विज्ञानातील काही अपरिचित मात्र तितक्याच रंजक गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर हे वाचाच
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
शाळेत आपल्याला पाचवीपासून विज्ञान हा विषय शिकवला जातो. ज्यात पाऊस कसा पडतो, किती ग्रह आहेत, आकाशगंगा काय आहे ते मानवीशरीरात किती हाडे असतात इथपर्यंत सर्वकाही शिकवलं जातं.
त्यामुळे विज्ञानाबाबत सर्वांना प्राथमिक माहिती ही असतेच. पण तरी देखील काही अशा मुलभूत गोष्टी असतात ज्याबाबत आपल्याला कुणीही सांगत किंवा शिकवत नाही.
कदाचित त्या गोष्टी एवढ्या महत्वाच्या नाहीत असं मानलं जात असावं. पण ह्या गोष्टी देखील इतर वैज्ञानिक गोष्टींप्रमाणे आपल्यासाठी महत्वाच्या ठरतात. त्या आपल्याला माहित असणे गरजेचे आहे.
विज्ञानाबाबत खूप खोलात जाऊन सर्व गोष्टींची माहिती असणे हे शक्य नाही आणि आपल्या सारख्या सामान्य लोकांना त्याची गरजही नाही.
ह्या गोष्टी वैज्ञानिकांसाठी नक्कीच महत्वाच्या असतात, पण आपल्यासाठी नाही. तरी काही अश्या गोष्टी देखील आहेत ज्या आजवर ना आपल्याला शाळेत शिकविल्या गेल्या नाही कुणी सांगितल्या. तरीदेखील त्या आपल्याला माहित असणे गरजेचे आहे.
आज आम्ही आपल्याला अश्याच काही वैज्ञानिक बाबी सांगणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला माहित नसतील…
आपल्या सगळ्यांना माहित आहे की मानवी शरीरात २०६ हाडे असतात. पण नवजात बाळांच्या शरीरात ह्याहून ६४ हाडं जास्त असतात. म्हणजे नवजात बाळांच्या शरीरात २७० हाडं असतात, ज्यामुळे त्यांचे शरीर वयस्क माणसाच्या शरीराहून अधिक लवचिक असते.
जसजसं बाळ मोठं होत जातं तसतसं त्याच्या शरीरातील हाडं एकमेकांशी फ्युज होतात आणि अखेर त्याच्या शरीरातील एकूण हाडांची संख्या २०६ वर येऊन थांबते.
सूर्यफूलाला पोषण मिळविण्यासाठी रेडीओअॅक्टिव्ह आयसोटोप्सची गरज असते. जसे जसे सुर्यफुल वाढत जाते तसे तसे त्याची रेडीओअॅक्टिव्ह आयसोटोप्सची गरजही वाढत जाते त्यासाठी ते मातीतून रेडीएशन शोषून घेतात.
आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव एका निश्चित वयापर्यंत वाढत असतात, जसे की आपली उंची. पण मानवी शरीरातील कान आणि नाक हे दोन असे अवयव आहेत हे रोज थोडे थोडे वाढत असतात.
तुम्हाला माहित आहे का, की तुम्ही रेझर ब्लेडदेखील पचवू शकता? हो! आपल्या पोटात असलेले अॅसिड हे २४ तासाच्या आत रेझर ब्लेड ला वितळून पचविण्याची क्षमता ठेवतात, पण म्हणून मुद्दाम रेझर ब्लेड खावू नये.
रिसर्च दरम्यान वैज्ञानिकांच्या असे लक्षात आले की, उंदीर हे झोपेत अन्नाचे स्वप्न बघतात. म्हणजेच माणूसच नाही तर प्राणी देखील झोपेत स्वप्न बघतात.
अंतराळात तुम्ही ढेकर घेऊ शकत नाही. कारण जेव्हा आपण पृथ्वीवर ढेकर घेतो तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे आपण खाल्लेलं अन्न आणि द्रव्य खाली राहतं आणि आपल्या तोंडून फक्त वायू बाहेर पडतो. पण अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्याने वायूला पोटातील द्रव्य आणि घन पदार्थांपासून वेगळे केलं जाऊ शकत नाही, त्यामुळे अंतराळात आपण ढेकर घेऊ शकत नाही.
थंड पाण्याच्या तुलनेत गरम पाण्याचे लवकर बर्फात रुपांतर होते. गरम पाण्याच्या कणांचा एक विशीष्ट स्वभाव असतो ज्यामुळे ते थंड पाण्यातील कणांच्या तुलनेत अधिक लवकर गोठतात.
नेपच्यून, युरेनस, गुरु आणि शनी ह्या ग्रहांवर हिऱ्याचा पाऊस पडतो. येथील प्रचंड दबावामुळे कार्बनच्या अणूंचे हिऱ्यात रुपांतर होते.
आपल्या रक्ताच्या संरचनेत तेवढेच मीठ असते जेवढे समुद्राच्या पाण्यात असते. ह्या तथ्याच्या आधारे हे म्हटलं जाऊ शकतं की जीवनाची सुरवात ही समुद्रापासून झाली आहे.
केळी ही रेडीओअॅक्टिव्ह असतात. केळींमध्ये असणारं पोटॅशियम त्यांना थोडं रेडीओअॅक्टिव्ह बनवतं. पण ह्याचा आपल्या शरीराला तेवढे काही नुकसान होत नाही. जर तुम्ही एका वेळी १०,०००,००० केली खाल्ल्या तरच तुमच्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होईल.
ह्या काही वैज्ञानिक बाबी कदाचितच कधी आपल्याला कोणी सांगितल्या असतील…
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.