' खोटं वाटेल, पण शंभर टक्के खरं! चक्क “हिऱ्यांची” बाग.. – InMarathi

खोटं वाटेल, पण शंभर टक्के खरं! चक्क “हिऱ्यांची” बाग..

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

डायमंड/हीरा.. आपल्याकडेही एखादा डायमंड असावा भलेही तो छोटा का नको पण असावा अशी सर्वांचीच इच्छा असते, स्पेशली स्त्रियांची. पण अनेकांची ही इच्छा केवळ एक इच्छाच बनून राहते. ह्याचं कारण म्हणजे हिऱ्याची किंमत.

 

Diamond park-inmarathi02
arkansasonline.com

विचार करा जर एखाद्या सकाळी बागेत फिरता फिरता तुम्हाला एखादा हिरा सापडला तर? काहीच पैसे न खर्च करता..

नक्कीच तुम्ही ह्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण असं कुठे बगीच्यात हिरे सापडत नसतात. पण ह्या अनेक विचित्र विचित्र ठिकाणं आहेत, त्यापैकीच एक म्हणजे हिरे उगविणारा बगीचा. हो हिरे उगविणारा बगीचा, जिथे खरेखुरे हिरे आढळतात.

 

Diamond park-inmarathi03
atlasobscura.com

हा बगीचा अमेरिकेत आहे, येथील अरकांसास नॅशनल पार्क हे ३७.५ एकरच्या परिसरात पसरलेलं आहे. येथे एक हिऱ्याची खाण आहे. ह्या खाणीची विशेषता म्हणजे येथे हिरे निघतात आणि येथे कुणीही जाऊ शकतं. येथे तुम्हाला जमिनीवर हिरे आढळतील. ह्या हिऱ्यांना ज्यांनी उचलले ते त्याचे होऊन जातात. तसेच ह्या हिऱ्यावर कुठल्याही प्रकारचा कर आकारत नाही.

म्हणजे जर कुणाला ह्या बगीच्यात हिरे सापडले तर तो त्याची कुठलीही किंमत न देता त्या हिऱ्याचा मालक होऊन जातो. ह्याचं कारणामुळे येथे आलेले अनेक लोक श्रीमंत झाले आहेत. आणि असं नाहीये की अमेरिकेच्या सरकारला ह्याबाबत माहिती नाहीये, सर्व माहित असून देखील तिथल्या सरकारने ह्यावर कुठल्याही प्रकारचे प्रतिबंध लावलेले नाहीत.

 

Diamond park-inmarathi07
visittheusa.com

ह्या ठिकाणी १९०६ साली जॉन हेडलेस्टोन नावाच्या व्यक्तीला २ चमकणारे क्रिस्टल सापडले, जेव्हा ह्या क्रिस्टलची तपासणी करण्यात आली तेव्हा सर्वेच आश्चर्यचकित झाले. कारण साधारण वाटणारे ते क्रिस्टल्स खरेखुरे हिरे होते. ह्यामुळे जॉन हेडलेस्टोन हे श्रीमंत झाले. १९७२ साली ह्या ठिकाणी एक नॅशनल पार्क बनविण्यात आला आणि हे ठिकाण पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. आजवर ह्या ठिकाणाहून ७५ हजाराहून जास्त हिरे सापडले आहेत.

 

Diamond park-inmarathi04
craterofdiamondsstatepark.com

ह्या ठिकाणी हिरे सापडलेल्या डेन फ्रेडरिक नावाच्या व्यक्तीने त्याचा अनुभव सांगितला की, जेव्हा २०१६ साली जेव्हा ते त्यांच्या मुलीसोबत ह्या पार्कमध्ये फिरायला गेले होते, तेव्हा त्यांना तिथे २.०३ कॅरेटचा एक मौल्यवान हिरा सापडला. तसेच डीन फिलपुला ह्यांना २.०१ कॅरेटचा हिरा सापडला. तसेच एक १४ वर्षांचा मुलगा कालेल लँडफोर्ड ह्या पार्कमध्ये हिऱ्याच्या शोधात होता तेव्हा त्याला अर्ध्या तासाच्या आत ७.४४ कॅरेटचा मौल्यवान हिरा सापडला.

 

Diamond park-inmarathi05
share.america.gov

जर कधी अमेरिकेत जायचा चान्स मिळाला तर नक्की ह्या हिऱ्याच्या पार्कला भेट द्या, काय माहित तुम्हालाही एखादाही मौल्यवान हिरा मिळेल आणि तुम्ही देखील श्रीमंत व्हाल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?