भारताच्या राजकीय क्षेत्रातील हा दुटप्पीपणा चीड आणणारा आहे
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
राजकीय क्षेत्र हे दुटप्पीपणा साठी ओळखलं जातं. हा राजकीय दुटप्पीपणा येतो राजकीय पक्षांच्या विचारधारेतून, लोक स्वतःला राजकीय विचारधारेत इतके गुंतवून ठेवतात की ते स्वतःच्या मतांशी प्रतारणा करायला मागे पुढे पाहत नाही. राजकीय विचारधारेसाठी हे लोक चुकीच्या गोष्टींचे समर्थन देखील करतात.
बऱ्याचदा ह्या त्या गोष्टी असतात ज्याचा विरुद्ध याच लोकांनी आवाज उठवलेला असतो. एकप्रकारे राजकीय विचारधारेमुळे लोक आंधळे होतात. त्या विचारांवरील प्रेमाखातर ते नैतिकता सुद्धा त्यागतात.
राजकीय दुटप्पीपणा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते तळागाळातील कार्यकर्त्यापर्यंत बाळगला जातो. हा दुटप्पीपणा वेळोवेळी सामोर येत असतो व लोक तो दुटप्पीपणा ओळखतात आणि त्यावर सडकून टीका करतात.
त्याचं प्रखर विरोध प्रदर्शन करतात तेव्हा राजकीय विचारधारा ग्रस्त लोकांना त्यांचाच दुटप्पीपणाची जाणीव होते. पण सहसा त्यात बदल होत नाही तो वाढत जातो आणि राजकारण फुलत जातं. पण सामान्यजनांना मात्र यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. महाराष्ट्रात स्वामिनाथन आयोग लागू करू असं आश्वासन देऊन सत्तेत आलेली भाजपा जेव्हा ते शक्य नाही असं म्हणते तेव्हा त्यातून त्यांचा राजकीय दुटप्पीपणा दिसून येत असतो.
तर आज आपण अश्याच राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी व त्यांचा समर्थकांनी मांडलेल्या दुटप्पी भूमिकांविषयी जाणून घेणार आहोत. नुसतंच राजकारणी नाही तर भारतीय मीडियाच्या दुटप्पी धोरणाचा यात समावेश आहे.
१ . योगी आदित्यनाथ :
योगी आदित्यनाथ जे स्वतः उत्तर प्रदेश मुख्यमंत्री आहेत आणि कट्टर हिंदुत्ववादी आहेत त्यांनी प्रचारावेळी घोषणा केली होती की उत्तर प्रदेशात जेवढे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर ते कडक कारवाई करन त्यांना जेल मध्ये टाकेल परंतु सत्तेत आल्यावर याचा अगदीच उलट योगी आदित्यनाथनी केलं.
त्यांनी स्वतः वर असलेल्या 3- 4 केसेस आपल्या पदाचा वापर करून नष्ट केल्या. यामुळे त्यांनी स्वतःला दोषमुक्त तर केले पण भारतीय न्यायालयीन प्रक्रियेचा अपमान केला. स्वतः दिलेलं अश्वासन मोडलं.
२. राहुल गांधी :
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ते दावोसला वर्ल्ड इकॉनॉमी फोरमला गेलेले असतांना टीका केली की त्यांनी तिथे भारतात असलेल्या आर्थिक विषमतेवर पण बोलावं.
पण मुळात प्रश्न निर्माण होतो की तब्बल ६० वर्षे सत्ता उपभोगलेल्या पक्षाच्या अध्यक्षाने अशी टीका केवळ चार वर्षे सत्तेत असलेल्या पक्षाच्या पंतप्रधानावर करणे आणि त्याला विषमतेसाठी जबाबदार धरणे, हे कितपत योग्य आहे? हा सुद्धा एक दुटप्पीपणा आहे.
३. नरेंद्र मोदी :
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या राजकीय दुटप्पीपणाचे सम्राट म्हटले गेले पाहिजेत. 2013 साली जेव्हा निवडणुकीचा काळ होता त्यावेळी त्यांनी तत्कालीन काँग्रेस सरकार वर भरगोस टीका केली.
ट्विटरपासून सर्व माध्यमातून टीका त्यांनी केली पण जेव्हा ते सत्तेत आले तसे कालांतराने त्यांनी केलेले बरेच दावे खोटे ठरू लागले. तेव्हा लोक त्यांचा जुन्या पोस्ट शेअर करून विचारणा करत आहेत? त्यांना त्याबाबतीत बरंच ट्रॉल देखील केलं जात आहे.
जेव्हा दिल्लीत निर्भया प्रकरण घडलं तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तत्कालीन सरकारवर सडकून टीका केली होती. त्यांनी देशात महिला सुरक्षित नाही म्हणून सरकारला जाब विचारला होता. त्यांनी प्रचारा दरम्यान तश्या टॅगलाईन पण वापरल्या होत्या.
महिलांना सत्तेत आल्यावर पूर्ण सुरक्षा देऊ असं अश्वासन दिलं होतं. पण जसा काळ पालटला मोदी सरकार सत्तेत आलं आणि भारतात कठूवा आणि उन्नव सारखे महिला अत्याचाराचे गंभीर प्रकरणं झालेत. आज लोक मोदी सरकारला त्यांचाच अश्वासनांची आठवण करून देत आहेत.
४. सुषमा स्वराज :
ह्या सध्या भारताच्या परराष्ट्रमंत्री आहेत. 2013 साली त्या जेव्हा विरोधी पक्षात होत्या तेव्हा त्यांनी काँग्रेस सरकार वर पेट्रोल डिझेलच्या भाववाढीवर घणघणाती टीका केली होती.
पण जेव्हा आज त्या सत्तेत आहेत आणि पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत. तेव्हा आज त्या सूचक मौन बाळगून आहे. यातून त्यांचा दुटप्पीपणा जनतेसमोर आला आहे.
५. “द वायर”
या नावाने एक मीडिया संस्था कार्यरत आहे. ह्या मीडिया संस्थेने एक अहवाल प्रकाशित केला होता की भारतात गरीब श्रीमंतांची दरी वाढत चालली आहे, त्या संबंधी त्यांनी खूप मोठं आर्टिकल देखील लिहलं होतं. परंतु त्यांनी दिलेल्या हेडलाईन मध्ये जे असं चित्र रंगवण्यात आलं होतं की भारतात श्रीमंत गरीब दरी वाढत चालली आहे.
परंतु जेव्हा मूळ संस्थेच्या वेबसाईटवर जाऊन बघितलं तेव्हा मात्र ती दरी उलट कमी झाली असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे या पत्रकारिता संस्थेने ते आर्टिकल सरकार द्वेषातून लिहलं आहे असं म्हणून त्यावर आनंद रंगनाथन या व्यक्तीने सडकून टीका केली आहे.
६. प्रसून जोशी :
प्रसून जोशीनी निर्भया प्रकरणावेळी खूप हृदयस्पर्शी कविता लिहली होती आणि त्या कवितेतून त्यांनी निर्भयाचा वेदना तर मांडल्याच होत्या पण सरकारवर देखील सडकून टीका केली होती.
परंतु आज जेव्हा सर्वत्र महिलांवर अत्याचार होत आहेत अश्यावेळी प्रसून जोशींनी कविता लिहली आहे पण ती कविता सरकारच्या कामांची प्रशंसा करण्यासाठी लिहली आहे.
इतकेच नाहीतर असे अनेक राजकीय दुटप्पीपणाचे उदाहरण आपल्याला दिसून येतात. विरोधी पक्ष जेव्हा सोयीस्कर भूमिका घेतो तेव्हा देखील आपल्याला हा राजकीय दुटप्पीपणा जाणवत असतो. पण सामन्य जन सर्व जाणून देखील टीका करण्यापल्ल्याड या गोष्टीवर काही करू शकत नाही.
तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या जनजागृती मुळे हा राजकीय दुटप्पीपणा वेळोवेळी समोर येत आहे. यातूनच प्रगल्भ लोकशाही होण्याकडे भारताची वाट आजून सुस्पष्ट होत आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.