' हे पदार्थ ‘रिकाम्या पोटी’ खाताय? त्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात! – InMarathi

हे पदार्थ ‘रिकाम्या पोटी’ खाताय? त्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘सकाळ चांगली झाली आपला संपूर्ण दिवस चांगला जातो’, असे म्हटल्या जाते. त्यामुळे आपण सकाळी काय करतो ह्यावर आपला दिवस ठरत असतो. जर सकाळी आपल्याला आपल्या आवडीचा नाश्ता मिळाला तर आपण खूप आनंदी होऊन जातो आणि आपला अख्खा दिवस चांगला जातो कारण आपला मूड चांगला असतो.

तसेच सकाळी नाश्ता करणे हे आपल्या शरीरासाठी देखील खूप महत्वाचे असते. तो आपल्या दिवसाचा पहिला आहार असल्याने तो जेवढा पौष्टिक असेल तेवढाच आपल्या शरीराला फायद्याचा ठरतो.

 

indian nashta InMarathi

 

पण आजकालचे लोक आपल्या आरोग्याकडे खूप लक्ष द्यायला लागले आहेत. त्यामुळे ते डायटला अधिक महत्व देऊ लागले आहेत. ह्यात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपत पर्यंत काय खावे काय खाऊ नये हे सर्व ते पाळतात देखील तरीही कुठे ना कुठे लोक चुकतात. जसे की रिकाम्या पोटी खाणे.

आपल्या सर्वांनाच सकाळच्या नाश्त्याचे महत्व माहित आहे पण सकाळी नाश्त्याला आपण जे हेल्दी फुड्स घेतो त्यांचा रिकाम्या पोटी खाल्ल्याने किती विपरीत परिणाम होऊ शकतो हे कदाचित आपल्याला माहित नसेल.

त्यामुळे सकाळचा नाश्ता करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच सकाळी रिकाम्या पोटी काय खाऊ नये हे जाणून घेणे देखील महत्वाचे ठरते. नाहीतर त्याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात.

टोमॅटो :

 

cancer-tomatoes-inmarathi

टोमॅटो हे आपल्या त्वचेसाठी अतिशय उपयोगी असे आहे. पण टोमॅटो हे कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये. टोमॅटोमध्ये टॅनिक अॅसिड खूप मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे आपली अॅसीडीटी वाढते. तसेच ह्यामुळे आपले पाचन तंत्र देखील बिघडू शकते.

सिरल्स :

 

foods-inmarathi

 

बाजारात अनेक प्रकारची अन्नधान्य मिळतात. लाईटवेट आणि पौष्टिक समजल्या जाणारी ही अन्नधान्ये आर्टिफिशल रंग, मोठ्या प्रमाणात साखर आणि प्रिझर्वेटिव्ह ह्यांच्यापासून बनली असतात.

रिकाम्या पोटी हे खाल्ल्याने शरीरातील साखरेच प्रमाण अचानक वाढण्याची शक्यता असते. ज्यामुळे हृदयासंबंधी आजार तसेच लठ्ठपणा ह्यासारख्या समस्या उद्भवतात.

फ्रुट जॅम :

 

foods-inmarathi01

 

फ्रुट जॅम आणि ब्रेड हा अनेकांचा आवडता नाश्ता असतो. पण हे फ्रुट जॅम खायला जरी चविष्ट वाटत असले तरी ते शरीरासाठी तेवढे पौष्टिक नसते. ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साखर आणि कॅलरीज असतात. तसेच ह्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे रिकाम्या पोटी हे खाणे नुकसानकारक ठरू शकते. ह्याऐवजी सकाळी नाश्त्याला अंड किंवा टोस्ट घ्या. तसेच मैद्याची ब्रेड खाण्यापेक्षा मल्टीग्रेन ब्रेड खा.

फळांचा रस :

 

foods-inmarathi02

 

फळांचा रस हा आरोग्यासाठी अतिशय उपयोगी असतो. वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात फळांच्या रसाचा समावेश प्रामुख्याने करावा. पण हा फळांचा रस फ्रेश असावा, बाजारात मिळणारा पॅकेज्ड ज्यूस नाही.

बाजारात मिळणाऱ्या पॅकेज्ड ज्यूस हे कुठल्याही प्रकारे शरीरासाठी चांगले नाही. कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात साखर आणि प्रिझर्वेटिव्ह असतात.

गोड पदार्थ :

 

foods-inmarathi03

 

पॅनकेक्स, कपकेक सारखे गोड पदार्थ हे दुध, अंडी, साखर, पीठ किंवा मैदा ह्यांपासौन बनविण्यात येतात.

ह्या पदार्थांमध्ये भलेही प्रोटीन असतील तरीही त्यात असेही काही तत्व असतात जे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. जे आपल्याला वजन कमी करण्यात अडथळा निर्माण करू शकतात. तसेच ह्यामुळे टाईप-२ डायबेटीस देखील होऊ शकतो.

हिरव्या पालेभाज्या :

 

good food-inmarathi05

 

हिरव्या पालेभाज्या ह्या आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी असतात. पण तरी देखील त्या रिकाम्या पोटी खाऊ नये.

कारण हिरव्या पालेभाज्यांमध्ये अमिनो अॅसिड असते, ज्यामुळे पोट दुखी आणि पोटात सूज येणे अश्या समस्या उद्भवू शकतात.

कार्बोनेटेड ड्रिंक्स :

 

foods-inmarathi04

 

सकाळीच नाही तर मुळात कार्बोनेटेड ड्रिंक्स घेणे हेच चुकीचे आहे. त्याचा आपल्या शरीराला काहीही उपयोग होत नसून नुकसानच होते. त्यामुळे आपल्या पोटापर्यंत पोहोचणाऱ्या रक्तप्रवाहाची गती मंदावते त्यामुळे आपली पचन शक्ती कमी होते.

तसेच पोटासंबंधीचे आजारही वाढू लागतात. तसेच ह्याचा अति प्रमाणात सेवन केल्याने त्याचा आपल्या आतड्यांवर देखील वाईट परिणाम होतो.

दही :

 

curd-InMarathi

 

दही हे भलेही शरीरासाठी अत्यंत चांगले असले तरी देखील रिकाम्या पोटी दही खाऊ नये. तसेच नेहेमी ताज्या दह्याचा वापर करा आणि पॅकेटचे दही वापरणे टाळा.

प्रोटीन बार :

 

foods-inmarathi05

 

नाश्त्यामध्ये प्रोटीन बार किंवा ब्रेकफास्ट बार घेणे अनेकांच्या पसंतीस उतरते. पण हे बार साखर, मध तसेच वेगवेगळ्या सिरपपासून तयार केले जातात. ह्यामध्ये चव वाढविण्यासाठी चॉकलेट चिप्स आणि इतर पदार्थ मिसळले जातात.

रिकाम्या पोटी ह्या पदार्थांचे सेवन केल्याने हे पचविण्यास जड जाते. म्हणून रिकाम्या पोटी ह्यांचे सेवन करणे टाळा.

वरील काही गोष्टी ह्या जरी आपल्या शरीरासाठी गुणकारी असल्या तरी त्या रिकाम्या पोटी घेतल्याने त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होतो. त्यामुळे कधी काय खावे आणि कधी खाऊ नये हे आपल्याला माही असणे आवश्यक आहे.

===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?