' कित्येक पिढ्यांचा वारसा असणाऱ्या या गोष्टी जणू लुप्तच झाल्या आहेत… – InMarathi

कित्येक पिढ्यांचा वारसा असणाऱ्या या गोष्टी जणू लुप्तच झाल्या आहेत…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

Smartphones मध्ये आजची पिढी जेवढी गुंतली आहे त्यापेक्षा इतर कशातच गुंतलेली नाही. अक्षरश: एकदा डोकं आत घातलं की बाहेर काढण्यासाठी एक तर battery संपायला लागते, नाहीतर इंटरनेट pack !

ह्याचं कारण काय?

कारण smartphones मध्ये भरपूर उपयुक्तता एकत्र मिळतात. पूर्वी फोन्स call आणि Messages करण्यासाठी वापरात येई. पण आता ह्या smartphones मध्ये नानाविविध सुविधा हाताशी आल्या आहेत.

androidPIT.com

जसं मानवाने शेपटीचा वापर बंद केला म्हणून शेपूट झिजून गेली नं…तसंच काहीसं ह्या उपकरणांना वाटत असणार smartphones मुळे!

 

पेजर

 

pager

रेडीओ लहरींवर चालणारं हे एक wireless device ! पेजर वर संदेश पाठवता येतात. ह्या संदेशांमध्ये फोटो, आकडेवारी, audio अशी माहिती पाठवता येते. हे device तर आजकाल दिसत सुद्धा नाही.

 

Portable Audio Player

 

ipod_line_as_of_2014

वॉकमन नावाचं एक गाणे ऐकायचं device सगळ्यांना आठवत असेल, हा त्याचाच पुढचा भाग ! ह्यात गाणे ऐकण्यासाठी कॅसेटची गरज पडत नव्हती. त्यातल्या स्टोरेज मेमरी मध्ये गाणे स्टोअर करता येतात.

छोटंसं असलेलं हे प्लेयर अगदी सहज सोबत कॅरी करता येई. पण आता आलेल्या फोन्स मध्ये ऑडीओ प्लेयर असल्यामुळे हा दिसेनासा झालायं !

 

FM रेडीओ

 

fm-radio

सामान्य माणसाचा मनोरंजनाचा एकमेव आधार म्हणजे रेडीओ !

एफ एम रेडिओवर गाणे ऐकणे म्हणजे लोकांचा दिनक्रम असायचा. पण आता smartphones मध्ये FM आल्यामुळे जुने रेडिओ बॉक्स फार क्वचित दिसतात.

 

Personal Digital Assistant

 

220px-palmtx

खाजगी माहिती साठवून ठेवण्यासाठी ह्या device चा वापर व्हायचा. मोबाईल मध्ये जेव्हा नवीन सोयी मिळायला सुरुवात झाली तेव्हाचं हे device जास्त पब्लिक पर्यंत पोहोचलंच नाही.

तरीही ह्यात notes, calender, phonebook, address book, fax sender, internet सारख्या सोयी होत्या.

 

Portable Gaming Devices

nvidia-jxd

एकदम छोटुसं असं आणि मोबाईल पेक्षा जास्त बटण असलेलं हे device! त्यात फक्त गेम्स खेळता येतात.

मोठे लोक त्यावर मुलांना गेम्स खेळतांना बघून ओरडत असत. त्यावरअगदीच भन्नाट असे गेम्स असायचे. कार रेसिंग पासुन ते WWE पर्यंत!

Smartphones मध्ये android ने गेम्सची सुविधा दिली आणि ह्या गेम्स चा खेळ खल्लास !

 

Digital Camera

 

canon_1066c001_powershot_g7_x_mark_1223211

आधी रोल चा कॅमेरा असायचा पण त्यासोबत ती रोलची कटकट सुद्धा असायची. सामान्य माणसासाठी मग डिजिटल कॅमेरा आला.

ह्यात फक्त कॅमेरा समोर धरायचा आणि बटण दाबायचं. हे सोप्पं होतं म्हणून लोकप्रिय सुद्धा झालं.

पण smartphones नी कॅमेरा introduce केला आणि मोठ्या screen वर अजून मजा येऊ लागली. पण इकडे डिजिटल कॅमेरा अडगळीत पडले.

तर मित्रांनो आता विचार करा…

जर, smartphones नसते तर हे सगळं सामान आपल्याला सोबत घेऊन फिरावं लागलं असतं!

तुम्हालाही अशीच काही devices ची नावं माहित असल्यास कमेंट मध्ये आम्हाला सांगा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Abhidnya Adwant

Author @ मराठी pizza

abhidnya has 47 posts and counting.See all posts by abhidnya

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?