' चीनची चलाख खेळी- एकीकडे कुरापती तर दुसरीकडे गुंतवणूक! – InMarathi

चीनची चलाख खेळी- एकीकडे कुरापती तर दुसरीकडे गुंतवणूक!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

भारत चीन सीमेवर तणाव आता काही नवीन नाही. शस्त्रसंधी उल्लंघन असो वा घुसखोरी चीन भारताच्या कुरापती काढतंच असतो. भारताने केलेल्या पाकिस्तानमधल्या सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्तानला दिलेला उघड उघड पाठींबा कुणाला विसरता येणार आहे का? त्यानंतर ब्रम्हपुत्रेचे पाणी बंद कारण कसलं तर सर्वात मोठं धरण बांधायचं!

एकीकडे NSG मध्ये भारताला सदस्यत्वासाठी झुलवत ठेवायचं आणि एकीकडे कुरापती काढायला पाकिस्तानला सांगायचं.

हे असं सगळं चालू असतांना सोशल मिडिया वर जोर धरला तो “Boycott China” च्या आशयाच्या मेसेजेस नी. चीनी मालाच्या होळ्या, त्याचा धिक्कार, मालावर बहिष्कार अशा एक न अनेक तऱ्हा शोधून काढल्या आपण भारतीयांनी चीन चा निषेध करण्यासाठी.

 

 

india-china

Source

ह्या सगळ्या गोंधळात भारतीय नागरिक आणि सरकार व्यस्त असतांना व्यावसायिक आणि गुंतवणूकदार वर्ग गणितं आखण्यात गुंतला होता. चीनमधला गुंतवणूकदार वर्ग भारतात गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहे.

 

चीन भारतात खूप मोठी गुंतवणूक करत आहे. भारतातील नवीन स्टार्ट अप्स वर लक्ष ठेवून असलेला चीन SaaS (Software as a Service) आणि FinTech (Financial Technology) सेक्टर मध्ये उत्सुक आहे. तज्ञांच असं म्हणणं आहे की भारतीय बाजारपेठ ज्या वळणावर आहे तिथे चीन ५ – १० वर्षांपूर्वी होता. म्हणुन चीनला भारताच्या गरजा ओळखता येतात आणि त्या पूर्ण करण्याची क्षमता पण आहे.

 

 

start

Source

Bangalore मध्ये झालेल्या एका Technology Issue Summit मध्ये १७ जणांच्या टीम ने ३५ भारतीय उद्योजकांना funding पुरवली आहे.

 

Beijing Miteno Communication Technology ह्या टेक कंपनीने भावीन आणि दिव्यांक तुराखिया बंधूंच्या Media.net ह्या कंपनीत ९० कोटींची गुंतवणूक केली आहे.

 

अलिबाबा ह्या ई-कॉमर्स वेब साईट ने Paytm मध्ये ४६३५ कोटींची गुंतवणूक केली.

 

Didi Chuxing ह्या चीनमधल्या uber ने Ola मध्ये गुंतवणूक केली आहे.

 

Tencent ह्या कंपनीने hike ह्या मेसेजिंग app मध्ये ११९२.७६ कोटी रुपयांची तर त्याआधी ६१३ कोटी रुपयांची गुंतवणूक Practo ह्या healthcare firm मध्ये केली. दक्षिण आफ्रिकेच्या Naspers ह्या कंपनीसोबत मिळून  ibibo ह्या पर्यटन कंपनीत सुद्धा गुंतवणूक केली.

 

अशा भरपूर startups साठी चीनचा Dragon आता देव बनून धावून येतो आहे. आशिष कश्यप, Ibibo चे संस्थापक चीनच्या एकंदर भूमिकेबद्दल बोलतात..

 

चीनी उद्योजकांना मार्केट तयार करण्यापासून जम बसवण्याचा दांडगा अनुभव असल्यामुळे ते फक्त गुंतवणूकदारांपेक्षा जास्त उपयुक्त ठरू शकतात. म्हणूनच तर स्टार्ट अप्स न चांगले दिवस येत आहेत.

 

चीनला भारतात गुंतवणूक करण्याची एवढी उत्सुकता का?

चीनचे भारताशी असलेले संबंध बघून कुणालाही एवढ्या मोठ्या गुंतवणुकीचं आश्चर्य वाटणं साहजिक आहे. आणि कुणीही उथळ वृत्तीचा विद्वान म्हणेल की ह्यात चीनची खेळी आहे. पण मित्रांनो तसं नाहीये. चीनच्या बाजारपेठेत बाहेरील देशांना गुंतवणुकीसाठी भरपूर अडथळे येतात. त्यामुळे तिकडे बहुतेक कंपन्या चीनी आहेत. त्यांचा एकंदर नफा बघितल्यास त्यांना बाहेर गुंतवणूक करणे सोपे आहे. अजून एक कारण असं की चीनची अर्थव्यवस्था हळूहळू मंदावत आहे. त्याची झळ कमी लागण्यासाठी चीनला बाहेर उद्योग वाढवणे आवश्यक आहे.

 

बरं आता चीनला ह्यासाठी दोन पर्याय आहेत. एक तर अमेरिका आणि दुसरा भारत. अमेरिकेत चीनी गुंतवणुकीला विशेष महत्व नाही. चीनी उद्योगांना सुद्धा अमेरिकेत पोषक असं वातावरण नाही. पण भारतात बाजारपेठ नव्याने उभी राहत आहे. TechWorld जोमात आहे. म्हणून चीनसाठी भारत हा सर्वात चांगला पर्याय आहे.

 

चीन आता फार्मा कंपनी, power sector मध्येही आपला रस दाखवत आहे पण डिजिटल टेक मध्ये काहीतरी मोठं आणि छान बघायला मिळेल असं तज्ञ म्हणतायत.

Source

 

तर चीनी मित्रांनो तुम्ही कुरापती काढाल तर प्रत्युत्तर देऊ, उद्योग द्याल तर स्वागत करू, हा आहे पुरोगामी भारत!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Abhidnya Adwant

Author @ मराठी pizza

abhidnya has 47 posts and counting.See all posts by abhidnya

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?