मंगळावर जाणाऱ्या पहिल्या व्यक्तीची रंजक कहाणी..
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
लहानपणी आपण सर्वांनीच काही स्वप्ने बघितलेली असतात पण मोठं होत असताना आपल्या खेळण्यांप्रमाणे ती स्वप्नेही मागे पडून जातात. जगात खूप कमी लोक असे आहेत ज्यांनी लहानपणी बघितलेली ती निरागस स्वप्ने मोठं झाल्यावर देखील सोडली नाही. पण भलेही ते चंद्रावर जाणे असो की एक प्रसिद्ध अभिनेता होणे..
ह्याच काही लोकांमध्ये आता आणखी एक नाव जोडले गेले आहे. ती म्हणजे अमेरिकेतील एलेसा कार्सन. एलेसा ३ वर्षांची असतानाच तिने एक स्वप्न बघितलं होतं, अंतराळवीर होऊन मंगळ ग्रहावर जायचं. आणि तिने तिचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने प्रवासही सुरु केला.
सध्या १७ वर्षांची एलेसा ही नासाबरोबर मंगल ग्रहावर जाण्याची तयारी करत आहे. तिची कहाणी जेवढी रंजक आहे तेवढीच प्रेरणादायी देखील आहे
एलेसाने हे स्वप्न ‘दि बॅकयार्डिगन्स’ नावाच्या कार्टून सिरीज दरम्यान बघितले. लहानपणी हे कार्टून तिचे आवडते कार्टून होते. ह्या कार्टून सिरीजमध्ये ५ प्राण्यांचा ग्रुप होता ज्यांना सोबत अंत राळात जाण्याचं मिशन इमॅजीन करतात. ह्या मिशन दरम्यान ते मंगळ ग्रहाची यात्रा करतात. हे बघूनच एलेसा ह्यांच्या मनात देखील मंगळ ग्रहावर जाण्याचे स्वप्न बघितले होते.
१७ वर्षांच्या एलेसा कार्सन सांगते की ती सध्या अंतराळात जाण्यासाठी पुर्णपणे तयार आहे. ह्यासाठी तिने लुजियाना येथील बॅटन रेंजमध्ये कठीण परीक्षण देखील केले. पण सध्या नासा त्यांच्या आणि त्यांच्या स्वप्नाच्या मधे येत आहे.
नासाच्या एलेन च्या स्पेस मिशनचा भाग बनणाऱ्या अप्लिकेशन ला रद्द केली आहे. कारण नासाच्या नियमांनुसार १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या कुठल्याही व्यक्तीला नासा आपल्या स्पेस प्रोग्राममध्ये सहभागी करवून घेऊ शकत नाही. पण तरी एलेसा हिला मंगळावर पाठविण्याची ट्रेनिंग नासाने सुरु केली अहर. कारण हे मिशन २०३३ साली पूर्ण होणार आहे. आणि तोवर एलेसा ही ३२ वर्षांची होऊन जाईल. म्हणजेच ती मंगळावर जाऊ शकेल.
मंगळ ग्रहावर जाण्यासाठी एलेसाला प्रोजेक्ट ‘Possum’च्या माध्यमातून ट्रेनिंग दिली जात आहे. ज्यात तिला सर्व इक्विपमेंट्सची माहिती देण्यात येत आहे. तसेच मंगळावर कुठल्याही परिस्थितीत राहण्यासाठी तयार करण्यात येत आहे.
प्रोजेक्ट ‘Possum’ अंतर्गत एलेसाला अंडरवॉटर ट्रेनिंग देखील दिली जात आहे. डेटोना बीच, फ्लोरिडा, प्रेस्कॉट आणि एरीजोना ‘Possum’ चे कॅम्पस आहेत. ह्याठिकाणी प्रत्येक सुविधा देखील उपलब्ध आहे.
एलेसा ही सोशल मिडीयाच्या आणि ब्लॉगच्या मदतीने अनेक महिलांना सायन्स, टेक्नोलॉजी, इंजिनिअरिंग आणि गणित ह्यासारख्या विषयांत इंटरेस्ट घेण्यासाठी इन्स्पायर करते.
२०१७ साली नासाच्या डीप्टी असोसियेट अॅडमिनिस्ट्रेटर ग्रेग विलियम्स ह्यांनी स्पेस एजन्सी सोबत मिळून चार प्लान बनवले होते आणि मंगळ ग्रहावर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. एलेसा आणि नासा त्यांचं हेच स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.