्षण करणं सोपं होणार आहे.
मोबाईल, तसेच टीव्हीचा वापर कमी केलेलाच बरा!
===
हे ही वाचा – टेक्नोसॅव्ही युगात ‘या’ ७ सवयी ठरू शकतात तुमच्या मेंदुसाठी अत्यंत घातक
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.