' पारशी लोकांकडे एवढा पैसा आला तरी कुठून; इतिहासाचा एक वेगळाच अध्याय! – InMarathi

पारशी लोकांकडे एवढा पैसा आला तरी कुठून; इतिहासाचा एक वेगळाच अध्याय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पारशी समाज हा भारतातील सर्वात अल्पसंख्याक धार्मिक समूह आहे. भारताच्या अगदी काही थोड्या भागात पारसी लोकांचं आज अस्तित्व आहे.

तरी एवढी कमी संख्या असून देखील पारशी समाजाचा देशाच्या उभारणीत सिंहाचा वाटा आहे.

 

parsi-inmarathi

 

पारशी समाजाकडे मोठ्या प्रमाणावर धन साठा आणि संपत्ती आहे. पारशी लोकांचं जीवनमान हे खूप उच्चस्तरीय आहे.

पारसी लोक पर्शिया, इराण इथून रेफ्युजी म्हणून भारतात आले आणि अगदी काहीच वर्षात इतके श्रीमंत झाले की त्यांनी भारताच्या औद्योगिक विश्वावर आधिपत्य गाजवले.

पण एका भटक्या, आश्रित समूहाला एका परकीय भूमीवर एवढी प्रगती करणं कसं शक्य झालं? त्यांचाकडे एवढा पैसा आला तरी कुठून?

तर मित्रांनो याचं उत्तर आहे, “अफूचा व्यापार”…!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

==

हे ही वाचा : एरवी शांतताप्रिय असलेल्या पारशी लोकांनी मुंबईत दंगल का घडवली होती?

==

 

होय!

“अफू”च्या व्यापाराने पारशी लोकांना इतकं श्रीमंत बनवलं की त्यांची संपत्ती ते स्टील, रिअल इस्टेट आणि व्यापारात विस्तारित करू शकले.

अन्यथा एक समूह ज्याच्याकडे स्वतःची जमीन नाही. सोनं – नाणं नाही तो भारताच्या औद्योगिक विश्वावर अधिराज्य तरी कसा गाजवू शकतो?

अफूचा व्यापार तेव्हा सुरू करण्यात आला जेव्हा ब्रिटिशांना चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या चहा, चिनीमाती आणि रेशीम या वस्तूंची देयके देतांना अडचण येऊ लागली होतो.

अनेक भारतीय घराण्यांनी अफूचा व्यापार सुरू केला परंतु पारशी समाज त्यात आघाडीवर होता.

पारसी लोकांकडे अनेक गुण होते. जसे आजूबाजूच्या वातावरणाशी एकरूप होणे, ब्रिटीशांशी चांगले संबंध असणे आणि समुद्रातून प्रवास करण्याची भीती नसणे. (पूर्वी तसं करणं भारतात पाप आणि चुकीचं समजलं जाई, त्याला सिंधूबंदी असे म्हणत!)

अफूच्या व्यापाराच्या सफलतेमागे सर्वात महत्वाचा वाटा त्यांच्या कर्मभूमीचा आहे. पारशी लोकांची कर्मभूमी तीच होती जी आज अनेकांची कर्मभूमी आहे.

ती म्हणजे मुंबई. त्यातल्या त्यात दक्षिण मुंबई.

 

Mumbai's clock.Inmarathi1

 

या भागात ब्रिटिशांचं प्रस्थ होतं त्यामुळे पारसी लोकांना हवी ती मदत मिळाली. त्यांनी पारसी लोकांची जास्त अडवणूक केली नाही.

 

opium-inmarathi

 

कोलकाताच्या एका प्रमुख व्यापाऱ्याने पण अशी गुंतवणूक अफूचा व्यापारात केली होती परंतु त्याला यात अपयश आले.

चीनने अफूचा व्यापारावर बंदी आणली होती. त्या बंदीमुळे भारतात होणारा अफूचा व्यापार स्थगित झाला होता.

परंतु आर्थिक दृष्ट्या नुकसान होऊ देण्याची इंग्रजांची कुठलीच मानसिकता नव्हती त्यांनी लगेचच चीन सोबत दोन अफूचे युद्ध केले.

या युद्धात चीनचा पराभव झाला. चीनने शरणागती पत्करली व ब्रिटिशांनी अफूचा व्यापार कायदेशीर करून घेतला.

१८३० च्या उत्तरार्धात, ४२ पैकी २० विदेशी व्यापारी संस्था ज्या चीन मध्ये अफूचा व्यापार करत त्या पारसी समाजाच्या मालकीच्या होत्या.

१९०७ साली भारताचा अफू व्यापार आजच्या तुलनेत १० पट जास्त होता. तेव्हा अफूच्या उत्पादनाचं जागतिक प्रमाण हे ४१,६२४ टन होतं. परंतु या अफूचा व्यापारामुळे चीनला सामाजिक स्तरावर खूप मोठं नुकसान झेलावं लागलं होतं.

चीनमधील चार पैकी एक तरुण हा अफूचा व्यसनाने ग्रस्त झाला होता. हा आकडा आज जितके अफूचे व्यसनी लोक आहेत, त्यांचा तीनपट होता.

==

हे ही वाचा : तुम्हाला ‘या’ गोष्टीची “चटक” पारशी लोकांमुळे लागली, हे माहित आहे का?

==

 

Opium_addicts-china-inmarathi

 

भारतातील गंगा किनाऱ्यावरील जमिनीवर आणि मालवा प्रदेशात अफूच उत्पादन शेतकऱ्यांना घ्यायला लावलं जात होतं. यामुळे त्या भागात आवश्यक खाद्यान्न पिकं जसे गहू आणि भात याचं उत्पादनच होत नसे. यामुळे ओढवलेल्या उपासमारीने लाखो लोकांचा जीव गेला होता.

याबरोबरच आफ्रिकेतून अमेरिकेतल्या कापूस आणि उसांच्या शेतात जो गुलाम आयात निर्यात करण्याचा कारभार चालायचा त्यासाठी अफूचा व्यापार मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे.

अफूच्या व्यापाराचा इतिहास जरी अत्यंत अंधकाराने व पिडेने भरलेला असला तरी पारसी लोक फक्त त्याचा व्यापार करण्यासाठी उपयोग करत.

तो व्यापार त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन होतं. ते तो व्यापार कायदेशीररित्या करत असत. जे काही परिणाम झालेत अथवा जे काही नुकसान झाले ते दोन्ही बाजूंचे झाले होते.

हे सर्व होऊन सुद्धा पारसी समाजाने समाजाला खूप काही परत केलं.

पारशी समाजाने भारतात औद्योगिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली, जेव्हा जे आरडी टाटांनी स्टीलचा पहिला कारखाना सुरू केला.

 

 

हे सर्व अफूच्या पैश्यांवरच शक्य झालं.

अनेक शैक्षणिक संस्था जसे सर जे जे स्कुल ऑफ आर्ट्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बंगलोर, सर जे जे स्कुल ऑफ आर्किटेक्चर, बी जे मेडिकल कॉलेज, जे जे मेडिकल कॉलेज, जे एन पेटिट लायब्ररी आणि सेठ आर जे जे हायस्कूल यांची स्थापना पारशी लोकांकडून करण्यात आली. या संस्थांतून दर्जेदार शिक्षण देशात उभं राहिलं.

भारताच्या औद्योगिक व व्यापारी क्षेत्र विकासात आपण टाटा, वाडिया, मेस्त्री, गोदरेज या पारशी समूहांचे योगदान नाकारुच शकत नाही.

 

ratan-tata-adi-godrej-inmarathi

 

==

हे ही  वाचा : जेव्हा जगात आदरणीय असलेले धर्मगुरू जीवाच्या आकांताने भारतात आश्रयास येतात…

==

भारताला स्वयंपूर्ण बनवण्यात पारसी लोकांचा सिंहाचा वाटा आहे. पारसी लोकांनी स्वतःच्या प्रगतीबरोबर देशाच्या प्रगतीला देखील तितकेच महत्व दिले आहे. त्यामुळे देश त्यांचा काळ्या भूतकाळाची आठवण काढत नाही. त्यांच्या प्रति समाजात नेहमी आदराचे स्थान आहे, ते पुढे कायम राहिल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?