स्त्री-पुरुष परस्पर संबंधांचे केवळ २ नव्हे तर चक्क १० प्रकार असतात! वाचा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सेक्शुअल ओरिएंटेशन म्हणजेच एखाद्याकडे लैंगिक दृष्ट्या आकर्षित होणे. एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होणे, तिच्या प्रेमात पडणे म्हणजे सेक्शुअल ओरिएंटेशन. पण आपल्याला असं वाटत असतं की, ह्यामध्ये केवळ पण दोनच प्रकार असतात.
तर असं नसून ह्यात एकूण १० प्रकार असतात. होमोसेक्शुअल आणि बायसेक्शुअल ह्याव्यतिरिक्त देखील आणखी काही प्रकार आहेत..
१. हेट्रोसेक्शुअल :
ही सगळ्यात सामान्य अवस्था आहे. ह्यामध्ये एखदी व्यक्ती तिच्या अपोझिट जेन्डरच्या व्यक्तीकडे आकर्षित होते. जगभरातील बहुतेक लोक हे हेट्रोसेक्शुअल असतात.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
२. होमोसेक्शुअल :
जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्याच जेन्डरची व्यक्ती आवडायला लागते, किंवा तिला आपल्याच जेन्डरच्या व्याक्तीबाबत आकर्षण वाटत असेल तर ह्याला होमोसेक्शुअल असे म्हणतात.
जर कुठल्या पुरुषाला पुरुषा विषयी आकर्षण असेल तर त्याला गे म्हणतात, जर एखाद्या स्त्रीला स्त्री विषयी आकर्षण असेल तर त्यांना लेस्बियन असे म्हटल्या जाते.
३. बायसेक्शुअल :
जर कोणाला स्त्री आणि पुरुष ह्या दोघांविषयी आकर्षण वाटत असेल तर ह्याला बायसेक्शुअल असे म्हणतात.
४. असेक्शुअल :
काही लोकांना स्त्री आणि पुरुष या दोन्हींविषयी आकर्षण नसतं, असे लोक असेक्शुअल प्रकारात मोडतात.
५. डेमिसेक्शुअल :
काही लोक असे असतात जे भावनिक स्तरावर आकर्षित झाल्यावरच रिलेशनशिपमध्ये येतात. अश्या लोकांना डेमिसेक्शुअल असे म्हणतात.
६. सपो सेक्शुअल :
दिसणे किंवा नीटनेटके राहणे ह्यावर आकर्षित न होता जर कुणी एखाद्याच्या हुशारीवर, त्याच्या प्रेझेन्स ऑफ माइंडवर आकर्षित होत असेल तर अश्या लोकांना सपो सेक्शुअल म्हणतात.
७. ग्रे सेक्सुअल :
ग्रे सेक्शुअल ह्या प्रकारात ते लोक मोडतात ज्यांना संभोग करण्यात फार काही रुची नसते पण ते असेक्शुअल देखील नसतात.
म्हणजे अश्या प्रकारचे लक हे इतर कुठल्याही जेन्डरकडे कमी प्रमाणात पण आकर्षित होतात.
८. एंड्रोजिनसेक्शुअल :
एंड्रोजिनसेक्शुअल ह्या प्रकारात मोडणारे लोक हे केवळ त्या लोकांकडे आकर्षित होतात ज्यांच्यात स्त्री आणि पुरुष दोघांचीही लक्षणे असतील.
९. एंड्रोसेक्शुअल :
एंड्रोसेक्शुअल लोक हे केवळ पुरुषी लक्षण असलेल्या व्यक्तींकडे आकर्षित होतात.अश्या लोकांना पुरुषांची लक्षण असलेले पुरुष आणि स्त्रिया दोन्ही आवडतात.
१०. गायनोसेक्शुअल :
काही लोकांना स्त्रियांचे भाव खूप आवडतात, ते लोक स्त्रियांच्या हावभावांकडे आकर्षित होतात. अश्या लोकांना गायनोसेक्शुअल म्हणतात.
अश्या लोकांना स्त्रियांची लक्षण असलेले पुरुष देखील आवडतात.
थोडक्यात – स्त्रीने पुरुषाकडे व पुरुषाने स्त्री कडे वा स्त्री ने स्त्रीकडे व पुरुषाने पुरुषाकडे आकर्षित होणे – इतकीच लैंगिक आकर्षण वाटण्याची मर्यादा नाही…!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.